आज जिल्ह्यात 23 नवीन कोरोना बाधित तर 38 कोरोनामुक्त.

गडचिरोली : - दि.22: आज जिल्हयात 23 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 38 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10164 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9754 वर पोहचली. तसेच सद्या 302 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.97 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.97 टक्के तर मृत्यू दर 1.06 टक्के झाला.
          
नवीन 23 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 18,  भामरागड तालुक्यातील 1,  धानोरा तालुक्यातील 1, चामोर्शी 2, तर वडसा तालुक्यातील 1 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 38 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 21,  आरमोरी 5, धानोरा 1, एटापल्ली 3, कोरची 6,  कुरखेडा 4, तर वडसा  मधील 2 जणांचा समावेश आहे.
    
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये सर्वोदय वार्ड 2, नवेगाव 2, गुरुकुंज कॉलनी 1, शाहू नगर 3, वनश्री कॉलनी 2,  चामोर्शी रोड 1, गोकूल नगर 1, शिवाजी नगर 1,  आरटीओ ऑफीस जवळ 1,स्थानिक 1,  प्लाटिम ज्युबिली शाळेजवळ 1,  डोंगरगाव 1,  चामोर्शी तालुक्यातील  आष्टी 2,  धानोरा तालुक्यातील स्थानिक 1,  भामरागड तालुक्यातील  एलबीपी हेमलकसा 1,  वडसा तालुक्यातील  कुरुड 1, तर इतर जिल्हयातील  बाधितामध्ये 1  जणांचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.