पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आत्तापर्यंत जिल्हयात एकूण बाधितांपैकी 10 हजार कोरोनामुक्त झाले.

इमेज
आज नव्याने 41 कोरोनामुक्त तर एका मृत्यूसह इतर 28 नवीन कोरोना बाधित गडचिरोली : - दि-२९  जिल्हयात एकूण कोरोना बाधितांपैकी कोरोनामूक्त रूग्णांचा आकडा 10 हजार पूर्ण झाला. आज जिल्हयात 41 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच 28 नवीन कोरोना बाधित आढळून आले. आत्तापर्यंत एकूण बाधित  10518  पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10,00,1 वर पोहचली. तसेच सद्या 407 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 110 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन एका मृत्यूमध्ये वडसा येथील 85 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्के ,  सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.87 टक्के तर मृत्यू दर 1.05 टक्के झाला. न वीन 28 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 17 ,  अहेरी तालुक्यातील 3 ,  आरमोरी तालुक्यातील 4 ,  चामोर्शी तालुक्यातील 1 ,  एटापल्ली तालुक्यातील 02 ,  कुरखेडा तालुक्यातील 01 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 41 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 24 , अ...

गडचिरोली जिल्ह्यातील खोब्रामेंढा जंगलात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत पाच माओवाद्यांचा खात्मा.

इमेज
गडचिरोली  : - २९- गडचिरोली येथील पोलीस उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीच्या खोब्रामेंढा जंगलात सोमवार, २९ रोजी सकाळी ७.३० ते ८ या वेळेत झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार झाले. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी याला दुजोरा दिला. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये ३ पुरूष व २ महिला नक्षलवादी असल्याची माहिती पाटील यांनी दिली. शनिवार २८ मार्चपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहे. आतापर्यत दोन चकमकी झाल्या आहे. शनिवारी सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. या चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळल्या जात असलेल्या टिसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली. तेव्हा अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया यांच्या नेतृत्वाखाली खोब्रामेंढा, हेटाळ...

होळी, धुलीवंदन साधेपणाने साजरा करा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आवाहन.

इमेज
गडचिरोली : -  दि.26: महाराष्ट्र राज्यात सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे आढळून येत आहे. त्याअनुषंगाने दि. 08 मार्च 2021 रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये मा. मुख्यमंत्री महोदयांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दीपक सिंगला यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन आदेश निर्गमित केले आहेत. दिनांक 28 मार्च 2021 रोजी होळी व दिनांक 29 मार्च 2021 रोजी धुलीवंदन उत्सव होत असून सदर उत्सव कार्यक्रमात नागरीक मोठया प्रमाणात एकत्रीत येऊन गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कोविड-19 संबंधात वेळोवेळी शासनाने करुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणार नाही.  त्याअनुषंगाने होळी, धुलीवंदन सण कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात घेण्यास मनाई करण्यात आली आहे. सदरील आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिब...

जागतिक क्षयरोग दिन साजरा.

इमेज
गडचिरोली : - दि.25: जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था गडचिरोली अंतर्गत जिल्हा कुष्ठरोग कार्यालयामध्ये जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सांळुखे, प्रमुख पाहुणे म्हणून  अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मडावी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके, वैद्यकिय अधिकारी डॉ.रुपेश पेंदाम उपस्थित होते.           जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधुन 13 क्षयरोग पथकाअंतर्गत विविध क्षयरोग जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी विविध शाळांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा स्तरावर त्यांचे परिक्षण करण्यात आले. त्यांना जागतिक क्षयरोग दिनाच्या दिवशी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.        जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमामध्ये डॉ. अनिल रुडे, डॉ.सुनिल मडावी, व डॉ. सचिन हेमके यां...

वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वीजरोधक पोल यंत्र उभारणीसाठी 33 कोटी रुपये मंजूर गडचिरोली जिल्ह्यातील 475 ग्राम पंचायतीसाठी 11 कोटी 56 लक्ष मंजूर.

इमेज
गडचिरोली : -  दि.24: चंद्रपूर आणि गडचिरोली  जिल्हयात पावसाळ्यात व अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात  विज पडून निष्पाप लोकांचा बळी जातो. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून मदत  व पुनर्वसन विभागाकडून  चंद्रपूर जिल्हयातील 827 ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधकपोल यंत्र लावण्यात येणार असून त्यावर 20 कोटी 92 लक्ष रूपये तसेच गडचिरोली जिल्हयातील 475 ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधकपोल यंत्र लावण्यात येणार असून त्यावर 11 कोटी 56 लक्ष रुपये मंजूर करण्यात  आले आहे. या कामाचा शु्भारंभ ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी येथे 22 मार्चला ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधक पोल यंत्र उभारून या कामाचा शुभारंभ केला आहे.          चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयात पावसाळ्यात व अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाट होऊन वीज पडून अनेक निरपराध लोकांचा बळी जात  आहे तर काही लोक गंभीर जखमी  होत आहे.  त्यामुळे त्यांचे कुटुंब, त्यांचे संसार उध्वस्त होऊन आर्थिक व माणसिक त्रास त्यांच्या वारसांना सहन करावा लागत आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या  निधीतून वीज प्रतिबं...

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या रेती संबंधित आदेशामुळे शासणाच्या महसुलात वाढ होऊन, कंत्राटदारांचा लुट थांबुन चाप बसेल.

इमेज
गडचिरोली : - शासकीय बांधकामाच्या माध्यमातून कंत्राटदाराकडून होणारी शासनाची संभाव्य लुट गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दि-१०/०३/२०२१ च्या आदेशान्वये थांबवली आहे. सदर आदेश कंत्राटदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असला, तरी तो शासनाच्या हीताचा असल्याने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे अभिनंदन करायलाच हवे. सदर आदेश हा वाळु/रेती संबंधी आहे. रेती ही नैसर्गिक देण आहे. कुणीही काहीच न करता आपोआप नदी, नाल्यात जमा झालेली रेती शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसुल मिळवुन देऊ शकते. किंबहुना गडचिरोली सारख्या जिल्ह्यात या महसुलाचा आकडा हा मद्यापासुन मिळणाऱ्या महसुलाच्या बरोबरीत असु शकतो. अलीकडेच उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्य शासनाने राज्यातील सर्व रेतीघाटांचे मुल्य एकच केले आहे. १४१५ रुपये प्रति ब्रास. प्रत्येक रेतीघाटातुन प्रति ब्रास तेवढा महसुल शासनाला मिळणे अपेक्षित आहे. गडचिरोली जिल्ह्यात नुकतेच काही घाटांचे लिलाव झाले, तेही याच दराला केंद्रस्थानी ठेवून. त्यामुळे शासनाच्या महसुलात प्रचंड वाढ झाली.  परंतु शासन रस्ते, पूल, कलवट, बंधारे, इमारती इत्यादी कामे कंत्रा...

आज जिल्ह्यात 23 नवीन कोरोना बाधित तर 38 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : - दि.22: आज जिल्हयात 23 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 38 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10164 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9754 वर पोहचली. तसेच सद्या 302 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.97 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.97 टक्के तर मृत्यू दर 1.06 टक्के झाला.            नवीन 23 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 18,  भामरागड तालुक्यातील 1,  धानोरा तालुक्यातील 1, चामोर्शी 2, तर वडसा तालुक्यातील 1 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 38 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 21,  आरमोरी 5, धानोरा 1, एटापल्ली 3, कोरची 6,  कुरखेडा 4, तर वडसा  मधील 2 जणांचा समावेश आहे.      नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये सर्वोदय वार्ड 2, नवेगाव 2, गुरुकुंज कॉलनी 1, शाहू नगर 3, वनश्री कॉलनी 2,...

24 मार्च 2021 जागतिक क्षयरोग दिन जिल्हयाला भविष्यात क्षयरोग मुक्त करण्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आवाहन.

इमेज
गडचिरोली : - दि.22: 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग म्हणून साजरा करण्यात येतो. राबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी 24 मार्च 1882 मध्ये मायकोबॅक्टेरीअम टयुबरक्युलोसीस य जिवाणूचा शोध लावला. म्हणून 24 मार्च हा दिवस आपण जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करतो. सन 1905 मध्ये त्यांना औषध शास्त्रामधील उत्कृष्ठ कामगिरी बद्दल मानाचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.              या रोगाने संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक देशातील शासन आपले स्थरावर अथक प्रयत्न करीत आहे. भारतामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सन 1962 पासून प्रस्थापित जिल्हा क्षयरोग केंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा क्षयरोग दवाखान्यामध्ये राबविला जात आहे. प्रांरभीच्या काळापासूनच या कार्यक्रमाची सांगड सर्वसामान्य आरोग्य सेवांशी घालण्यात आली होती आणि क्षयरोग विषयक सेवांचे वितरण प्राथमिक सेवांच्या माध्यमातून करण्यात येत होते.               आरोग्य सेवा सामान्य जनतेपर्यंत पोचविण्यात आपण अग्रेसर आह...

येणाऱ्या उन्हाळयात उष्माघात होवू नये म्हणून काळजी घ्या : आरोग्य विभाग,गडचिरोली

इमेज
गडचिरोली : -  दि.19: गडचिरोली  जिल्हयातील 15 मार्च ते 30 जुन या कालावधीमध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे मृत्यू होणे संभवणीय असते. उष्माघाताने मृत्यू होवू नये म्हणून आतापासूनच जागृत राहीले पाहिजे. जनतेला माहिती होणे व रुग्णांना तातडीने औषद्योपचार मिळण्यासाठी प्रा.आ.केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा तसेच येणाऱ्या उन्हाळयात उष्माघात होवू नये म्हणून काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.  उष्माघात होण्याची कारणे :- उन्हामध्ये शेतावर  अथवा इतर मजुराची कामे फार वेळ करणे. कारखान्याच्या बॉयलर रुम मध्ये काम करणे काच कारखान्यातील कामे करणे. जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे. घट्ट कपडयाचा वापर करणे. अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो. लक्षणे:- थकवा येणे ताप येणे त्वचा कोरडी पडणे. भूक न लागणे चक्कर येणे निरुत्साही होणे डोके दुखणे.रक्तदाब वाढणे मानसिक बेचैन व अस्वस्थता बेशुद्वावस्था इत्यादी. प्रतिबंधक उपा...

आज जिल्ह्यात 48 नवीन कोरोना बाधित तर 41 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : -  दि.19: आज जिल्हयात 48 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 41 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10068 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9659 वर पोहचली. तसेच सद्या 301 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.94 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.99 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.            नवीन 48 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 19, आरमोरी तालुक्यातील 7, भामरागड तालुक्यातील 8, धानोरा तालुक्यातील 6, एटापल्ली तालुक्यातील 2, कुरखेडा 2, तर वडसा तालुक्यातील 4 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 41 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 32, अहेरी 2, आरमोरी 3, चामोर्शी 1, धानोरा 1, तर वडसा मधील 2 जणांचा समावेश आहे.      नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 1, प्रोजेक्ट कार्यालय आयटीआय डीपी 2, ग्रामसेवक कॉलनी 3,...

ग्राम बाल संरक्षण समिती विषय देसाईगंज येथे एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.

इमेज
गडचिरोली : -  दि.19: दि. 18 मार्च 2021 रोजी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्यावतीने ग्राम बाल संरक्षण समिती विषयी देसाईगंज तालुक्यातील अंगणवाडी सेविका व पोलीस पाटील यांचे एक दिवसीय प्रशिक्षण पंचायत समिती सभागृह देसाईगंज येथे आयोजित करण्यात आले होते.           प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन  बाल विकास प्रकल्प अधिकारी, देसाईगंज, श्रीमती कुचिक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणाला प्रमुख अतिथी म्हणून सांख्यिकी विस्तार अधिकारी देसाईगंज, श्रीमती हेमके, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पुरते,  तसेच कनिष्ठ संरक्षण अधिकारी, देसाईगंज श्रीमती साठवणे उपस्थित होते.  प्रशिक्षण हे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नारायण पंराडे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.               प्रशिक्षणाला देसाईगंज तालुक्यातील अंगणवाडी सेविका व पोलिस पाटील उपस्थित होते. प्रशिक्षणार्थींना सामाजिक कार्यकर्ता, ( मास्टर ट्रेनर ) तनोज ढ...

शासकीय आदिवासी वस्तिगृहात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे! आदिवासी विद्यार्थ्यांची हेळसांड खपवून घेणार नाही - आमदार डॉ देवराव होळी.

इमेज
गडचिरोली  : - 19 मार्च 2021 गडचिरोली विधानसभा मतदार संघातील पोटेगाव येथील शासकीय आदिवासी वसतिगृह येथे आज येथील आमदार डॉ देवराव होळी यांनी सदिच्छा भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. वस्तीगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सोबत संवाद साधला, तसेच नवनिर्माण होत असलेल्या दोन अद्यावत मुला मुलींचे वसतिगृहचे पाहणी केले. यावेळी बोलतांना आमदार डॉ देवराव होळी यांनी सांगितले शासकीय वसतिगृहातील समस्त विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना राज्य सरकारच्या सर्व सोयीसुविधा लाभ देण्यात यावे व शासकीय वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचे हेळसांड खपवून घेणार नाही असा इशारा दिला.    यावेळी प्रामुख्याने पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास पाटील दशमुखे, पंचायत समिती सदस्य नेताजी गावतुरे, मालता ताई मडावी भाजपा गडचिरोली तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे मुख्याध्यापक ब्राम्हणकर, शिक्षक सुधीर शेंडे, शिक्षक नैताम, एस.आर.मंडलवार, अधीक्षक एस.आर.जाधव, अधिक्षिका बी.डी.वाळके, शिक्षक व्ही.एस.देसू व इतर कर्मचारी उपस्थित होते.

खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या कारखान्यांवरअन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा.

मुंबई : -  दि. 17 : गोपनीय माहितीच्या आधारे दि. 15 मार्च 2021 रोजी सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार यांनी त्यांच्या पथकासह ओमकार ट्रेडिंग कंपनी व मे. शिवय ट्रेडिंग कंपनी, सातिवली, वसई (पु) या दोन खाद्यतेल रिपॅकींग करणाऱ्या आस्थापनांवर छापा टाकला यामध्ये 32 लाखापेक्षा जास्त किंमतीचे विविध खादतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.  या ठिकाणी खाद्यतेलांमध्ये भेसळ होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच खाद्यतेलाच्या रिपॅकींगसाठी जुन्या टीनचा पुनर्वापर होत असल्याचे दिसून आले. खाद्यतेलाच्या काही पाउचमध्ये पाकिटावर नमूद केलेल्या वजनापेक्षा कमी वजनाचे खाद्यतेल भरले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या दोन्ही आस्थापनांमधून सुमारे ३२,५०,५६८/- रुपये किंमतीचा विविध खाद्यतेलांचा साठा जप्त करण्यात आला आहे.  या प्रकरणी विश्लेषणासाठी  घेण्यात आलेल्या खाद्यतेलांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल प्राप्त होताच दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल.  सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर  व आयुक्त अभिमन्यू काळे यांच्...

कृषी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र एक एप्रिलपासून.

इमेज
‘ सीईटी’सोबतच बारावीच्या गुणप्रमाण निश्चितीसाठी समिती; नवीन कृषी शैक्षणिक धोरण निश्चितीसाठीही समिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई , दि. 17 : कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेची चौथी फेरी महाविद्यालयस्तरावर पार पडल्यानंतर यंदाचे कृषी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र एक एप्रिलपासून सुरु होणार आहे. वीस-वीस आठवड्यांच्या दोन सत्रात येत्या डिसेंबरमध्ये शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्यात येणार आहे. नवीन कृषी शिक्षण धोरणांच्या आखणीसाठी तसेच यापुढे उच्च शिक्षणप्रवेशाच्या पात्रतेसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सोबतच बारावीच्या परीक्षेचे  गुणप्रमाण निश्चित करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी. या समितीने एक महिन्याच्या कालमर्यादेत दि. ३० एप्रिलपर्यंत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.     राज्यातील 'प्रवेश प्रक्रिया व आगामी कृषी शिक्षण धोरणा’संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय...

एकूण 83 रब्बी पिक असलेल्या गावाची अंतिम पैसेवारी जाहीर.

गडचिरोली : -  दि.15: रब्बी पिकाची पैसेवारी संकलीत करुन सन 2020-21 या वर्षाची रब्बी पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हयाची अंतिम सरासरी पैसेवारी ही 0.69 आहे. जिल्हयात एकूण 1688 गावे असून, रब्बी पिकाची गावे 148 आहेत,. त्यापैकी रब्बी गावामध्ये पीक नसलेली गावे 65 आहेत. रब्बी पीक असलेल्या 83 गावापैकी 50 पैशाचे आतील गावे 0 असून, 50 पैशाचे वर पैशेवारी असलेल्या  एकुण रब्बी पिक असलेल्या गावांची संख्या उर्वरित सर्व 83 आहेत. अशा प्रकारे एकूण 83 रब्बी पिक असलेल्या गावाची पैसेवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केलेली आहे.  तालुका निहाय सुधारीत पैसेवारी :  गडचिरोली-0.53, आरमोरी-0.68, अहेरी-0.72 व सिरोंचा-0.63,  गडचिरोली जिल्हयाची  एकुण सरासरी रब्बी  हंगाम 2020-21 या वर्षाची सुधारीत  पैसेवारी 0.69 आहे. सदर पैसेवारी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी जाहीर केली आहे.

आज जिल्ह्यात 31 नवीन कोरोना बाधित तर 21 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : -  दि.14: आज जिल्हयात 31 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 21 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9886 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9537 वर पोहचली. तसेच सद्या 241 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.47 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.44 टक्के तर मृत्यू दर 1.09 टक्के झाला. नवीन 31 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 20, अहेरी तालुक्यातील 4, आरमोरी तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 2, धानोरा तालुक्यातील 1, तर वडसा तालुक्यातील 3 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 21 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 13, अहेरी 1, चामोर्शी 4, धानोरा 1, तर कुरखेडा मधील 2 जणांचा समावेश आहे.      नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील साई ट्रॅव्हल्स जवळ 1, नवेगाव 2, पोटेगाव बायपास रोड 2, गोकुलनगर 2, राणी दुर्गावती विद्यालय 5, कलेक्टर कॉलनी 2, एमआयडीसी रोड 2, ...

नागेपल्ली येथे नियमित ग्रामसेवक देण्यात यावे नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांची मागणी.

इमेज
अनिल आलाम- झिमेला ग्रामीण प्रतिनिधी   अहेरी  : - तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत येथील सर्व ग्राम पंचायत सदस्य व सरपंच यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती, अहेरी यांना निवेदन दिले. निवेदनात असे म्हटले आहे की, अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्राम पंचायत लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी ग्राम पंचायत असुन यामध्ये नागेपल्ली, मोदुमडगु, मलमपल्ली, येंकापल्ली, टेकमपल्ली, पुसुकपल्ली, संड्रा , असे 7 गावे मोडत असुन जवळपास 7999 इतकी लोकसंख्या आहे. दररोज कितीतरी नागरिक या कार्यालयात कामानिमित्त येतात. परंतु येथील ग्राम विकास अधिकारी एल. के. पाल असून त्यांना कमलापुर ग्राम पंचायत येथील अतिरिक्त पदभार दिल्याने ग्राम पंचायत नागेपल्ली येथे नियमित सेवा देण्यास त्यांना अडचणी निर्माण होत आहे. परिणामी नियमित ग्रामसेवक नसल्याने विविध विकास कामे लोकांचे अडून आहेत. या सर्व बाबींचा विचार करून ग्राम पंचायत नागेपल्ली येथे नियमित ग्रामसेवक देण्यात यावे असे निवेदन देऊन चर्चा करण्यात आले व निवेदनाच्या प्रतिलिपी जि. प. अध्यक्ष, गडचिरोली, मा. आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जि. ...

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त महसूल शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचेकरीता पेंशन अदालतीचे आयोजन.

