यात्रा-जत्रांना कोविड-19 साथरोगसंदर्भाने उचित प्रतिबंधात्मक उपाय योजनेतंर्गत परवानगी नाही- तहसिलदार, चामोर्शी.

गडचिरोली : - दि.१०: कोरोना विषाणू ( कोविड-19 ) या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रतिबंध करणे या करीता वेळोवेळी विविध आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत व सद्यस्थितीत सदर आदेशाच्या तरतूदी गडचिरोली जिल्हयात लागू असून राज्यात धार्मिक स्थळे/ प्राथनास्थळे सुरु करणे संदर्भात मार्गदर्शक तत्वे आदर्श कार्यप्रणाली आखून देण्यात आलेली असून मोठया प्रमाणावरील गर्दी टाळण्याचे स्पष्ट निर्देश आहेत.
     
सदर यात्रांना शेकडो / हजारो लोकांचा जनसमुदाय विविध भागांतुन दरवर्षी येत असतात ज्यामुळे सद्यस्थितीत प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने कोविड-19 साथरोग संदर्भाने परिस्थिती नियंत्रणात असून भविष्यात सदर गर्दीमुळे प्रमाणावर कोविड-19 परिस्थिती अनियंत्रित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे आदेशान्वये तालुक्यातील मौजा-मार्केन्डा देव व चपराळा संभाव्य भरणाऱ्या यात्रा-जत्रांना कोविड-19 साथरोगसंदर्भाने उचित प्रतिबंधत्मक उपाययोजनेतंर्गत परवानगी नाकारण्यात आली आहे.
          
तरी मौजा-मार्कन्डा देव मौजा-चपराळा श्री हनुमान मंदीर प्रशांत धाम दिनांक १० मार्च २०२१ ते २०  मार्च २०२१ पर्यंत रुढी परपंरा नुसार धार्मीक पुजा सुरु ठेवून नागरीकांना/ भाविकांना धार्मिक स्थळे/ प्रार्थनास्थळे पुर्णता बंद ठेवण्यात आली आहे,  असे चामोर्शीचे तहसिलदार  जितेन्द्र एस. शिकतोडे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.