जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजन - 2021-22.

गडचिरोलीदि.27: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवासंचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयगडचिरोली तथा जिल्हा क्रीडा परिषदगडचिरोलीच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 30 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजताऑनलाईन /Virtual पध्दतीने करण्यात येणार आहे. युवा महोत्सवातील वैयक्तिक स्पर्धा बाबी पुढील प्रमाणे, लोकनृत्य - 20 कलाकार,लोकगीत - 10 कलाकार तरी गडचिरोली जिल्हयातील 15 ते 29 वर्ष वयोगटातील कलावंतांनी आपले अर्ज दि. 29 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयगडचिरोली येथे सहभागी स्पर्धकांचे नावजन्म तारीख व जन्म तारखेचा पुराव्यनिशी सादर करावेस्पर्धेच्या अधिक माहिती करिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा Covid 19 रोगाच्या संदर्भात शासनाच्या सुचनांचे पालन करावे.असे श्री. घनश्याम राठोडजिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.