सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी संकेतस्थळ सुरु.

गडचिरोली,दि.30: अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास विभागाच्या https://mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. सन 2021-22 मध्ये प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी महाडिबीटीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्याची सुविधा माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. महाडीबीटी संगणकीय प्रणालीत सन 2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत अर्ज नुतनीकरणासाठी दि.4 जानेवारी 2022 व नवीन अर्ज भरण्यासाठी दि.9 जानेवारी 2022 अंतिम मुदत शासनातर्फे देण्यात आलेली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या योजना, अर्ज करण्याची निकष व अटी सदर संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेले आहे. सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज सादर करावे असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर सिद्धार्थ गायकवाड हे करीत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.