जळगाव जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागातील भ्रष्टाचारा संदर्भात पूर्ण चौकशी करणार - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू.

मुंबई,दि.28 : जळगाव जिल्ह्यात  शालेय शिक्षण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून संबधित शिक्षणाधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई  केली असून त्यांना बडतर्फ करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

विधानपरिषद सदस्य किशोर दराडे यांनी जळगाव जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून सन २०१५ ते २०१९ या कालावधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आला आहे याबाबत शासनाकडून संबधितावर कोणती कारवाई केली याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. चर्चेत सदस्य ॲड. मनीषा कायंदे यांनीही सहभाग घेतला.

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शालार्थ क्रमांक देण्यामध्ये झालेल्या अनियमिततेच्या चौकशीबाबतीत समिती गठित करण्यात आली आहे. तसेच नाशिक व जळगाव जिल्ह्यातील शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट केलेल्या ३६४ प्रकरणांच्या नस्त्या चौकशी समितीकडे जमा केलेल्या आहेत. तसेच या प्रकरणातील शिक्षणाधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद केलेला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे तसेच त्यांना आता सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, अशी माहिती विधानपरिषदेत दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.