येणाऱ्या उन्हाळयात उष्माघात होवू नये म्हणून काळजी घ्या : आरोग्य विभाग,गडचिरोली
गडचिरोली : - दि.19: गडचिरोली जिल्हयातील 15 मार्च ते 30 जुन या कालावधीमध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे मृत्यू होणे संभवणीय असते. उष्माघाताने मृत्यू होवू नये म्हणून आतापासूनच जागृत राहीले पाहिजे. जनतेला माहिती होणे व रुग्णांना तातडीने औषद्योपचार मिळण्यासाठी प्रा.आ.केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा तसेच येणाऱ्या उन्हाळयात उष्माघात होवू नये म्हणून काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.
उष्माघात होण्याची कारणे :-
उन्हामध्ये शेतावर अथवा इतर मजुराची कामे फार वेळ करणे. कारखान्याच्या बॉयलर रुम मध्ये काम करणे काच कारखान्यातील कामे करणे. जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे. घट्ट कपडयाचा वापर करणे. अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
लक्षणे:- थकवा येणे ताप येणे त्वचा कोरडी पडणे. भूक न लागणे चक्कर येणे निरुत्साही होणे डोके दुखणे.रक्तदाब वाढणे मानसिक बेचैन व अस्वस्थता बेशुद्वावस्था इत्यादी.
प्रतिबंधक उपाय:- वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे.कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असतांना करावी. उष्णता शोषून घेणारे कपडे काळया किंवा भडक रंगाचे वापरु नयेत.सैल पांढऱ्या रंगाचे कपे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा.पाणी भरपूर प्यावे. सरबत प्यावे. उन्हामध्ये काम करतांना मधून मधून थेाडीशी विश्रांती घ्यावी. उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब कम थांबवावे खाली नमूद केल्याप्रमाणे उपचार घ्यावेत.उन्हात बाहेर जातांना गॉगल्स डोक्यावर टोपी टॉवेल फेटा उपकरणे याचा वापर करावा.
उपचार :- रुग्णास हवेशीर खेालीत ठेवावे खोलीत पंखे कुलर ठेवावे वातानुकूलीत खेालीत ठेवावे.रुग्णांचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी रुग्णांचा कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात आईसपॅक लावावेत. आवश्यकते नुसार शिरेवाटे सलाईन लावावेत. जनतेला उष्माघाताची कारणे लक्षणे व प्राथमिक उपाययोजना त्याचप्रमाणे उष्माघात होवू नये, म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत आपल्या नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा