GPS फोटो-व्हिडिओंसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; वनजमीन, सरकार कुरण व खाजगी जमिनींमधील उत्खननाची चौकशी करण्याची मागणी. अहेरी, दि. 19 जून 2026 : एटापल्ली व भामरागड तालुक्यातील वनजमीन, सरकार कुरण आणि खाजगी जमिनींमधून मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन करून त्याचा विविध रस्ते, खाण प्रकल्प, स्टॉकयार्ड, पार्किंग, औद्योगिक प्रकल्प व इतर विकासकामांमध्ये वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,एटापल्ली, वन विभाग, महसूल विभाग व इतर संबंधित यंत्रणांकडे सविस्तर तक्रार दाखल करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, परसलगोंदी येथील खाजगी जमीन सर्वे क्र. 178, रेकणार (स.) येथील वन विभागाचे सर्वे क्र. 42, तसेच महसूल विभागाचे सरकार कुरण सर्वे क्र. 159 येथून हजारो ब्रास मुरूम उत्खनन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय विसामुंडी-गुंडापुरी आणि रेकणार-मंगेर मार्गावरील रस्त्यालगत अनेक ठिकाणी मोठमोठे उत्खनन खड्डे अद्यापही अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रारदारांनी सादर केलेल्या GPS छायाचित्रांमध्ये रेकणार (स.), मंगेर (स.) व परसलगोंदी परिसरात मोठ्या प...
अहेरी तालुका, दिनांक-31/10/25 - मौजा छल्लेवाडा येथे आज मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. छल्लेवाडा गावातील प्रमुख नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश करून अजय कंकडालवार यांच्या गडात भगदाड पाडले आहे. या प्रवेश सोहळ्यात किष्ठू बोरकर, राजाराम दुर्गे, तिरुपती दुर्गे, शंकर दहावगावकर, लक्ष्मण जुमडे, तुकाराम बोरकर, तुकाराम जुमडे, देवाजी जुमडे, दिवाकर जुमडे, कमलाकर जगजंपुला, दिवाकर वनकर, प्रभाकर वनकर, जिवन भसारकर, व्येंकटी बोरकर, आनंदराव दुर्गे आणि गणपती डोंगरे या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या उपस्थितीत सर्वांनी पक्षाचा झेंडा स्वीकारला. या वेळी कार्यकर्त्यांनी भाग्यश्रीताई यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून पक्षबांधणीसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना, छल्लेवाडा गावातील हा प्रवेश अजय कंकडालवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून छल्लेवाडा हा कंकड...
सिरोंचा, दिनांक 26/10/2025 :– सिरोंचा तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशनसमोर झालेल्या भीषण अपघातात पिंटीपाका येथील ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक किंवा सावधानता फलक न लावल्याने हा अपघात झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या निष्काळजीपणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आणि कंत्राटदार ए. सी. शेख कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांच्यावर ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा’ दाखल करण्याची मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे. दिशादर्शक फलक नसल्याने चालकाचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी बामणी गावाजवळ ट्रॅक्टर चालवित असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. घटनास्थळीच चालकाचा मृत्यू झाला. स्थानिकांनी सांगितले की, महामार्गावर धोक्याचे किंवा दिशा दर्शविणारे कोणतेही फलक नसल्याने चालकाला पुढील वळणाची कल्पना आली नाही, परिणामी अपघात झाला. २ कोटी रुपयांची...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा