3 जानेवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.

गडचिरोली, दि.28 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार दि. 3 जानेवारी 2022 रोजी दुपारी  3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयगडचिरोली  येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांक जोडून ( प्रपत्र -1 अ ते 1 ड )  दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहिल.  तसेच तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. तसेच निवेदन स्वीकारण्याची वेळ  सकाळी 2.00 ते 3.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत राहील. सदर लोकशाही दिनात नागरिकांनी मास्क घालने व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.