कोरोना -१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन गरजेच - संजय मीना.

जिल्हाधिकारी यांचेकडून आवश्यक अतिरीक्त निर्बंध लागू

गडचिरोली,दि.27: राज्यात वाढत्या ओमिक्रॉन कोविड विषाणूच्या अनुषंगाने त्यावरती नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी आवश्यक अतिरीक्त निर्बंध आज जिल्हयात लागू केले. कोरोना -१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन गरजेच असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यामध्ये गडचिरोली जिल्हयातील बंदीस्त जागेमध्ये आयोजित होणारे सर्व कार्यक्रम जसे- विवाहसमारंभलग्नसोहळेवाढदिवस सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी आयोजित करतांना जागेच्या आसन क्षतमेच्या कमाल 100 नागरिकांचे उपस्थितीस मर्यादा असेल. तसेच सदर कार्यक्रम मोकळया जागेत आयोजित करतांना कमाल 250 उपस्थिती किंवा त्या जागेच्या क्षमतेच्या 25% यांपैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितीच्या मर्यादेत परवानगी असेल.

जिल्हयातील सामाजिकराजकीयधार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना बंदीस्त जागेकरिता 100 व मोकळया जागेकरिता 250 किंवा जागेच्या क्षमतेच्या 25%  यांपैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितीतांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. वर नमुद केलेल्या कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांचे आयोजन बंद जागेमध्ये करित असतांना एकूण आसन  व्यवस्थेच्या/त्या जागेच्या 50 % क्षमते इतक्या उपस्थितीस मर्यादा असेल. परंतु आसन व्यवस्था निर्धारित नसलेल्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करीत असतांना आयोजित जागेच्या क्षमतेच्या 25%  पेक्षा अधिक उपस्थिती राहणार नाही याची दक्षता पाळण्यात यावी.

क्रीडास्पर्धा किंवा सामन्यांचे (क्रीडांगणे / बैठेखेळ) आयोजन करतांना प्रेक्षक क्षमतेच्या अधिकतम 25% उपस्थितीस मर्यादा असेल.रेस्टॉरेंटहॉटेल जिमस्पॉब्युटीपार्लरसिनेमागृहेचित्रपटगृहेनाटयगृहे इत्यादी ठिकाणी आसनक्षमतेच्या 50 % मर्यादेच्या अधिन राहून सुरु ठेवण्यास मुभा असेल. परंतु तेथे एकूण आसनक्षमता व परवानगी देण्यात आलेली 50 % क्षमता यांबाबतची सुचना प्रथम दर्शनी भागात लावणे संबंधित आस्थापना यांना बंधनकारक राहील. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना रात्रौ 09.00 ते सकाळी 06.00 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मज्जाव घालण्यात येत आहे.

सदर आदेशाचे पालन न करणारी /उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती/संस्था/समुह यांनी साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला  असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे संजय मीणा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली यांनी आदेशित केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.