आत्तापर्यंत जिल्हयात एकूण बाधितांपैकी 10 हजार कोरोनामुक्त झाले.

आज नव्याने 41 कोरोनामुक्त तर एका मृत्यूसह इतर 28 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली : - दि-२९ जिल्हयात एकूण कोरोना बाधितांपैकी कोरोनामूक्त रूग्णांचा आकडा 10 हजार पूर्ण झाला. आज जिल्हयात 41 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच 28 नवीन कोरोना बाधित आढळून आले. आत्तापर्यंत एकूण बाधित 10518 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10,00,1 वर पोहचली. तसेच सद्या 407 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 110 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन एका मृत्यूमध्ये वडसा येथील 85 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्केसक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.87 टक्के तर मृत्यू दर 1.05 टक्के झाला.

वीन 28 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 17अहेरी तालुक्यातील 3आरमोरी तालुक्यातील 4चामोर्शी तालुक्यातील 1एटापल्ली तालुक्यातील 02कुरखेडा तालुक्यातील 01 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 41 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 24,अहेरी 4,  आरमोरी 2भामरागड 04धानोरा 1एटापल्ली 01मुलचेरा 01कुरखेडा 01तर वडसा  मधील 3 जणांचा समावेश आहे.

नवीन 28 बाधितांमध्ये अहेरी तारलुक्यातील आलापल्ली 2 तर शहरातील 1 जण आहे. आरमोरी मधील 4 सर्व स्थानिक आहेत. चामोर्शी मधील एक मार्कंडा येथील आहे. एटापल्ली दोघेही स्थानिक आहेत. गडचिरोली मधील जीएनएम होस्टेल जवळ 1रोज टावर अपार्टमेंट जवळ 1गोकूळ नगर 1चामोर्शी रोड 1इतर जिल्हयातील 1प्रियांका हायस्कूल कनेरी जवळ 5कारगील चौक 1महिला महाविद्यालय जवळ 1आनंद नगर 3साईनगर 1पोस्ट ऑफिस जवळ 1 जणांचा समावेश आहे. कुरखेडा मधील एकजण गर्नोली येथील आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.