नागेपल्ली येथे नियमित ग्रामसेवक देण्यात यावे नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांची मागणी.
अनिल आलाम- झिमेला ग्रामीण प्रतिनिधी
अहेरी : - तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत येथील सर्व ग्राम पंचायत सदस्य व सरपंच यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती, अहेरी यांना निवेदन दिले. निवेदनात असे म्हटले आहे की, अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्राम पंचायत लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी ग्राम पंचायत असुन यामध्ये नागेपल्ली, मोदुमडगु, मलमपल्ली, येंकापल्ली, टेकमपल्ली, पुसुकपल्ली, संड्रा , असे 7 गावे मोडत असुन जवळपास 7999 इतकी लोकसंख्या आहे. दररोज कितीतरी नागरिक या कार्यालयात कामानिमित्त येतात. परंतु येथील ग्राम विकास अधिकारी एल. के. पाल असून त्यांना कमलापुर ग्राम पंचायत येथील अतिरिक्त पदभार दिल्याने ग्राम पंचायत नागेपल्ली येथे नियमित सेवा देण्यास त्यांना अडचणी निर्माण होत आहे. परिणामी नियमित ग्रामसेवक नसल्याने विविध विकास कामे लोकांचे अडून आहेत. या सर्व बाबींचा विचार करून ग्राम पंचायत नागेपल्ली येथे नियमित ग्रामसेवक देण्यात यावे असे निवेदन देऊन चर्चा करण्यात आले व निवेदनाच्या प्रतिलिपी जि. प. अध्यक्ष, गडचिरोली, मा. आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली यांना पाठविण्यात आले.
यावेळी निवेदन देतांंना ग्राम पंचायत नागेपल्लीचे नवनियुक्त सरपंच श्री. लक्ष्मण आर. कोडापे, उपसरपंच श्री. रमेश शानगोंडावार, ग्रा. प. सदस्य फेलिक्स गीध, राकेश कुळमेथे, आशिष पाटील, मल्लारेडी येमनुरवार, राहुल सिडाम, ममता मडावी, अंजनाताई पेंदाम, बेबी मंडल, करिश्मा आत्राम, लक्ष्मीबाई सीडाम, ज्योती ठाकरे, शेवंता भोयर, स्मिता निमसरकार उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा