पोस्ट्स

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

इमेज
GPS फोटो-व्हिडिओंसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; वनजमीन, सरकार कुरण व खाजगी जमिनींमधील उत्खननाची चौकशी करण्याची मागणी. अहेरी, दि. 19 जून 2026 : एटापल्ली व भामरागड तालुक्यातील वनजमीन, सरकार कुरण आणि खाजगी जमिनींमधून मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन करून त्याचा विविध रस्ते, खाण प्रकल्प, स्टॉकयार्ड, पार्किंग, औद्योगिक प्रकल्प व इतर विकासकामांमध्ये वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,एटापल्ली, वन विभाग, महसूल विभाग व इतर संबंधित यंत्रणांकडे सविस्तर तक्रार दाखल करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, परसलगोंदी येथील खाजगी जमीन सर्वे क्र. 178, रेकणार (स.) येथील वन विभागाचे सर्वे क्र. 42, तसेच महसूल विभागाचे सरकार कुरण सर्वे क्र. 159 येथून हजारो ब्रास मुरूम उत्खनन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय विसामुंडी-गुंडापुरी आणि रेकणार-मंगेर मार्गावरील रस्त्यालगत अनेक ठिकाणी मोठमोठे उत्खनन खड्डे अद्यापही अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रारदारांनी सादर केलेल्या GPS छायाचित्रांमध्ये रेकणार (स.), मंगेर (स.) व परसलगोंदी परिसरात मोठ्या प...

उन्हाळी प्रशिक्षण शिबीराअंतर्गत स्पोर्टस् इंज्युरी व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शनाचे आयोजन संपन्न

गडचिरोली, (जिमाका) दि.०२: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा प्रचार आणि प्रसार व्हावा व खेळाडूंना खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ११ मे २०२६ ते ३० मे २०२६ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, कॉम्पलेक्स एरिया, गडचिरोली, शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली व क्रीडा प्रबोधिनी, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे सकाळी ६.०० ते ८.३० व सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण शिबीरात कुस्ती, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, बॉक्सिंग, बॉस्केटबॉल, मैदानी व बॉल बॅडमिंटन या खेळाचे २०० ते २५० प्रशिक्षणार्थी नियमित तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहेत.  स्पर्धेदरम्यान खेळाडूंना स्पोर्टस् इंज्युरी झाल्यामुळे अनेकदा खेळाडूला स्पर्धा तथा सरावापासून वंचीत राहावे लागते. झालेली इंज्युरी / दुखापत दुरुस्त करण्याकरीता किंवा टाळण्याकरीता प्रशिक्षण शिबीराचाच एक भाग म्हणून २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ०७.०० वाजता स्पोर्टस् इंज्युरी व त्यावरील उपाययोजना तथा समुपदेशन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान ज...

तूर मिनिकिट वितरणाचे आयोजन

इमेज
MahaDBT पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन गडचिरोली, (जिमाका) दि.०२: खरीप हंगाम २०२६-२७ अंतर्गत शेतकऱ्यांना दर्जेदार तूर बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत तूर मिनिकिट वितरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी MahaDBT पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. तूर हे जिल्ह्यातील प्रमुख कडधान्य पीक असून उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी सुधारित वाणांच्या बियाण्यांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागामार्फत निवडक शेतकऱ्यांना तूर मिनिकिट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी MahaDBT पोर्टलवर ( https://mahadbt.maharashtra.gov.in ) अथवा आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र (CSC) मार्फत अर्ज करावा. अर्ज करताना Agristack Farmer Id/आधार क्रमांक, ७/१२ उतारा, ८-अ उतारा व इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत असणे आवश्यक आहे. लाभार्थी निवड लाभार्थ्याचे Agristack Farmer Id असणे अनिवार्य आहे.लाभार्थीची निवड महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलद्‌वारे "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यानुसार करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु असून, योजनेचा ल...

