बैलगाडी शर्यत (शंकरपट) करीता शासनाची सशर्त परवानगी.

किमान 15 दिवस आधी आवश्यक कागदपत्रासह जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आवश्यक

गडचिरोलीदि.27: महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक 21 डिसेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार राज्यात बैलगाडी शर्यत ( शंकरपट) आयोजन करण्यात विहित अटी व शर्तीच्या अधिन राहुन सुरु करण्यास परवानगी प्रदान केली आहे. सदर शर्यतीचे आयोजन करतांना प्राण्यांना कृरतेने वागविल्यास प्रतिबंध करण्याबाबत (बैलगाडी शर्यतीचे आयोजन) नियम 2017 मध्ये विहीत करण्यात आलेल्या नियम व अटीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.

बैलगाडी शर्यतीचे आयोजन करु इच्छिणाऱ्या आयोजकास किमान 15 दिवस आधी आवश्यक कागदपत्रासह विहीत नमुण्यात व रुपये 50,000/- इतक्या प्रतीभुती ठेवीसह जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शर्यतीमध्ये सहभाग घेण्यासाठी गाडीवन म्हणून बैलगाडी शर्यतीत सहभाग घेऊ इच्छिणारा कोणताही गाडीवान म्हणून ओळखीबाबतचा पुरावा आणि बैल व वळु यांचे छायाचित्रासह 48 तास आधी शर्यत आयोजकाकडे विहीत नमुण्यात अर्ज करण्यास बांधील राहील.

सोबत नोंदणीकृत पशुवैद्यकीय व्यवसायका कडुन बैलाची /वळुजी तपासणी करुन ते निरोगी असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. या गाडीवानाकरीता व बैलाकरीता अर्जाचे नमुणे आणि पशुवैद्यकीय स्वास्थ प्रमाणपत्रे आयोजकांनी प्राप्त केली असेल केवळ तोच गाडीवान व बैल शर्यतीत भाग घेवु शकतो.

शर्यत आयोजकांना स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तीची माहिती बैलगाडी शर्यतीचा अनुपालन अहवाल आणि संपूर्ण आयोजनाचे डिजीटल स्वरुपातील चित्रिकरण जिल्हाधिकारी यांना शर्यतीनंतर 15 दिवसांच्या आत सादर करावे लागतील. जर कोणत्याही आयोजकाने व गाडीवाणाने अधिनियमांचा वा देण्यात आलेल्या परवानगीच्या तरतुदींचे उल्लघन केल्याचे आढळल्यास त्यांना दंड व शिक्षा ठोठावली जाऊ शकते असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.