तांत्रिक सहाय्यक (कंत्राटी) पदासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुलाखतीचे आयोजन.
गडचिरोली, दि.30: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय, दिनांक 28 जानेवारी 2021 व "सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पोषणतत्व गुणसंवर्धित तांदूळ वितरित करणे" या योजनेच्या अमलबजावणीसाठी सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 13 जुलै 2021 रोजी आयोजित बैठकीमधील दिलेल्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर तांत्रिक सहाय्यक हे एक पद कंत्राटी तत्त्वावर अस्थायी स्वरुपात मुलाखतीद्वारे भरावयाचे आहे. त्याकरीता इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर पदाकरीता शैक्षणिक पात्रता मानधन प्रतिमाह रु.30,000/- असून शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठ B.Tech Food Technology किंवा M.Sc.Nutrition. , संगणकाचे ज्ञान आवश्यक MS-CIT (शासनमान्य प्रमाणपत्र), मराठी भाषेचे ज्ञान, अन्न प्रक्रिया विभागाबाबत अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र. तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 12 जानेवारी 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील पुरवठा शाखेत शैक्षणिक कागदपत्रासह अर्ज दाखल करावे. मुलाखतीकरीता दिनांक 17 जानेवारी 2022 ला सकाळी 11.00 वाजता मुळ कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा), गडचिरोली येथे हजर राहावे असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा