आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील गोलाकर्जी-छल्लेवाडा वळणावर दोन मोटर सायकल मध्ये झाले अपघात.
अहेरी :- आज दि-२५/१२/२०२१ रोजी आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील गोलाकर्जी - छल्लेवाडा मध्यंतरी वळणावर दोन मोटर सायकल मध्ये जबर धडक झाले. सदर अपघातात मोटरसायकल क्र-एम.एच-३३ ए-१५०६ ने अर्कापल्ली येथील श्री दिनेश आत्राम वय-२४, श्री रामशाई सोयाम वय-६५ व श्री नागअर्जुन आत्राम वय-१२ याला गुन्डेपल्ली शाळेत घेऊन जात होते. तर विरुद्ध दिशेने एटापल्ली येथील श्री अरुण तेलकुंटावार आपल्या मोटरसायकल क्र- एम.एच -३३-ए-२३७० ने सिरोंचा जात होते. तेव्हा छल्लेवाडा वळणावर दोन्ही मोटरसायकल मध्ये जबर धडक बसुन अपघात झाले.
त्याचवेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री अजय कंकडालवार हे सिरोंचा दौऱ्यावर जात होते, घटनास्थळी पाहता मौक्यावर कोणीच नव्हते, तेव्हा त्यांनी क्षणाचा विलंब न करता रुग्णवाहिका बोलावून स्वतः लहान मुलाला रुग्णवाहिकेत टाकुन सर्वांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. यावेळी जुलेख शेख, राकेश सडमेक आदिंनी सहकार्य केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा