वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वीजरोधक पोल यंत्र उभारणीसाठी 33 कोटी रुपये मंजूर गडचिरोली जिल्ह्यातील 475 ग्राम पंचायतीसाठी 11 कोटी 56 लक्ष मंजूर.

गडचिरोली : - दि.24: चंद्रपूर आणि गडचिरोली  जिल्हयात पावसाळ्यात व अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात  विज पडून निष्पाप लोकांचा बळी जातो. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून मदत  व पुनर्वसन विभागाकडून  चंद्रपूर जिल्हयातील 827 ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधकपोल यंत्र लावण्यात येणार असून त्यावर 20 कोटी 92 लक्ष रूपये तसेच गडचिरोली जिल्हयातील 475 ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधकपोल यंत्र लावण्यात येणार असून त्यावर 11 कोटी 56 लक्ष रुपये मंजूर करण्यात  आले आहे. या कामाचा शु्भारंभ ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी येथे 22 मार्चला ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधक पोल यंत्र उभारून या कामाचा शुभारंभ केला आहे. 
       
चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयात पावसाळ्यात व अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाट होऊन वीज पडून अनेक निरपराध लोकांचा बळी जात  आहे तर काही लोक गंभीर जखमी  होत आहे.  त्यामुळे त्यांचे कुटुंब, त्यांचे संसार उध्वस्त होऊन आर्थिक व माणसिक त्रास त्यांच्या वारसांना सहन करावा लागत आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या  निधीतून वीज प्रतिबंध यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रथमच: चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयाची निवड करून त्यात चंद्रपूर जिल्हयातील 827 ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधक पोल यंत्र बसविण्यात येणार असून त्यासाठी 20 कोटी 92 लक्ष रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधकपोल यंत्र बसविण्यासाठी 11 कोटी 56 लक्ष रुपये याप्रमाणे दोन्ही जिल्ह्यातील 1 हजार 302 ग्रामपंचायतीसाठी 32 कोटी 48 लक्ष रुपयांचा निधी मदत व पुनर्वसन विभागाकडून मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हे काम युध्द पातळी सुरू करण्यात येणार असून या कामाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे 22 मार्चला वीज रोधकपोल यंत्र उभारून शुभारंभ करण्यात आलेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.