इमेज
गडचिरोली : -  दि.10: सेवानिवृत्त महसूल शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीय प्रकरणातील अडचणीचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 16 मार्च 2021 रोजी सकाळी  11.00 ते 1.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे पेंशन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. विहीत नमुन्यातील प्रलंबीत प्रकरणा संबंधातील माहिती व पेंशन अदालतमध्ये प्राप्त होणाऱ्या प्रकरणा संबंधातील  सविस्तर माहिती घेवून नायब तहसिलदार (नियमीत) यांना या कार्यालयात नियोजित वेळेत न चुकता उपस्थित राहण्यास निर्देशीत करावे. तसेच पेंशन अदालत आयोजित करण्यात आल्याबाबत संबंधीत सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांना हजर राहण्याबाबत आपले स्तरावरुन कळविण्यात यावे. असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

विविध कौशल्य विकास कार्यक्रम 2020-21 अंतर्गत विविध कोर्समध्ये गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना प्रशिक्षण.

इमेज
गडचिरोली : -  दि.१०: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयामार्फत DPDC अंतर्गत विविध कोर्सेमध्ये गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता जिल्हयातील युवक-युवतींना प्रशिक्षणाकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली  फोन. क्रमांक ०७१३२-२२२३६८ या कार्यालयाशी किंवा पुढील दिलेल्या प्रशिक्षण केंद्राशी त्वरीत संर्पक साधावा.     प्रशिक्षण केंद्राचे नांव- १) एन.डी. जेम्स, बल्लारपूर,जि. चंद्रपूर GemsStoneProcessing cum polising श्री. गुल्हाने, ९४२१९२६१४०,९६२३९१३१७१ ,  २) पार्कसन स्किल, धंतोली, नागपूर Bedside assistant  संगिता मॅडम- ९१७५९७२५९६,  ऋतिका मॅडम-७५५८७५३५३३,  ३) कृषी विज्ञान केंद्र  गडचिरोली BROILER POULTRY/ MUSHROOM CULTIVATION , कदम साहेब ,९८६९४७८८५९,  असे आवाहन प्र.वा.खंडारे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हयात आठवडी बाजारावर बंदी.

इमेज
सार्वजनिक उत्सव तसेच इतर सन साधेपणाने साजरे करा : जिल्हाधिकारी दीपक सिंगला गडचिरोली : -  दि.१०: राज्यात सद्यास्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे आढळून येत आहे. त्याअनुषंगाने मा. मुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत निर्देश याआगोदरच दिले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी सामाजिक अंतर राखून केवळ दैनिक बाजार भरविण्यास परवानगी देणेत आली आहे. परंतू जिल्ह्यात कोणत्याही भागात आठवडी बाजार भरविण्यास आज दिलेल्या आदेशान्वये सक्त मनाई करण्यात आली आहे. सदरील आदेश शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने पुढील आदेशापर्यंत निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेश निर्गमित करीत असताना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी येत्या काळातील सर्व सार्वजनिक उत्सव तसेच सन यामध्ये होळी, धुलिवंदन सर्वांनी साधेपनाने व घरीच साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली दीपक सिंगला यांनी त्यांना प्र...

यात्रा-जत्रांना कोविड-19 साथरोगसंदर्भाने उचित प्रतिबंधात्मक उपाय योजनेतंर्गत परवानगी नाही- तहसिलदार, चामोर्शी.

इमेज
गडचिरोली : -  दि.१०: कोरोना विषाणू ( कोविड-19 ) या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रतिबंध करणे या करीता वेळोवेळी विविध आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत व सद्यस्थितीत सदर आदेशाच्या तरतूदी गडचिरोली जिल्हयात लागू असून राज्यात धार्मिक स्थळे/ प्राथनास्थळे सुरु करणे संदर्भात मार्गदर्शक तत्वे आदर्श कार्यप्रणाली आखून देण्यात आलेली असून मोठया प्रमाणावरील गर्दी टाळण्याचे स्पष्ट निर्देश आहेत.       सदर यात्रांना शेकडो / हजारो लोकांचा जनसमुदाय विविध भागांतुन दरवर्षी येत असतात ज्यामुळे सद्यस्थितीत प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने कोविड-19 साथरोग संदर्भाने परिस्थिती नियंत्रणात असून भविष्यात सदर गर्दीमुळे प्रमाणावर कोविड-19 परिस्थिती अनियंत्रित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे आदेशान्वये तालुक्यातील मौजा-मार्केन्डा देव व चपराळा संभाव्य भरणाऱ्या यात्रा-जत्रांना कोविड-19 साथरोगसंदर्भाने उचित प्रतिबंधत्मक उपाययोजनेतंर्गत परवानगी नाकारण्यात आली आहे.            तरी मौजा-मार्कन्डा देव मौजा-चपराळा श्री हनुमान मं...

जाती दावा पडताळणीबाबत त्रुटी पूर्ततेकरीता विशेष मोहीम.

इमेज
गडचिरोली : -  दि.१०: सामाजिक न्याय विभागांतर्गत अनु.जाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागसवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या अर्जदारांना शैक्षणिक प्रयोजनार्थ- 12 वी विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम 2) सेवा प्रयोजनार्थ- आरक्षित प्रवर्गातून नियुक्ती/पदोन्नती, 3) निवडणूक प्रयोजनार्थ- आरक्षित प्रवर्गातून स्थानिक स्वराज्य संस्थेतर्गत उमेदवारीसाठी अर्ज व 4) अन्य प्रयोजनार्थ- आरक्षित प्रवर्गातून सदनिका, गाळे वाटप, पेट्रोल पम्प, जात वैधता प्रमाणपत्र लागू केलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत लाभासाठी बार्टी, पुणे यांचे https://bartievalidity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑगस्ट 2020 पासून नवीन ऑनलाईन अर्ज भरणे व मूळ कागदपत्रे- पुरावे अपलोड करणे आवश्यक केलेले आहे. आता निवडणूक व अन्य प्रयोजनार्थसह सर्वच प्रयोजनाकरीता ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक केलेले आहे. 2020-21 या शैक्षणिक सत्रामध्ये 12 विज्ञान शाखेतील व व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश असलेल्या तसेच सेवा विषयक व निवडणूक जे मागास प्रवर्गातून विजय उमेदवार अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्रच्या विद...

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी घेतली कोविडची लस, पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरणाला उपस्थित रहावे : जिल्हाधिकारी यांचे आवाहन.

इमेज
गडचिरोली : -  दि.१० : जिल्हयाचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आज जिल्हा सामान्य रूग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्रावर कोविड लस घेतली. यावेळी त्यांनी जिल्हयातील पात्र नागरिकांनी कोविड लस न घाबरता टोचून घ्यावी असे आवाहनही केले. लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यास कोरोना संसर्ग टाळता येणार आहे. तसेच ही लस अतिशय सुरक्षित व गरजेची असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.  कोरोना लस घेतल्यानंतर आपण आणि आपल्या कुटुंबासह इतरांना सुरक्षित करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोरोना लसीकरणानंतर त्यांनी कोरोना लसीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, अति. जिल्हा शल्य चिकित्सक सतिश सोळंके, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मशाखेत्री, डॉ.मुकुंद ढबाले, डॉ.सुनिल मडावी, डॉ.समीर बनसोडे, डॉ.विनोद देशमुख उपस्थित होते.

सर्व समाजघटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार.

इमेज
मुंबई : -  दि. 8 : अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून या अर्थसंकल्पात सर्व समाजघटकांच्या विकासाला चालना देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या संकटात राज्याची महसूली तुट वाढली असताना राज्यातील शेतकरी, आदिवासी, महिला, दलित, इतर मागास वर्गाला या अर्थसंकल्पातून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्याला विकासाकडे, प्रगतीकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, असे राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया देताना वडेट्टीवार म्हणाले की, कोकण किनारपट्टीवरील निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पूरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5 हजार 624 कोटी एवढी मदत वितरीत करण्यात आली आहे. 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता मदत व पुनर्वसन विभागास 139 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. शिवाय नैसर्गिक आपत्ती मदत व इतर अनिवार्य खर्चासाठी 11 हजार 315 कोटी 78 लाख 62 हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. ‘महाज्योती’साठी 150 को...

महिला व बालविकास मंत्री यांच्या हस्ते महिलांसाठीच्या ‘वुलू’ ॲपचे लोकार्पण.

इमेज
महिलांना मिळणार स्वच्छ, सुरक्षित प्रसाधनगृहांची सुविधा. मुंबई : -  दि. 8 : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या ‘वुलू’  (WOLOO) ॲपचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. हे ॲप अतिशय नाविन्यपूर्ण असून महिलांच्या उपयोगी येणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.  महिला व बालविकास मंत्री ॲड.ठाकूर यांच्या शासकीय निवासस्थानी या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील, ॲपचे निर्माते मनीष केळशीकर आदी उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री ॲड.ठाकूर यांच्या विशेष सूचनेनुसार खासगी कंपनीने या ॲपची निर्मिती केली आहे. वुलू या ॲपद्वारे शासकीय महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रारंभी मुंबईतील 1500 हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या प्रसाधनगृहांचा ‍वापर करता येणार आहे. हे ॲप विनामुल्य असून महिलांना स्वच्छ आणि सुरक्षित प्रसाधनगृहांची उपलब्धता करुन देणार आहे. राज्यात महिलांसाठीच्या स्वच्छ प्रसाधानगृहांअभावी अनेकवेळा महिलांची गैरसो...

महिलांनो गरुड भरारी घ्या, तुमच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

इमेज
ग्रामविकास विभागाच्या महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ ८ मार्च ते ५ जून दरम्यान राज्यातील ग्रामीण भागात विविध उपक्रमांचे आयोजन मुंबई : -  दि. ९ : कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील बचतगटांच्या महिलांनी १ कोटीहून अधिक मास्कचे उत्पादन करुन कोरोनाविरोधातील लढ्यात सहभाग दिला. आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगटांच्या महिला अशा सर्व माता - भगिनींनी या काळात शौर्य गाजविले. या माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. तुम्ही गरुड भरारी घ्या, तुमच्या पंखांमध्ये बळ देण्याचे काम शासन करेल, अशा शब्दात प्रोत्साहन देत मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील बचतगटातील सुमारे १ लाख महिलांशी संवाद साधला. ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये जागतिक महिला दिनापासून (८ मार्च) ते ५ जून या पर्यावरण दिनापर्यंत ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’ राबविण्यात येणार आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते या अ...

राज्यपालांच्या हस्ते नारी शक्ती व राष्ट्रीय सेवा सन्मान प्रदान.

इमेज
अभिनेत्री आयेशा जुल्का यांसह 37 जण सन्मानित इतःपर करोनाबाबत जागरुकता कायमच ठेवावी लागेल :  राज्यपाल मुंबई : -  दि. 9 : करोनाचा प्रकोप अद्याप संपलेला नाही. परंतु आपले काम थांबवून चालणार नाही. त्यामुळे निर्भीडपणे परंतु बेफिकीरीने न वागता सर्वांना आपापले कार्य करावे लागेल असे सांगून इतःपर करोनाबाबत जागरुकता कायमच ठेवावी लागेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून गोरक्षक सेवा ट्रस्ट या संस्थेच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि. 8) राज्यपालांच्या हस्ते  नारी शक्ती सन्मान, राष्ट्रीय सेवा सन्मान व करोना योद्ध सन्मान प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते अभिनेत्री आयेशा जुल्का, रोशनी सिंह, चांद सुलताना यांचेसह विविध क्षेत्रातील 11 महिलांना उल्लेखनीय कार्याबद्दल नारी शक्ती सन्मान देण्यात आले. खासदार राहुल शेवाळे यांना यावेळी राष्ट्रीय प्रतिभा सन्मान देण्यात आला.   ऱ्होएन फार्माचे व्यवस्थापकीय संचालक स्वामी सुर्या सतिश तसेच गऊ भारत ट्रस्टचे अध्यक्ष संजय शर्मा ...

कोरेपल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा.

इमेज
अहेरी : - आज दिनांक 8/ 3/2021 ला अहेरी तालुक्यातील मौजा- कोरेपल्ली येथे  आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला. यावेळी येरमनारचे  माजी सरपंच श्री बालाजी गावडे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाबदल थोडक्यात माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. यावेळी येरमनाचे माजी सरपंच श्री बालाजी गावडे, कोरेपल्ली गावाचे भूमिया श्री दामा गावडे, सौ बंडे गावडे,सौ बेबी गावडे,सौ सुको गावडे,सौ पोवरी गावडे,सौ सोनी गावडे, सौ शारदा कुडमेथे, श्री मासा गावडे, श्री सतीश आत्राम, श्री सुधीर आत्राम तसेच मौजा- कोरेपल्ली आणि कवटाराम गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.

नक्षलवादी आणि पोलिसां मध्ये गोळीबार, काही सी-६० कमांडोज जखमी.

इमेज
दिक्षा झाडे - एटापल्ली तालुका प्रतिनिधी गडचिरोली : -  दि.०५ नक्षल प्रभावी भाग गडचिरोली जिल्ह्यात पोलिस कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये एक मोठी चकमक झाली आहे. यामध्ये काही सी-६० कमांडोज जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अधिकृत संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. जखमी कमांडोजला नागपुरला हलवण्यात  आले आहे. पोलिस कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक कोरपर्शी जंगलात झाली आहे. हा परिसर महाराष्ट्र-छत्तीसगढ बॉर्डरवर येतो. ताज्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी भीषण गोळीबार सुरू आहे. घटनास्थळी कांकेर पोलिसांच्या २७० पेक्षा जास्त पोलिस कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. दक्षिण गडचिरोली मध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यां मध्ये सुरू असलेल्या गोळीबारात अनेक सी- ६० जवान अजुनही फसले असल्याचे माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जवानांची शोध मोहिम सुरू असताना सि-६० जवानांवर हा हल्ला झाला. या गावांमध्ये मोठ्या संख्येत नक्षली पोहोचल्याची माहिती मिळाली होती.

शेतकरी गटांनी कृषी औजारे बँकेचा लाभ घ्यावा - तालुका कृषि अधिकारी, कुरखेडा.

गडचिरोली : - दि.05:  मानव विकास योजनेअंतर्गत औजारे बँक स्थापने करीता अनुसूचित जाती जमातीच्या शेतकरी गटांना लाभ देण्याची योजना प्रस्तावित आहे. तरी कुरखेडा व कोरची तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांना या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन तालुकास्तरीय निवड समितीचे सदस्य सचिव तथा तालुका कृषि अधिकारी, कुरखेडा कु. सुरभी बाविस्कर यांनी केले आहे. सन 2020-21 या वर्षाकरीता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी गटांना कृषी यंत्र व बँक स्थापन करुन विकास आणि प्रसार करणे हा प्रकल्प शासन मान्यतेसाठी प्रस्तावित आहे. या प्रकल्प करीता कुरखेडा तालुक्याची निवड करण्यात आली असून तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांनी विहित नमुन्यात संपूर्ण कागदपत्रासह दि. 10 मार्च 2021 पर्यंत तालुका कृषी अधिकारी, कुरखेडा यांचेकडे अर्ज सादर करावे. प्राप्त होणाऱ्या अर्जाची उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती समोर अर्जाची छाननी करुन अंतिम यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. या योजनेत ट्रॅक्टर, रोटाव्हेटर,  नांगर, चिखलणीयंत्र, पेरणी यंत्र व केज व्हील य...

जिल्ह्यातील विकासकामे सकारात्मक विचार ठेवून पुर्ण करा दिशा समितीच्या बैठकीत खासदार तथा अध्यक्ष, अशोक नेते यांचे प्रतिपादन.

