शेतकरी गटांनी कृषी औजारे बँकेचा लाभ घ्यावा - तालुका कृषि अधिकारी, कुरखेडा.

गडचिरोली : - दि.05:  मानव विकास योजनेअंतर्गत औजारे बँक स्थापने करीता अनुसूचित जाती जमातीच्या शेतकरी गटांना लाभ देण्याची योजना प्रस्तावित आहे. तरी कुरखेडा व कोरची तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांना या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन तालुकास्तरीय निवड समितीचे सदस्य सचिव तथा तालुका कृषि अधिकारी, कुरखेडा कु. सुरभी बाविस्कर यांनी केले आहे.

सन 2020-21 या वर्षाकरीता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी गटांना कृषी यंत्र व बँक स्थापन करुन विकास आणि प्रसार करणे हा प्रकल्प शासन मान्यतेसाठी प्रस्तावित आहे. या प्रकल्प करीता कुरखेडा तालुक्याची निवड करण्यात आली असून तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांनी विहित नमुन्यात संपूर्ण कागदपत्रासह दि. 10 मार्च 2021 पर्यंत तालुका कृषी अधिकारी, कुरखेडा यांचेकडे अर्ज सादर करावे.

प्राप्त होणाऱ्या अर्जाची उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती समोर अर्जाची छाननी करुन अंतिम यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे.

या योजनेत ट्रॅक्टर, रोटाव्हेटर,  नांगर, चिखलणीयंत्र, पेरणी यंत्र व केज व्हील यांचा समावेश असून सदरच्या योजनेत 90 टक्के अनुदान देण्याची योजना आहे. कुरखेडा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी गटांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जाची उपविभागीय अधिकरी, कुरखेडा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीसमोर छाननी करुन अंतीम यादी जिल्हाधिकारी, गडचिरोली कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त नोंदणीकृत शेतकरी गटांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन निवड समितीचे सदस्य तथा तालुका कृषि अधिकारी, कुरखेडा यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.