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - तेलबिया आणि कडधान्य आत्मनिर्भयता अभियान २०२६-२७ अंतर्गत १० टन क्षमतेचे तेल काढणी युनिट, मिनी ऑईल मिल, २५० मे. टन गोदामआणि कडधान्य प्रक्रिया-पॅकेजिंग युनिट्ससाठी अनुदान

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.०२: गडचिरोली जिल्ह्यातीलभुईमूग, करडई, व इतर तेलबिया तसेच तूर, हरभरा व इतर कडधान्य पिकांचे काढणीपश्चात होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर मूल्यवर्धनाला (Value Addition) चालना देण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया (NMEO-OS)आणि कडधान्य आत्मनिर्भयता अभियान २०२६-२७ च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात काढणी पश्चात पायाभूत सुविधा (Post-Harvest Infrastructure) घटकांतर्गत प्रक्रिया युनिट्स आणि गोदाम बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. गोदाम बांधकाम योजना (२५० मे. टन क्षमता) तेलबियांच्या उत्पादनानंतर सुरक्षित साठवणूक व्हावी आणि मूल्यवृद्धी व्हावी या उद्देशाने २५० मे. टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी खालील निकषांनुसार अर्थसाहाय्य दिले जाते: अंदाजित खर्च व अनुदानाची मर्यादा: मार्गदर्शक सूचनांनुसार रुपये ११,५२१/- प्रति मे. टन याप्रमाणे २५० मे. टन क्षमतेच्या गोदामासाठी एकूण अंदाजित खर्च २८,...

तुळशी येथे खरीपपूर्व भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
आधुनिक तंत्रज्ञानामुळे भात शेती अधिक किफायतशीर व उत्पादनक्षम होणार गडचिरोली, (जिमाका) दि.०१: कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने वडसा तालुक्यातील मौजा तुळशी येथे खरीप हंगामपूर्व भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सगुणा भात लागवड तंत्रज्ञान (SRT), पेरणी यंत्राद्वारे भात लागवड (DSR), माती परीक्षण व बीज प्रक्रिया याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन करण्यात आले.  कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती प्रीती हिरळकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर टाळून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन केले. जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, हिरवळीची व कंपोस्ट खते तसेच पीक फेरपालट यांचा अवलंब करण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी पी. डी. खंडाळे यांनी सगुणा भात लागवड तंत्रज्ञानाची माहिती देत शून्य मशागत पद्धतीचे फायदे स्पष्ट केल...

तंबाखूमुक्त समाजासाठी जनजागृतीची गरज; जागतिक तंबाखू विरोधी दिन उत्साहात साजरा

इमेज
जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे चित्रकला व निबंध स्पर्धांद्वारे जनजागृती गडचिरोली, (जिमाका) दि.०१: "भ्रामक आकर्षणाचा पर्दाफाश करूया; निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाविरुद्ध लढा देऊया" या जागतिक घोषवाक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे जागतिक तंबाखू विरोधी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक परिणामांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वतः डॉ. लहाडे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. छाया उईके (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ. बागराज धूर्वे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. इंद्रजीत नगदेवते (भिषक तज्ज्ञ), डॉ. मनीष मेश्राम (भिषक तज्ज्ञ), डॉ. चंद्रशेखर शानगोंडा (दंत शल्यचिकित्सक), डॉ. प्रेरणा राऊत (जिल...

जिल्हास्तर क्रीडा पुरस्कार २०२१-२२ करीता प्रस्ताव आमंत्रीत

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२७: महाराष्ट्र शासनाचे क्रीडा धोरण २००१ अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडापटू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे/योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला), दिव्यांग गुणवंत खेळाडू सन २०२१-२२ या वर्षातील पुरस्कार वितरीत करावयाचा आहे. पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम रु.१०,०००/- असे आहे. त्या अनुषंगाने सन २०२०-२१ च्या पुरस्कारासाठी या कार्यालयामार्फत बंद लिफाफ्यात विहित नमुन्यातील परिपुर्ण प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. पुरस्काराचे निकष : (१) पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असले पाहिजे, (२) क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्याने वयाची ३५ वर्षे पुर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल, (३) दिव्यांग खेळाडू व गुणव...