जागतिक क्षयरोग दिन साजरा.

गडचिरोली : - दि.25: जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था गडचिरोली अंतर्गत जिल्हा कुष्ठरोग कार्यालयामध्ये जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सांळुखे, प्रमुख पाहुणे म्हणून  अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मडावी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके, वैद्यकिय अधिकारी डॉ.रुपेश पेंदाम उपस्थित होते.
         
जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधुन 13 क्षयरोग पथकाअंतर्गत विविध क्षयरोग जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी विविध शाळांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा स्तरावर त्यांचे परिक्षण करण्यात आले. त्यांना जागतिक क्षयरोग दिनाच्या दिवशी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
      
जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमामध्ये डॉ. अनिल रुडे, डॉ.सुनिल मडावी, व डॉ. सचिन हेमके यांनी क्षयरोगा विषयी उपस्थित क्षयरुग्ण, आशा कार्यकर्त्या, शालेय विद्यार्थी व आरोग्य कर्मचारी तसेच उपस्थित असलेले नागरीकांना व्यापक मार्गदर्शन केलेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके यांनी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या '' The Clock is Ticking!''  '' वेळ निघुन जात आहे क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ठ गाठण्याची.''  या घोषवाक्याच्या आधारे व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन केले.
    
जिल्हयातील इतरही आरोग्य संस्थांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाचे सुत्र संचालन गणेश खडसे व आभार प्रदर्शन यु. वाय. डाबरे, यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयातील  डॉ. रुपेश पेंदाम , अनिल चव्हाण, नंदकिशोर आखाडे, राहुल रायपूरे, मनिष बोदेले, ज्ञानदिप गलबले, प्रमोद काळबांधे, लता येवले, वंदना राऊत, नजमा बेग आदि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलें. जिल्हयातील इतरही आरोग्य संस्थांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.