अखेर नागेपल्ली, ग्राम पंचायतीला लाभले स्थायी ग्राम विकास अधिकारी, सरपंच व सदस्यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
अहेरी :- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नागेपल्ली ग्राम पंचायत ही लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी ग्राम पंचायत असुन दररोज दुरवरून विविध कामासाठी येणाऱ्या लोकांची वरदड खुप असते. परंतु मागील दोन ते तीन वर्षांपासून या ग्राम पंचायतीचा कारभार हा प्रभारी ग्राम सेवकांच्या हाती होते. या ग्रामपंचायतीला स्थायी ग्राम सेवक नसल्या कारणाने अनेक लोकांचे कामे रेंगाळत होती. त्यामुळे लोकांना भरपुर त्रास सहन कराव लागत होते. याबाबतीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती, अहेरी यांचे मार्फत जि. प. अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्थायी ग्राम विकास अधिकारी देण्याबाबत निवेदन देण्यात आले होते.
या निवेदनाची दखल घेऊन शेवटी पदोन्नतीने श्री. एल. बी. वाडके स्थायी ग्राम विकास अधिकारी, म्हणुन रुजु झाले असता नागेपल्ली ग्राम पंचायतीचे सरपंच श्री लक्ष्मण कोडापे, उपसरपंच श्री रमेश शानगोंडावर व इतर ग्रा. प सदस्य यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्थायी ग्राम विकास अधिकारी लाभल्याने लोकांची समस्या कमी होऊन विकास कामांना गती येणार व सर्व प्रशासकीय कामे सुरळीतपणे पार पडतील अशी आशा सरपंच श्री. लक्ष्मण कोडापे यांनी व्यक्त केले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा