साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची घोषणा प्रणव सखदेव यांना मराठी भाषेसाठी पुरस्कार.

नवी दिल्ली , 30 : युवा लेखक प्रणव सखदेव यांना ‘ काळेकरडे स्ट्रोक्स ’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा ‘ साहित्य अकादमी युवा पुरस्कार ’ जाहीर झाला आहे. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने वर्ष 2021 च्या युवा पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २२ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली. प्रणव सखदेव ; मराठीतील आघाडीचे तरुण लेखक प्रणव सखदेव हे मराठी भाषेतील आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रसिध्द नाव आहे. ‘ पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता ’ हा कवितासंग्रह , ' निळ्या दाताची दंतकथा ’, ‘ नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य ' हे कथासंग्रह , व ‘ काळेकरडे स्ट्रोक्स ', ‘ 96 मेट्रोमॉल ’ या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केले असून ते मराठी प्रकाशन क्ष...