पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.३०: जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दिनांक २३ मार्च २०२६ व २७ मार्च २०२६ रोजी दिव्यांग तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर शिबिरास दिव्यांग नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध प्रकारच्या अपंगत्व असलेल्या लाभार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात आली. या शिबिराचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया विके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. इंद्रजीत नागदेवते, डॉ. परीक्षित चकोले, डॉ. बाळू सहारे यांनी विविध प्रकारच्या दिव्यांगत्वाची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय अभिप्राय नोंदविले. तपासणीनंतर पात्र लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आवश्यक प्रक्रिया सुलभ व जलदगतीने पूर्ण करण्यात आली. या शिबिरामुळे दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठी मदत झाली आहे. सदर आयोजित शिबरामध्ये दिनांक २३ मार्च २०२६ रोजी ८२ व्यक्तींपैकी ४५ व २७ मार्च २०२६ रोजी १२२ पैकी ६१ दिव्यांग व्यक्ती ‍दिव्यांग प्रमाणपत्राकरीता पात्...

महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षणांना प्रारंभ रोजगार, बेरोजगारी व उद्योग क्षेत्रातील वास्तव स्थितीचे सर्वंकष चित्र समोर येणार

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.३०: केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत सन २०१७ पासून नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या आवर्ती श्रमशक्ती सर्वेक्षण तसेच सन २०१९ पासून सुरू असलेल्या असंघटित क्षेत्रातील उद्योग आस्थापनांचे वार्षिक सर्वेक्षण या दोन्ही महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे. आवर्ती श्रमशक्ती सर्वेक्षणाच्या माध्यमातून रोजगार, बेरोजगारी, श्रमशक्ती सहभाग दर, कामगार-लोकसंख्या गुणोत्तर यांसारख्या विविध श्रमसंबंधित निर्देशांकांचे त्रैमासिक व वार्षिक अंदाज प्राप्त होतात. या सर्वेक्षणातून कामगारांचे उद्योगनिहाय वितरण, रोजगाराची सद्यस्थिती, उत्पन्न, कामाचे तास तसेच वयोगट, लिंग, शैक्षणिक स्तर आणि ग्रामीण-शहरी भागानुसार श्रमबाजारातील स्थितीचे सविस्तर चित्र समोर येणार आहे. यावर आधारित वार्षिक अहवाल प्रकाशित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रातील उद्योग आस्थापनांचे वार्षिक सर्वेक्षण हे देशाच्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाच्या असंघटित क्षेत्राचा अभ्यास...

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार आणि उद्योजक मेळावा यशस्वीरित्या संपन्न

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२७: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली, दे-आसरा फाऊंडेशन, पुणे आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने STEP प्रशिक्षणार्थी, माझी सैनिक, एकल महिला व बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय ‍ रोजगार मेळावा, उद्योजक मेळावा ‍ आणि समुपदेशन मेळावा दिनांक 25 मार्च 2026 रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला. पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार आणि उद्योजक मेळाव्याचे सूत्रसंचालन भाग्यश्री वाघमारे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, अधिकारी यांनी केले. तसेच कार्यक्रमाची सूरूवात महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सर्व मान्यवरांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यांत आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेंद्र शेंडे, सहाय्यक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले. तसेच उद्योजक मेळाव्याकरीता प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले योगेंद्र शेंडे, सहाय्यक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्...

थायलंडच्या फुकेतमध्ये मराठी संस्कृतीची छाप; पर्यटनासोबत रिअल इस्टेट गुंतवणुकीची नवी दिशा!

इमेज
फुकेतमधील ‘दगडूशेट गणपती’ मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र! मुंबई, (प्रतिनिधी) : हिंद महासागराच्या निळ्याशार किनाऱ्यांनी नटलेले, डोंगररांगा, समुद्रकिनारे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले थायलंडमधील फुकेत हे जगातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. प्राचीन काळापासून व्यापार, समुद्री संपर्क आणि विविध संस्कृतींच्या संगमामुळे फुकेतने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बौद्ध परंपरा, मंदिरसंस्कृती, तसेच अतिथी देवो भव या तत्त्वावर आधारित आदरातिथ्यामुळे जगभरातील पर्यटक आणि व्यावसायिक येथे आकर्षित होतात. अशा या निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध फुकेतमध्ये पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली असून, मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर विस्तार करण्याचा एक अनोखा उपक्रम साकार झाला आहे. दुबईस्थित उद्योगपती आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे ग्लोबल अध्यक्ष डॉ. सुनील व्ही. मांजरेकर यांच्या पुढाकारातून भारतीय—विशेषतः महाराष्ट्रीयन नागरिकांसाठी फुकेतमध्ये घर खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यांच्या SQCC Prope...

संचमान्‍यता व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजनाचा प्रश्‍न सोडवा

इमेज
आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतली शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची भेट गडचिरोली : अर्थसंकल्‍पीय अधिवेशनादरम्‍यान आमदार सुधाकर अडबाले यांनी विधान भवन येथे राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन शिक्षण विभागातील विविध मागण्यांबाबत चर्चा करून निवेदन दिले. यावेळी संचमान्यता दुरुस्ती, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन स्थगित करण्यात यावे व बीएलओची कामे न स्वीकारणाऱ्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट २०२४ नुसार शिक्षकांना अक्षैक्षणिक कामे देऊ नये, चंद्रपूर येथे बीएलओ म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकाला मारहाण प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात यावी, याबाबत चर्चा करून निवेदन दिले. तसेच दिनांक १८ मार्च २०२६ च्या इतिवृत्तानुसार पत्र निर्गमित करण्यात यावे व तोपर्यंत समायोजन प्रक्रिया स्थगित ठेवण्यात यावी, याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी मागणी केली. यावर मंत्री महोदयांनी सचिव साहेबांशी संपर्क साधून पत्र काढण्याबाबत सूचना केल्या. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार दिल...

श्री रामनामाच्या जयघोषाने दुमदुमले अवघे चंद्रपूर

इमेज
आ.मुनगंटीवार यांनी घेतला शोभायात्रेत सहभाग; आकर्षक 'फायर शो'ने वेधले चंद्रपूरकरांचे लक्ष श्रीरामनवमी निमित्त भक्ती, उत्साह आणि परंपरेचा संगम; शीतपेयाचे वाटप उपक्रम चंद्रपूर - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी श्रीरामनवमीच्या पावन आणि मंगलमय दिवशी चंद्रपूर येथे आयोजित भव्य शोभायात्रेचे गिरनार चौक येथे स्वागत केले. यावेळी आ. मुनगंटीवार म्हणाले, 'प्रभू श्रीराम आमचा प्राण, अस्मिता आणि अभिमान आहेत, आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून आपले जीवन समृद्ध होईल.' चंद्रपूर शहरात भक्तिमय वातावरणात झालेला हा सोहळा उत्साह आणि श्रद्धेचा प्रतीक ठरला. चंद्रपूरकर भक्तिरसात न्हाऊन निघाले. यावेळी झालेला 'फायर शो' संपूर्ण शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरला. रंगीबेरंगी रोषणाई, लक्षवेधक आतषबाजी आणि उत्साहाने भारलेल्या वातावरणात चंद्रपूरकर मोठ्या आनंदाने शोभायात्रेत जयघोष करत सहभागी झाले. भाविकांच्या सेवेसाठी आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या तर्फे शीतपेयाचे वितरण करण्यात आले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सोय...

कोटगलचा एल्गार: दारूमुक्त गावासाठी महिलांची वज्रमूठ; रेशन बंद करण्यासह ३००० रुपयांचे बक्षीस जाहीर!

इमेज
कोटगल (गडचिरोली): "दारूमुळे उध्वस्त होणारे संसार वाचवण्यासाठी आणि गावातील शांती टिकवण्यासाठी आता गप्प बसणार नाही," असा आक्रमक पवित्रा कोटगल येथील महिलांनी घेतला आहे. कोटगल ग्रामसभा, तंटामुक्त समिती आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावात 'संपूर्ण दारूबंदी' चा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जाणार आहेत. दारूमुळे कोलमडलेली कुटुंबव्यवस्था आणि महिलांचा आक्रोश गावसभेमध्ये महिलांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, दारूच्या व्यसनामुळे गावातील अनेक पुरुषांचे आपल्या संसाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. दारू पिऊन घरी आल्यावर महिलांना अमानवीय वागणूक देणे, जेवताना विनाकारण मुलांवर आणि पत्नीवर शिवीगाळ करणे, आणि घरात सतत भांडण-तंटा करणे यामुळे मुलांच्या भविष्यावर वाईट परिणाम होत आहेत. दारूमुळे अनेक तरुण आणि मध्यमवयीन लोक गंभीर आजारांना बळी पडत असून, कुटुंबाचा आर्थिक कणा मोडला आहे. या सर्व त्रासाला कंटाळून आता महिलाशक्ती एकवटली आहे. माहिती देणाऱ्याचे नाव राहणार 'पूर्णपणे गुपित' गावात लपून-छपून दारू व...

महाराष्ट्रात योग आयोग स्थापन करा — आ. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी

इमेज
राज्य सरकार सकारात्मक; लवकरच निर्णय — राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन आयोगासह आयुष मंत्रालय देखील स्थापन होणार मुंबई : महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र योग आयोगाची तातडीने स्थापना करावी, अशी जोरदार मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत अर्धा तास चर्चेदरम्यान केली. योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असून त्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. विशेष म्हणजे तब्बल १७७ देशांनी या उपक्रमास मान्यता दिली आहे. आमदार मुनगंटीवार यांनी या संदर्भात बोलताना नमूद केले की, देशातील मध्यप्रदेश, गुजरात, हरियाणा, उत्तराखंड व राजस्थान या राज्यांमध्ये योग आयोग स्थापन करण्यात आले आहेत; मात्र महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अद्याप अशी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.२७ जानेवारी २०२५ रोजी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात निवेदन सादर केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रस्ताव सादर करण्याचे निर्द...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा : धानाला बोनस देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक

इमेज
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. धान पिकाला बोनस (प्रोत्साहनपर राशी ) देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील निकष निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने लढा देणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यामुळे मोठे यश मिळाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार मुनगंटीवार यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना उपस्थित करून धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा विधानसभेच्या पटलावर पोट तिडकीने मांडली होती. धान उत्पादनासाठी वाढलेला खर्च, नैसर्गिक आपत्तींचे संकट आणि बाजारभावातील अस्थिरता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांना तातडीने दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. आज अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र...

“स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक" – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा"

इमेज
कुरंडीमाल आश्रमशाळेत अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन गडचिरोली, (जिमाका) दि.२५: “गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आत्मविश्वास, आर्थिक साक्षरता, आरोग्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे अत्यावश्यक आहे. यामुळेच विद्यार्थी जागतिक स्पर्धात्मक युगात सक्षमपणे उभे राहू शकतात,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांनी केले.  शासकीय आश्रमशाळा, कुरंडीमाल (ता. आरमोरी) येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे ही काळाची गरज आहे. मेल-जोल संस्थेने आदिवासी विकास विभागाशी समन्वय साधून कुरंडीमालसारख्या दुर्गम भागात संगणक प्रयोगशाळा उभारणे हे अत्यंत स्तुत्य कार्य आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात व कौशल्यात मोठी भर पडून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. तसेच डिजिटल दरी कमी करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास हा उपक्रम उ...

महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे टूर गाईड प्रशिक्षणाचे आयोजन

गडचिरोली, (जिमाका) दि.२५: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाअंतर्गत पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पर्यटकांसाठी दूर गाईडची व्यवस्था करणे व स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या हेतूने पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल्स गाईड) प्रशिक्षण (Soft Skill Training Programme) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये Basic Training. Advance Training आणि Soft Skill Training या प्रकारच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. Basic Training करीता २०० टूर गाईड्स, Advance Training करीता १०० टूर गाईड्स आणि Soft Skill Training करीता पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योगांमधील सहभागधारक टूर ऑपरेटर, हाऊसकिपीग अटेंडेंट, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस असिस्टंट, इ. संबंधित १५० व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट (Indian Institute of Tourism and Travel Management), ग्वालियर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ञ प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करतील. सात दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे (DoT) प्रमाणपत्र व टूर गाईड म्हणू...

डिजिटल शेतीशाळा : हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT)शेतीशाळेतील तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२५: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० प्रकल्प अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याची निवड झाली असून या प्रकल्पाचा प्रमुख उद्‌देश बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना तसेच भूमिहीन कुटुंबाना सक्षम करणे व कृषी आधारित उपजीविकेचे साधने उपलब्ध करून शेती किफायतशीर करणे हा आहे. बदलत्या हवमानाचा शेतीला कमीत कमी फटका बसेल यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात येत असून प्रकल्पाअंतर्गत डिजिटल शेतीशाळा अभियान स्वरूपात राबविण्यात येत असून हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT) विषयक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पानी फाउंडेशनद्वारे संचलित "डिजिटल शेतीशाळा हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे, जिथे तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीकनिहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम (Zoom) आणि यूट्यूब (YouTube) च्या माध्यमातून दिले जाणार आहे. सदर शेती शाळा चार भागात घेतली जाणार असून त्याबद्दलचा तपशील नियोजित दिनांकासहित पुढील प्रमाणे आहे. भाग -१ पेरणीपूर्व तंत्रज्ञानः बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, आंतरपीक पद्धत, बीज उगवण क्षमता चाचणी आणि बीजप्रक्रिया, नियोजित दिनांक: १ ...

उच्च शिक्षण विभागातील प्रश्नांना घेऊन मंत्र्यांची भेट

इमेज
आमदार सुधाकर अडबाले यांनी मागण्यांबाबत दिले मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन गडचिरोली : उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री मा. ना. चंद्रकांत दादा पाटील यांची विधान भवन येथे आमदार श्री सुधाकर अडबाले यांनी भेट घेऊन उच्च शिक्षण विभागातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी गडचिरोली येथे सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी, विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण नागपूर येथील रिक्त पीठासीन अधिकारी पदी नियमित अधिकारी नियुक्त करण्यात यावा, राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील कार्यरत कर्मचारी यांचे सन २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांचे नियुक्ती दिनांक पासून डीसीपीएस (परिभाषित अंशदान योजना) मूळ पगाराच्या १०% प्रमाणे शासन हिश्याच्या रकमेची मागणी करून कर्मचाऱ्यांच्या खात्यात भरणा करण्यात यावा, डीसीपीएस/एनपीएस निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत दि. १.११.२००५ रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक यांच्या जुन्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ सेवा जोडण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात यावे व अन्य मागण्यांबाबत चर्चा करून आमदार सुधाकर अडबाल...

विधानसभा आश्वासनांचा अवमान थांबवा : अधिकाऱ्यांच्या मुजोरीवर आ. सुधीर मुनगंटीवार आक्रमक

इमेज
लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचा अवमान सहन केला जाणार नाही – आ. सुधीर मुनगंटीवार यांची परखड भूमिका विधानसभा आश्वासन समितीचा अहवाल समिती प्रमुख आमदार रवि राणा यांनी आज सभागृहासमोर मांडला. अहवाल सादर करताना समितीच्या बैठकींना वरिष्ठ अधिकाऱ्यांची सातत्याने राहणारी अनुपस्थिती हा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हस्तक्षेप करत अत्यंत ठाम आणि परखड भूमिका मांडली. मंत्री लोकहिताच्या भावनेतून सभागृहात आश्वासने देतात; मात्र काही अधिकारी ही आश्वासने “तर्कसंगत नाहीत” असे सांगून अमान्य करण्याचा प्रयत्न करतात, अशी गंभीर बाब त्यांनी निदर्शनास आणली. इतकेच नव्हे तर आश्वासन समितीसमोर अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांनाच आश्वासन मागे घेण्यास भाग पाडले जाते, ही लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक प्रवृत्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. आ. मुनगंटीवार यांनी विशेषतः गोंडवाना विद्यापीठ उपकेंद्राच्या मुद्द्यावर शासनाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. वर्षभरापूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी चंद्रपूर येथे उपकेंद्र स्थापन करण्याची स्पष्ट घोषणा सभागृहात केली होत...

24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२३: २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी २४ मार्च १८८२ मध्ये मायकोबॅक्टेरीअम टयुबरक्युलोसीस या जिवाणूचा शोध लावला, म्हणून २४ मार्च हा दिवस आपण जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करतो. सन १९०५ मध्ये त्यांना औषध शास्त्रामधील उत्कृष्ठ कामगीरी बद्दल मानाचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या रोगाने संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक देशातील शासन आपले स्तरावर अथक प्रयत्न करीत आहे. भारतामध्ये राष्ट्रिय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सन १९६२ पासून प्रस्थापित जिल्हा क्षयरोग केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा क्षयरोग दवाखान्यामध्ये राबविला जात आहे. प्रारंभिच्या काळापासूनच या कार्यक्रमाची सांगड सर्वसामान्य आरोग्य सेवांशी घालण्यात आली होती आणि क्षयरोग विषयक सेवांचे वितरण प्राथमिक सेवांच्या माध्यमातून करण्यात येत होते. आरोग्य सेवा सामान्य जनतेपर्यंत पोचविण्यात आपण अग्रेसर आहोत. आरोग्य विभागाची यंत्रणा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात पोचलेली आहे. त्या...

"स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची”

इमेज
जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न गडचिरोली, (जिमाका) दि.२३: स्त्री-भ्रूण हत्या रोखणे, जनजागृती वाढविणे व संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याविषयी एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेमध्ये स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध, लिंग गुणोत्तराचे सामाजिक महत्त्व, पीसीपीएनडीटी कायद्याच्या तरतुदी व त्याची अंमलबजावणी यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गर्भपात (वैद्यकीय समाप्ती) कायदा, सहाय्यित प्रजनन तंत्रज्ञान कायदा आणि सरोगसी (प्रतिनिधी मातृत्व) कायदा याबाबतही उपस्थितांना सखोल माहिती देण्यात आली. संबंधित कायद्यांचे उल्लंघन झाल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईबाबतही स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. ए.पी. खानोरकर (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली), डॉ. संतोष कोकुडे (अति. जिल्हा आरोग्य अधिकारी) तसेच सामाजिक कार...

गडचिरोली जिल्ह्यात 15 दिवस जमावबंदी लागू – जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२३: जिल्ह्यात दिनांक २६ मार्च २०२६ रोजी श्रीरामनवमी उत्सव तसेच दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जयंती जिल्ह्यात सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. तसेच सी.पी.आय. (माओवादी) या नक्षल संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा माओवाद्यांतर्फे माहे फेब्रुवारी ते जुन २०२६ या कालावधी दरम्यान टि. सी. ओ. सी. राबविण्यात येणार आहे. या टि. सी. ओ. सी. दरम्यानच्या कालावधीत माओवाद्यांद्वारे हिंसक घटना, शासकीय कार्यालय, बांबू / बिट डेपो, दुरध्वनी टॉवर्स इत्यादीची जाळपोळ, आयईडी, क्लोमोर, माईन्स प्लँट करणे, भुसंरुग स्फोट घडवून आणने, सुरक्षा दले पोलीस पथक तसेच पोलीस स्टेशन वर हल्ले घडवून आनण्याचा प्रयत्न करणे, रस्त्यांवर अडथळे निर्माण करुन रहदारी बंद करणे त्याचप्रमाणे अॅक्शन टिम द्वारे महत्वाचे राजकीय व्यक्ती, पोलीस अधिकारी /अमलदार व इतर शासकिय अधिकारी तसेच पोलीसांना मदत देणारे बातमिदार यांना लक्ष करणे इत्यादी हिंसक कारवाया करण्याच्या प्रयत्न करु शकतात. त्याचप्रमाणे रेल्वे संपतीस सुध्दा धोका पोहोचविण्याची तसेच काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे ...

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार / उद्योजक मेळाव्याचे आयोजन

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२३: गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली, दे-आसरा फाऊंडेशन, आणि इनक्यूबेशन कम बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठ, कोटगल रोड गडचिरोली येथे दिनांक २५ मार्च २०२६ रोजी ११.०० वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार / उद्योजक मेळावा, आयोजित करण्यात आलेला आहे. सदर रोजगार/उद्योजक मेळाव्यामध्ये डॉ. रविंद्र अहेर (बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटजिस्ट), अमर नायसे (ब्रेन ऑप्टीमायझेसन कोच) व अनिरूदध आठवले (मेंटर इनफेड-IIM नागपूर) उपस्थित राहणार असून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन करणार असून विविध नामांकित कंपन्या सुध्दा सहभागी होणार आहेत. सदर रोजगार / उद्योजक मेळाव्याकरिता ईच्छूक असलेले उमेदवारांनी /उद्योजकांनी २५ मार्च २०२६ रोजी गोंडवाना विद्यापीठ, कोटगल रोड गडचिरोली येथे सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहून रोजगार/उद्योजक मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.

कर्तव्यपथावरील संचलनात अव्वल ठरलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचे गिरगावात प्रदर्शन

इमेज
नवी दिल्लीतील कर्तव्यपथ येथे प्रजासत्ताक दिन निमित्त पार पडलेल्या भव्य संचलनात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे गिरगाव येथे नागरिकांसाठी विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरा, कला आणि सांस्कृतिक वैभवाचे आकर्षक दर्शन घडत असून, प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी, सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक तसेच पर्यटकांसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरत आहे. या प्रदर्शनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृतीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

पंडित दिनदयाल उपाध्याय ‍ महिला रोजगार मेळावा यशस्वीरित्या संपन्न

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.१८: नोकरी शोधणारे व नोकरी देणारे यांना एकाच व्यासपीठावर आणून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व नियोक्ता / उद्योजकांना कुशल मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली,महिला महाविद्यालय, गडचिरोली व फुले, आंबेडकर महाविद्यालय , गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 मार्च 2026 रोजी महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे पंडित दिनदयाल उपाध्याय ‍ महिला रोजगार मेळावा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला. सदर रोजगार मेळाव्यास एकुण १०० पेक्षा अधिक उमेदवारांनी सहभाग नोंदविला आहे. LIC, गडचिरोली व संसूर श्रुष्ठी या नामांकित दोन उद्योजकांनी सहभाग घेतलेला असून दोन्ही उद्योजकांनी विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी उद्योजकामार्फत उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यांत आल्या . त्यामध्ये एकुण ४६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यांत आलेली आहे. व उर्वरित उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी मार्गदर्शन कर...

जिल्हाधिकारी कार्यालय येथे 'जागतिक ग्राहक हक्क दिन' उत्साहात साजरा

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.१८: सदर आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती प्रतिभा पाटील, सदस्य, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली आणि अध्यक्ष सादिक झवेरी, माजी अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली तसेच प्रमुख अतिथी श्रीमती माधुरी आटमांडे, सदस्य, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली, श्रीमती नेहा हांडे, पी.एस.आय. सायबर सेल, पोलीस अधिक्षक कार्यालय, गडचिरोली, चंद्रशेखर भडांगे, अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण समिती, गडचिरोली, प्रविण घाटे, अशासकीय सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण समिती, गडचिरोली, सुरज मेश्राम, अशासकीय सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण समिती, गडचिरोली, संजय धकाते, जिल्हा संघटक, ग्राहक पंचायत, गडचिरोली, विजय चाटे, जिल्हा अध्यक्ष, ग्राहक संरक्षण समिती, गडचिरोली तसेच कमलेश तुमसरे, जिल्हा प्रबंधक, ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी आणि ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.  सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी प्रस्ताविक केले असून या आधुनिक क...

“गर्भावस्थेपासून वृद्धत्वापर्यंत शासनाची साथ” — सुहास गाडे भामरागड येथे मल्टिमीडिया प्रदर्शन; योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.१८:  “नागरिकांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर—गर्भावस्थेपासून ते वृद्धत्वापर्यंत—शासन विविध जनकल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तहसील कार्यालय, भामरागड येथे शासनाच्या विविध योजनांवरील मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी श्री. गाडे यांनी विविध विभागांच्या योजनांची माहिती प्रत्यक्ष पाहून समाधान व्यक्त केले. दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला व बालकल्याण, सामाजिक न्याय, रोजगार व कौशल्य विकास आदी विभागांच्या योजनांची माहिती जाणून घ्यावी व त्याचा...

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ

इमेज
लाभार्थ्यांना DBT प्रणालीवरील माहीती अद्ययावत करण्याचे आवाहन गडचिरोली, (जिमाका) दि.18: दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात १०००/- रु. ची वाढ करून २५००/- इतके अनुदान D.B.T. प्रणाली व्दारे देण्यात येत आहे. करीता लाभार्थ्यांचे ऑनलाईन UDID कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र) पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या सामाजिक सुरक्षा योजनेतील दिव्यांग लाभाच्यांचे UDID आधार संलग्नीकरण करणबाबत ५ मार्च, २०२६ रोजी आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांना UDID व आधार संलग्न नसल्याबाबतची माहीती सभेमध्ये सादर केली असुन सदर लाभार्थ्यांची माहीती DBT प्रणालीवरील माहीती अपडेट करण्याचे निर्देश दिलेले आहे. दिव्यांग लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये म्हणून लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड आधार क्रमांक व बँकेचे पासबुक झेरॉक्स गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किंवा तहसिल कार्यालय संजय गांधी योजना येथे दि. २०.०३.२०२६ पुर्वी जमा करावे तसेच दिव्यांग UD...

