शासकीय आदिवासी वस्तिगृहात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे! आदिवासी विद्यार्थ्यांची हेळसांड खपवून घेणार नाही - आमदार डॉ देवराव होळी.

गडचिरोली : - 19 मार्च 2021 गडचिरोली विधानसभा मतदार संघातील पोटेगाव येथील शासकीय आदिवासी वसतिगृह येथे आज येथील आमदार डॉ देवराव होळी यांनी सदिच्छा भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. वस्तीगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सोबत संवाद साधला, तसेच नवनिर्माण होत असलेल्या दोन अद्यावत मुला मुलींचे वसतिगृहचे पाहणी केले. यावेळी बोलतांना आमदार डॉ देवराव होळी यांनी सांगितले शासकीय वसतिगृहातील समस्त विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना राज्य सरकारच्या सर्व सोयीसुविधा लाभ देण्यात यावे व शासकीय वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचे हेळसांड खपवून घेणार नाही असा इशारा दिला.   
यावेळी प्रामुख्याने पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास पाटील दशमुखे, पंचायत समिती सदस्य नेताजी गावतुरे, मालता ताई मडावी भाजपा गडचिरोली तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे मुख्याध्यापक ब्राम्हणकर, शिक्षक सुधीर शेंडे, शिक्षक नैताम, एस.आर.मंडलवार, अधीक्षक एस.आर.जाधव, अधिक्षिका बी.डी.वाळके, शिक्षक व्ही.एस.देसू व इतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.