ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ.
गडचिरोली, दि.28 :अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही.अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, शेणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदिआवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. शासन निर्णय दि .१३ जून २०१८ च्या सुधारीत तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.
कोरोनामुळे २०२०-२१ मध्ये सर्व महाविद्यालये बंद होती. शिक्षण ऑनलाईन सुरु होते अशा विद्याथ्यांना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ द्यायचा किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला असून विद्यार्थ्यांकडून अर्जच भरुन घेतले नव्हते. कारण या योजनेसाठी ७५ टक्के उपस्थिती ग्राह्य धरली जाते. नुकतीच ही अडचण शासनामार्फत दूर करण्यात आली असून ऑनलाईन शिक्षण असले तरी विद्याथ्यांची ऑनलाईन ॐ टक्के उपस्थिती ग्राह्य धरुन २०२०-२१ या वर्षातील विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्याचे आदेश नुकतेच निमित करण्यात आलेले असल्यामुळे २०२१-२२ या वर्षातही शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन २०२०-२१ व सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरीता विद्याव्यांनी ३१
डिसेंबर २०२१ पर्यंत संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे अर्ज सादर करावे असे
आवाहन डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर डॉ. सिद्धार्थ गायकवाड, यांनी केलेआहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा