जंगल कामगार सहकारी संस्थांना कुपाचे वाटप.

गडचिरोलीदि.27: सन १९४७ साली तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री कै. बाळासाहेब खेर यांनी जंगल मक्तेदाराकडून आदिवासी समाजाची होणारी पिळवणुक व शोषण थांबावेत्यांचा सर्वांगीण विकास व्हावा.

आदिवासी समाजातून नेतृत्व निर्माण होवून या समाजाला मानवतेची वागणूक मिळावी व त्यांचे करवी समाजाच्या उध्दाराचे कार्य व्हावेया करीता शासनाने घोरणात्मक दृष्टीकोणातून जंगल कामगार सहकारी संस्था चळळीचा स्विकार केला आहे. सद्यास्थितीत गडचिरोली जिल्हयात २६ संस्था कार्यरत आहेत. या संस्थांना वनविभागाचे कार्य आयोजनेत समाविष्ट असलेली कुपे तोडीस पाटप करण्यात येतात. त्यापासून संस्थांचे सभासदांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होवून त्यांचे जिवनमान उंचावण्यास मदत होते.

गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत नविभाग आलापल्ली व वडसा या वनविभागात मंजुर कार्य आयोजनेनुसार तोडीस योग्य असलेली  कुपे अनुक्रमे + एकुण १४ कुपे जंगल कामगार सहकारी संस्था यांना त्यांचे कार्यक्षेत्रा अंतर्गत येत असलेली कुपे वनसंरक्षक (प्रा.) गडचिरोली डॉ. किशोर एस. मानकरद्वारे याटप करण्यात आली. त्यातून ३९९२.८४५ घ.मी. ईमारती लाकुड अपेक्षित आहे. तसेच त्यापासुन .२५ कोटी चा महसुल अपेक्षित आहे. जंगल कामगार सहकारी संस्थांच्या कार्यक्षेत्राबाहेरील कुपाचे वाटपाबाबत दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी वनसंरक्षक (प्रा.) गडचिरोली यांचे कार्यालयात व्हि.सी.द्वारे सभा घेण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थानी भा.व.से.प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) जीतसिंग,म.रा. नागपूर हे होते. सभेस वनसंरक्षक(प्रा.) गडचिरोलीडॉ.किशोर एस.मानकरउपवनसंरक्षक(प्रा.) आलापल्लीराहुलसिंग टोलीयाउपवनसंरक्षक(प्रा.) वडसधर्वीरसालविठ्ठलश्री.पि.के. झाडे सचिव जिल्हा संघ  जंगल कामगार सहकारी संस्थांचे अध्यक्ष व सचिव हजर होते.

जंगल कामगार सहकारी संस्था यांनी सन २०२१-२२  वर्षा करीता मागणी केल्यानुसार जिल्हा संघ जंकासजिल्हा उपनिबंधकउपवनसंरक्षक व वनसंरक्षक (प्रा.) यांनी शिफारस केल्याप्रमाणे शिफारशीस अधिन राहुन आलापल्ली व वडसा वनविभागातील तोडीस उपलब्ध कुपे जंगल कामगार सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्राबाहेरील कुपाचे कुप वाटप अहवालाचे वाचन करुन त्यांचे नावे सदर कुपाचे वाटप करण्यात आले. अशा प्रकारे आलापल्ली व वडसा वनविभागाअंतर्गत कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील मिळून एकुण २६+१२ भाग कुपाचे संस्थांना वाटप करण्यात आले. त्यापासून ९३५६.९३७ घ.मी. ईमारती लाकुड उत्पादनाचे उद्दीष्ट असून त्यापासून २६.२२ कोटी महसूल अपेक्षित आहे. प्राप्त महसुलातून खर्च वजा जाता शिल्लक निव्वळ महसुलातून २० टक्के वाटा हा जंगल कामगार सहकारी संस्थांना मिळतो. त्यापैकी १० टक्के वाटा संस्थांचे सभासदांना कल्याणकारी कामासाठी वाटप करण्यात येतो. त्यामुळे संस्थेचे सभासदांचे जिवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. तसेच संस्थांना वाटप केलेल्या कुपात निष्कासनाची कामे करणेसाठी सभासदांना रोजगार सुध्दा उपलब्ध होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.