दिनांक: 29 डिसेंबर 2021गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतात पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीला सूचना द्यावी.

गडचिरोलीदि.29:  दिनांक २७  २८ डिसेंबर २०२१ रोजी राज्यात काही ठिकाणी गारपीटअवेळी पाऊस यामुळे खरीप हंगामातील उभ्या असलेल्या तूर कापूस तर काही प्रमाणात काढणी  झालेल्या तुरीचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामात विमा संरक्षित गहूहरभरारब्बी ज्वारी यासारख्या पिकांचे देखील नुकसान झाले आहेयाबाबत अधिसूचित महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानीबाबत सूचना देणेआवश्यक असल्यामुळे, याबाबतची पूर्वसूचना(intimation) आपल्या संबंधित विमा कंपनी यांना देण्याकरता

पुढील पर्यायांचा वापर करता येईल.


क्रॉप इन्शुरन्स ॲप (Crop Insurance App)

विमा कंपनी टोल फ्री क्रमांक

विमा कंपनीचा ई-मेल

विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय

कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय

ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा. 

           

त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी  घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले असल्यास याबाबतची पूर्वसूचना (intimation) आपल्या संबंधित विमा कंपनीकडे विहित कालमर्यादेत सादर करावे असे कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.