डॉ.भाऊसाहेब ऊर्फे पंजाबराव देशमुख यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली.
गडचिरोली, दि.27: शिक्षण महर्षी आणि कृषि क्रांतीचे प्रणेते डॉ.भाऊसाहेब ऊर्फे पंजाबराव देशमुख जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी डॉ.भाऊसाहेब ऊर्फे पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, श्री.चहांदे, उमाकांत चतुर, जिल्हा माहिती कार्यालयाचे मनोहर बेले, आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ.भाऊसाहेब ऊर्फे पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा