बचतगटांच्या उत्पादनांना ‘माविम’ देणार ऑनलाइन मार्केटिंगचे व्यासपीठ- महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर.

मुंबईदि. 29: बचत गट हे महिला सक्षमीकरणाचे सशक्त माध्यम असूनमहिला आर्थिक विकास महामंडळ आपल्या ई-बिजनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहे. ई- मार्केटिंगमध्ये महिला कमी पडू नयेतयासाठी बचतगटाच्या उत्पादनांना माविममार्फत ऑनलाइन मार्केटिंगचे सर्व व्यासपीठ उपलब्ध करून द्यावेअसे निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

माविम अंतर्गत बचतगटामार्फत तयार होणाऱ्या वस्तूच्या विक्री व प्रदर्शनबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस ‘माविम’च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशीउपसचिव विलास ठाकूर आदी उपस्थित होते.

महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या‘माविम’अंतर्गत बचतगटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळण्यासाठी नव माध्यमांचा वापर करावा. यासाठी बचतगटातील महिलांना पॅकेजिंगब्रँडिंगमार्केटींग याबाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्यातील बचतगटातील महिलांचा त्यांच्या उत्पादनाची माहिती देणारा व्हिडिओ तयार करुन तो ऑनलाइन माध्यमावर प्रसृत करावा. यासाठी विभागाच्या सोशल मिडीया प्लॅटफॅार्मचा वापर करावा, असेही ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

राज्यविभाग व जिल्हास्तरावर बचतगटांच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करावे व त्याबाबत वर्षभराचे नियोजन तयार करावे. कोविड प्रादुर्भावामुळे प्रदर्शन घेणे शक्य न झाल्यासऑनलाईन प्रदर्शनासाठी कायमस्वरुपी वेबपोर्टल तयार करावे. ‘माविम’ने नुकतेच वर्ल्ड एक्स्पो दुबई येथे तीन सामंजस्य करार केले. या सामंजस्य करारामुळे बचतगटाच्या महिलांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळाली आहेअसेही  ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.