ग्राम बाल संरक्षण समिती विषय देसाईगंज येथे एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.

गडचिरोली : - दि.19: दि. 18 मार्च 2021 रोजी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्यावतीने ग्राम बाल संरक्षण समिती विषयी देसाईगंज तालुक्यातील अंगणवाडी सेविका व पोलीस पाटील यांचे एक दिवसीय प्रशिक्षण पंचायत समिती सभागृह देसाईगंज येथे आयोजित करण्यात आले होते. 
        
प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन  बाल विकास प्रकल्प अधिकारी, देसाईगंज, श्रीमती कुचिक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणाला प्रमुख अतिथी म्हणून सांख्यिकी विस्तार अधिकारी देसाईगंज, श्रीमती हेमके, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पुरते,  तसेच कनिष्ठ संरक्षण अधिकारी, देसाईगंज श्रीमती साठवणे उपस्थित होते. 

प्रशिक्षण हे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नारायण पंराडे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. 
            
प्रशिक्षणाला देसाईगंज तालुक्यातील अंगणवाडी सेविका व पोलिस पाटील उपस्थित होते. प्रशिक्षणार्थींना सामाजिक कार्यकर्ता, ( मास्टर ट्रेनर ) तनोज ढवगाये, माहिती विश्लेषक उज्वला नाकाडे,  क्षेत्र कार्यकर्ता निलेश देशमुख यांनी प्रशिक्षण दिले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समुपदेशक समुपदेशन केंद्र पोलीस स्टेशन श्री. शेन्डे, लेखापाल पुजा धमाले यांचे विशेष सहकार्य लाभले असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.