नक्षलवादी आणि पोलिसां मध्ये गोळीबार, काही सी-६० कमांडोज जखमी.

दिक्षा झाडे - एटापल्ली तालुका प्रतिनिधी

गडचिरोली : - दि.०५ नक्षल प्रभावी भाग गडचिरोली जिल्ह्यात पोलिस कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये एक मोठी चकमक झाली आहे. यामध्ये काही सी-६० कमांडोज जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अधिकृत संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. जखमी कमांडोजला नागपुरला हलवण्यात  आले आहे.

पोलिस कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक कोरपर्शी जंगलात झाली आहे. हा परिसर महाराष्ट्र-छत्तीसगढ बॉर्डरवर येतो. ताज्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी भीषण गोळीबार सुरू आहे. घटनास्थळी कांकेर पोलिसांच्या २७० पेक्षा जास्त पोलिस कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.

दक्षिण गडचिरोली मध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यां मध्ये सुरू असलेल्या गोळीबारात अनेक सी- ६० जवान अजुनही फसले असल्याचे माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जवानांची शोध मोहिम सुरू असताना सि-६० जवानांवर हा हल्ला झाला. या गावांमध्ये मोठ्या संख्येत नक्षली पोहोचल्याची माहिती मिळाली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.