जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त महसूल शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचेकरीता पेंशन अदालतीचे आयोजन.
गडचिरोली : - दि.10: सेवानिवृत्त महसूल शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीय प्रकरणातील अडचणीचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 16 मार्च 2021 रोजी सकाळी 11.00 ते 1.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे पेंशन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. विहीत नमुन्यातील प्रलंबीत प्रकरणा संबंधातील माहिती व पेंशन अदालतमध्ये प्राप्त होणाऱ्या प्रकरणा संबंधातील सविस्तर माहिती घेवून नायब तहसिलदार (नियमीत) यांना या कार्यालयात नियोजित वेळेत न चुकता उपस्थित राहण्यास निर्देशीत करावे. तसेच पेंशन अदालत आयोजित करण्यात आल्याबाबत संबंधीत सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांना हजर राहण्याबाबत आपले स्तरावरुन कळविण्यात यावे. असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा