अवघ्या 2 तासात होणारा बालविवाह थांबविला .... जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन,पोलीस स्टेशन गडचिरोली यांची कार्यवाही.

गडचिरोलीदि.29:  आज गडचिरोली जिल्ह्यापासून अगदी 10 किमी अंतर असलेल्या पोर्ला या ठिकाणी सकाळी 11 वाजता एक बालविवाह होणार आहे अशी गोपनीय माहिती सकाळी 8 वाजता मिळाली. लगेच  जिल्हा बाल संरक्षण टीम गडचिरोली व चाईल्ड लाईन टीम यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता पोर्ला गाव गाठले. बालकाची जन्म पुरावा तपासणी करूनबालक 18 वर्षखालील असल्याची खात्री पटल्यानंतर लगेच लग्न घरी वर पक्ष व वधू पक्ष यांना एकत्र बसवून बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायद्यानुसार होणारी कार्यवाही याबाबत उपस्थित सर्वांना माहिती देण्यात आली. वर पक्ष हे राहणार आसेगाव  तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथील असून त्यांना विवाह न करता रिकामे हाथ जाण्याची वेळ जिल्हा बाल संरक्षण कक्षाने आणली.

मुलींच्या वडिलांकडून मुलीचे 18 वर्ष होइपर्यंत बालिकेचे विवाह करणार नाही असे हमी पत्र लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले. सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुलेसंरक्षण अधिकारी कवेश्वर  लेनगुरे प्रियंका आसुटकर समाज कार्यकर्ता जयंत जथाडे क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार व जिल्हा समन्वयक  चाईल्ड लाइन दिनेश बोरकुटे टीम मेंबर तृप्ती पालवैशाली दुर्गेसुनीता पिप्पलशेट्टीवारपोलिस स्टेशन गडचिरोली येथील सहायक पोलिस निरीक्षक पूनम गोरे तसेच शिक्षणाधिकारी निकम  साहेब यांनी बलिकेचे वय निश्चितीकरिता  विशेष सहकार्य केले.

सदर विवाह स्थळी जाऊन 17 वर्ष 4 महिने वय असणाऱ्या बालिकेचा बालविवाह थांबवण्यात जिल्हा बाल सरक्षण टीमपोलीस विभागचाईल्ड लाईन गडचिरोली यांना यश आले. अश्याप्रकारे जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथिल अविनाश गुरनुले मो. नो.9403704834 जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तसेच चाइल्ड लाईन टोल फ्री no1098  या क्रमांकवर बाल विवाह बाबत संपर्क करावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.