“वी केअर अँड क्युअर” उपक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे VIA तपासणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलांसाठी आयोजित उपचार शिबिर यशस्वीरीत्या संपन्न.”

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.१८: “वी केअर अँड क्युअर” या उपक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दिनांक १७/०३/२०२६ रोजी व्हिज्युअल इन्स्पेक्शन ऑफ अॅसिटिक अॅसिड (VIA) या तपासणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलांसाठी विशेष उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. VIA ही एक सोपी, किफायतशीर आणि प्रभावी तपासणी पद्धत असून ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या तपासणीत पॉझिटिव्ह निष्कर्ष आलेल्या महिलांना वेळेत उपचार मिळावेत आणि कर्करोग होण्यापूर्वीच आजारावर नियंत्रण मिळवता यावे, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश होता. सदर शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक तथा (राज्य आयएमए - एचपीव्ही लसीकरण, गर्भाशय मुख व स्तन कर्करोग समिती अध्यक्षा) डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. त्यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये चामोर्शी तालुक्यातील १३ महिलांची तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक त्या वैद्यकीय उपचारांची अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आखाडे ...

अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.  १८: आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोदंणी कार्ड (EMPLOYMENT CARD )असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे. प्रशिक्षणा दरम्यान रु.१००० ( एक हजार रुपये ) दरमहा विदयावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणा-या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. तसेच अर्ज दि.०१/०३/२०२६ पासुन २४/०३/२०२६ पर्यत या कार्यालयात सादर करावेत मुलाखत दि.२५/०३/२०२६ रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.२ गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे त्याकरीता उपस्थ‍ित राहावे अधिक माहीतीसाठी ८४८५८१४...

सांगोला मध्ये दहावीच्या प्रश्नपत्रिका चोरीचा पर्दाफाश; अल्पवयीन आरोपी ताब्यात

इमेज
सोलापूर:  जिल्ह्यातील सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेत दहावी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १७ मार्च २०२६ रोजी शाळेच्या कस्टडी रूममध्ये सुरक्षित ठेवलेले पेपर अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना समोर आल्यानंतर सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी आरोपीचा शोध लावला असून हा गुन्हा एका अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकाने केल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित बालकाने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या कारवाईत गुन्हा करताना वापरलेले इलेक्ट्रिक कटर, इलेक्ट्रिक मोटार सायकल तसेच चोरीस गेलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि तीन कोऱ्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण घटनेची माहिती शालेय शिक्षण विभाग मार्फत देण्यात आली असून, या प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधितांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

शासकीय आरोग्य योजनांतर्गत रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर थेट फौजदारी गुन्हे: आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांचे कडक आदेश

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.१७: राज्य शासनाची 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना' आणि केंद्र शासनाची 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभाग पूर्णतः कटिबद्ध आहे. "या योजनांतर्गत मिळणारे उपचार हा सामान्य जनतेचा हक्क आहे. जर कोणत्याही अंगीकृत रुग्णालयाने रुग्णांकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली किंवा उपचारात हलगर्जीपणा केला, तर संबंधित रुग्णालय व्यवस्थापनावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा," असे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय व खासगी रुग्णालयांना शासन नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. "शासकीय आरोग्य योजनांतर्गत येणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार हे पूर्णतः मोफत असणे अनिवार्य आहे. कोणत्याही तांत्रिक कारणास्तव किंवा औषधे-साहित्याच्या नावाखाली रुग्णांकडून पैशांची मागणी करणे हे कराराचे उल्लंघन ठरेल. ...

“शासकीय योजनांचा लाभ हा प्रत्येक नागरिकाचा हक्क” – अमर राऊत भामरागडमध्ये मल्टिमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन; ८५ शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.१७: “शासकीय योजनांचा लाभ घेणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घेऊन त्यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन व सामाजिक न्याय विभाग यांच्या सहकार्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तहसील कार्यालय, भामरागड येथे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांवरील मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन अमर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव व तहसीलदार किशोर बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनप्रसंगी ते पुढे म्हणाले की, या प्रदर्शनामधून योजनांची थोडक्यात व सुस्पष्ट माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत असून त्याचा निश्चितच लाभ होईल. भामरागडसारख्या दुर्गम भागात अशा प्रकारे योजनांची माहिती पोहोचविणे हा जिल्हा माहिती कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम आहे. तसेच सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाच्या योजना शेवटच्या गाव व टोल्यांपर्...

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून ३७९ प्रलंबित आणि१७२ दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.१६: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, उच्च न्यायालय, मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय, गडचिरोली व गडचिरोली जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयात दिनांक १४ मार्च २०२६ रोजी या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. सदर लोकअदालतमध्ये एकूण प्रलंबित प्रकरणांपैकी तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, कलम १३८ एन आय अॅक्ट अंतर्गत प्रकरणे, मोटार वाहन कायदा अंतर्गत चालान प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेची कर्ज वसुलीची प्रकरणे व दिवाणी प्रकरणे ठेवण्यात आली होती. तसेच दाखलपुर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची थकीत विजबील प्रकरणे, पतसंस्था व बँकेची थकीत कर्ज प्रकरणे, फायनान्स कंपनीची थकीत कर्ज प्रकरणे, ग्राहक न्यायालयातील प्रकरणे ठेवण्यात आली होती. गडचिरोली जिल्हयात एकुण १० पॅनल नेमण्यात आले. सदर लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेल्या एकूण प्रलंबित प्रकरणांपैकी ३७९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यापैकी किरकोळ गुन्हा प्रकरणांमध्ये एकुण २...

पंडित दिनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.१६: नोकरी शोधणारे व नोकरी देणारे यांना एकाच व्यासपीठावर आणून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व नियोक्ता / उद्योजकांना कुशल मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली,महिला महाविद्यालय, गडचिरोली व फुले , आंबेडकर महाविद्यालय , गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ मार्च २०२६ रोजी वेळ स.१०.०० वा पासून महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे पंडित दिनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी नामांकित कंपनी / आस्थापनांमध्ये विविध रोजगार व नोकरीच्या संधीसाठी उद्योजक विविध पदांसोबत सहभाग होणार असून बेरोजगार युवक - युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी उद्योजकामार्फत विविध पदांकरीता उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करण्यांत येणार आहे. तरी, गडचिरोली जिल्हयातील जास्तीत-जास्त बेरोजगार युवक - युवतींनी या रोजगार मेळाव्यास दिनांक १८ मार...

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि. १६ : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आधारित आधुनिक उपाययोजनांचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य शासन आणि वाधवानी एआय (LEHS AI Unit) या सामाजिक हेतूने कार्य करणाऱ्या ना-नफा-ना-तोटा संस्थेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या या सामंजस्य कराराअंतर्गत क्षयरोग (TB), मातृ, नवजात व बाल आरोग्य (MNCH), प्राथमिक आरोग्य सेवा, ई-हेल्थ आदी क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा समावेश करून आरोग्य सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यात येणार आहे. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार, वेळेवर आणि प्रभावी आरोग्य सेवा पोहोचवणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल महाराष्ट्र आता पुढील टप्प्यात प्रवेश करत असून कृत्रिम बुद्धिमत्...

स्वयंसेवी वैद्यकीय सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सीएमई क्रेडिट गुण प्रणाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून पारदर्शक व सर्वसमावेशक निर्णय

इमेज
मुंबई, दि. 16: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या स्वयंसेवी सेवेचा सन्मान आणि प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) सातत्याने सकारात्मक पावले उचलण्यात येत आहे. याच अनुषंगाने स्वयंसेवी सेवेकरिता CME (Continuing Medical Education) क्रेडिट गुण प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी स्पष्ट व पारदर्शक धोरण राबविण्यात येत आहे. स्वयंसेवी सेवेसाठी सीएमई (CME) क्रेडिट गुण देण्याबाबत सखोल विचार करून परिषदेकडून सध्या अंमलात असलेल्या प्रणालीची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मान्यताप्राप्त असलेल्या संघटना, संस्था, अध्यापन संस्था तसेच वैद्यकीय महाविद्यालयांना ठराविक निकष व मार्गदर्शक तत्वांनुसार CME क्रेडिट गुण प्रदान करण्यात येत आहेत. यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांचे ज्ञान अद्ययावत राहण्यासोबतच त्यांच्या सामाजिक बांधिलकीलाही चालना मिळत आहे. ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात शस्त्रक्रिया, वैद्यकीय शिबिरे किंवा आरो...