जिल्हास्तरीय युवा महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद.

गडचिरोली,दि.30: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवासंचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयगडचिरोली तथा जिल्हा क्रीडा परिषदगडचिरोलीच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांचे मार्गदर्शनात जिल्हास्तरीय ऑनलाईन युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.

सदर ऑनलाईन युवा महोत्सवाला गडचिरोली जिल्ह्यातून स्पर्धकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिलायावेळी परिक्षक व अतिथी म्हणुन संजय धात्रक,  प्रशांत म्हश्याखेत्री व श्रीमती अश्विनी भोयर उपस्थित होतेकोरोनाच्या पार्श्वभुमीवर आयुक्तक्रीडा व युवक सेवा संचालनालयमहाराष्ट्र राज्यपुणे यांचे सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये सदर युवा महोत्सव नलाईन पद्धतीने घेण्यात आलासदर महोत्सवात लोकनृत्य व लोकगीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेसदर स्पर्धेत लोकनृत्य या स्पर्धेत अनुप डान्स ग्रुपसिमुलतला (घोटता.चामोर्शी जि.गडचिरोलीच्या स्पर्धकांने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहेनागपूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेमध्ये सदर स्पर्धक सहभागी होणार आहेकार्यक्रमाचे प्रास्तावीक व संचालन खुशाल म्हस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल लोणारे यांनी केलेकार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकरक्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडेमहेंद्र रामटेकेकुणाल मानकरचंद्रकांत आत्राम यांनी परिश्रम घेतलेअसे जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.