इमेज
गडचिरोली : - दि.3 : आकांक्षित, दुर्गम व मागास गडचिरोली जिल्हयात कोणत्याही प्रकारची विकासकामे करत असताना आधिकारी व पदाधिकारी यांनी सकारात्मक विचार ठेवून ती करावीत असे प्रतिपादन दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी दिशा समितीच्या आढावा बैठकीत केले. जिल्हयात अनेक अडचणी आहेत, प्रत्येक कामात नियम व अडचणी आडव्या आल्या तर विकास कामांची अंमलबजावणी होणार नाही. त्यासाठी नियमाने मात्र आदिवासी दुर्गम भागातील लोकांचा विचार करून सकारात्मक निर्णय घेवून कामे मार्गी लागतील यासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने कार्य केले पाहिजे असे ते पुढे म्हणाले. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथील सभागृहात जिल्हा विकास, समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, प्रभारी जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, दिशा समिती सदस्य बाबुरावजी कोहळे, सदस्या तथा नगराध्यक्षा गडचिरोली योगिता पिपरे, सदस्य प्रकाश गेडाम, सदस्या लताताई पुंगाटे, सदस्य डी के मेश्राम, उप विभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, उप...

वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी 31 मार्चपर्यंत विधिमंडळ समिती नियुक्त करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार.

इमेज
मुंबई : -  दि. 3 : राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेचे विधिमंडळाच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येईल. 31 मार्चपर्यंत समिती स्थापन होऊन त्यांना सुरुवातीला चार महिन्यांची मुदत देण्यात येईल त्यात आवश्यकता वाटल्यास दोन महिन्यांची मुदत वाढ देऊन या प्रकरणी सहा महिन्यात सभागृहाला अहवाल सादर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितले.              विधानसभा सदस्य रमेश कोरगावकर यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहिम राबविण्याकरीता सन 2016-17 ते 2019-20 या कालावधीत वन विभागाला 2 हजार 429.78 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. तो पूर्णपणे वापरण्यात आला आहे. या मोहिमे अंतर्गत वन विभागाकडून 28.27 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. ऑक्टोबर 2020 अखेर त्यातील 75.63 टक्के रोपे जिवंत असून त्यांची देखभाल करण्यात येत आहे.         ...

समाज माध्यमांमध्ये प्रसारीत झालेला २७ जानेवारी आणि १८ फेब्रुवारी २०२१ रोजीचा शासन निर्णय बनावट वैद्यकीय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण.

इमेज
मुंबई  : - दि. 3 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे, नांदेड, नागपुर आणि चंद्रपूर येथे अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करण्यासाठी प्रथम टप्प्याकरिता आवश्यक ८८८ पदाच्या निर्मितीबाबतचा २७ जानेवारी २०२१ रोजीचा बनावट शासन निर्णय प्रसारीत करण्यात आला आहे. आणि त्याआधारे आरोग्य सेवक पदाची अंतिम निवड यादी याबाबतचा १८ फेब्रुवारी २०२१ रोजीचा दुसरा बनावट शासन निर्णय प्रसारीत करण्यात आला. समाज माध्यमांमध्ये प्रसारीत होणारे हे दोन्ही शासन निर्णय बनावट असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या बनावट शासन निर्णयात विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग दर्शविले असून शासन निर्णय क्रमांकात वैसेवा -१ कार्यासनाचा उल्लेख आढळतो. मात्र समाज माध्यमांमध्ये प्रसारीत होणारा शासन निर्णय राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वैसेवा-१ कार्यासनाकडून निर्गमित करण्यात आलेला नसल्याचे वैद्यकीय शिक्षण व ओषधी द्रव्ये विभागाने स्पष्ट केले आहे. या बनावट शासन निर्णयामुळे अनेक नोकरी इच्छुक उमेदवारांची फसवणूक होण्याची किंवा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामु...

वन्यजीवांचे संरक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखा- उपमुख्यमंत्री अजित पवार.

इमेज
जागतिक वन्यजीव दिना’च्या उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा मुंबई : -  दि. 3 : महाराष्ट्रात जैव विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही जैव विविधता टिकविण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करावेत, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, वन्यजीवांचे संरक्षण करून सर्वांनी पर्यावरणाचा समतोल राखावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करुन राज्यातील जनतेला ‘जागतिक वन्यजीव दिना’च्या शुभेच्छा दिल्या. जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून, ‘बायो स्फिअर’ आणि ‘व्हाईस ऑफ द वाईल्ड’ संस्थेच्या भोरड्या (पळस मैना) या पक्षावरील शॉर्ट फिल्मचे (लघुपट) प्रदर्शन तसेच पर्यावरणासाठी दृक-श्राव्य माध्यमातून योगदान देणाऱ्या ‘वन्यजीवांचा आवाज’ या संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अत पवार यांच्या हस्ते आज मंत्रालयातील समिती सभागृहात करण्यात आले. यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, बायो स्फिअर, व्हाईस ऑफ द वल्ड संस्थेचे डॉ. सचिन पुणेकर, सुधीर सावंत, निविदिता जोशी, मंदार नागरगोजे, शाहू सावंत उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राकडे प...