जाती दावा पडताळणीबाबत त्रुटी पूर्ततेकरीता विशेष मोहीम.
गडचिरोली : - दि.१०: सामाजिक न्याय विभागांतर्गत अनु.जाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागसवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या अर्जदारांना शैक्षणिक प्रयोजनार्थ- 12 वी विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम 2) सेवा प्रयोजनार्थ- आरक्षित प्रवर्गातून नियुक्ती/पदोन्नती, 3) निवडणूक प्रयोजनार्थ- आरक्षित प्रवर्गातून स्थानिक स्वराज्य संस्थेतर्गत उमेदवारीसाठी अर्ज व 4) अन्य प्रयोजनार्थ- आरक्षित प्रवर्गातून सदनिका, गाळे वाटप, पेट्रोल पम्प, जात वैधता प्रमाणपत्र लागू केलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत लाभासाठी बार्टी, पुणे यांचे https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑगस्ट 2020 पासून नवीन ऑनलाईन अर्ज भरणे व मूळ कागदपत्रे- पुरावे अपलोड करणे आवश्यक केलेले आहे. आता निवडणूक व अन्य प्रयोजनार्थसह सर्वच प्रयोजनाकरीता ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक केलेले आहे.
2020-21 या शैक्षणिक सत्रामध्ये 12 विज्ञान शाखेतील व व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश असलेल्या तसेच सेवा विषयक व निवडणूक जे मागास प्रवर्गातून विजय उमेदवार अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्रच्या विद्यार्थ्यांनी जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली येथे सादर केलेले आहे व त्यांच्या प्रस्तावामध्ये जाती दावा सिद्ध करणारे सबळ पुरावे नसल्याने त्यांचे प्रकरण त्रुटीमध्ये असल्याने त्यांना यापुर्वी ऑनलाईन प्रणालीद्वारे त्रृटी पुर्तता करण्यात करीता संदेशाद्वारे व ई मेलद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र, ज्या अर्जदारांनी अद्यापही त्यांचे जाती दावे पडताळणी संबंधित आवश्यक ते मानीव दिनांकापुर्वीचे जातीचे व वास्तव्याच्या नोंदीचे पुरावे सादर केलेले नाहीत, अशा अर्जदारांना त्रुटी पुर्ततेकरीता संधी देण्यात येत असून, त्यांनी त्रुटी पुर्ततेबाबत आवश्यक ते पुरावे मुळ प्रतीसह, दि.15 मार्च 2021 ते 30 मार्च 2021 पर्यंत सादर करणेसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सदर कालावधीत अर्जदारास स्वत: उपस्थित राहणे शक्य न झाल्यास वडील व कुटूंबातील इतर नातेवाईकांनी आवश्यक ते पुरावे मुळ प्रती ऑनलाईनला अपलोड करुन त्या मुळ प्रती व 1 झेरॉक्स संच सादर करावे.
दिनांक 15 मार्च 2021 ते 30 मार्च 2021 ला त्रुटीपुर्ततेकरीता सबळ पुराव्यासह समिती कार्यालयात उपस्थित राहावे, असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा