जिल्हाधिकारी कार्यालय येथे 'जागतिक ग्राहक हक्क दिन' उत्साहात साजरा

गडचिरोली, (जिमाका) दि.१८: सदर आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती प्रतिभा पाटील, सदस्य, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली आणि अध्यक्ष सादिक झवेरी, माजी अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली तसेच प्रमुख अतिथी श्रीमती माधुरी आटमांडे, सदस्य, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली, श्रीमती नेहा हांडे, पी.एस.आय. सायबर सेल, पोलीस अधिक्षक कार्यालय, गडचिरोली, चंद्रशेखर भडांगे, अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण समिती, गडचिरोली, प्रविण घाटे, अशासकीय सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण समिती, गडचिरोली, सुरज मेश्राम, अशासकीय सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण समिती, गडचिरोली, संजय धकाते, जिल्हा संघटक, ग्राहक पंचायत, गडचिरोली, विजय चाटे, जिल्हा अध्यक्ष, ग्राहक संरक्षण समिती, गडचिरोली तसेच कमलेश तुमसरे, जिल्हा प्रबंधक, ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी आणि ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

 सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी प्रस्ताविक केले असून या आधुनिक काळात सायबर क्राईम व्दारे होणाऱ्या फसवणुकी पासुन सावधानता कशी बाळगावी त्याकरीता आवश्यक उपाययोजना कश्या कराव्या याबाबत अतिशय चांगली माहिती श्रीमती नेहा हांडे, पी.एस. आय. सायबर सेल, पोलीस अधिक्षक कार्यालय, गडचिरोली यांनी दिली आहे. तसेच इतर वक्त्यांनी सांगितले की, "बदलत्या काळात बाजारपेठ विस्तारत असताना ग्राहकांनी केवळ वस्तू खरेदी न करता, त्यातील गुणवत्ता, किंमत आणि सुरक्षेबाबत सजग राहणे गरजेचे आहे. 'ग्राहक राजा' संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी हक्कांसोबतच कर्तव्याची जोड हवी" आहे. तसेच ग्राहकांवर अन्याय झाल्यास स्वतः पुढाकार घेऊन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदविणे आवश्यक असल्याचे मत सादिक झवेरी, माजी अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली यांनी व्यक्त केले. जेणेकरून त्यांना न्याय देण्यास मदत होईल.

जागतिक ग्राहक हक्क दिनाचे प्रबोधन व्हावे या दृष्टीकोनातून अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली, वैधमापन शास्त्र विभाग, गडचिरोली, प्रादेशिक परिवहन विभाग, गडचिरोली, भारत संचार निगम लिमीटेड, श्री. गॅस एजन्सी, गडचिरोली, कृषी विभाग, गडचिरोली यांचेमार्फत प्रदर्शनी लावण्यात आली होती.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुपचंद फुलझेले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती अश्विनी आसवले जिल्हा पुरवठा कार्यालय, गडचिरोली यांनी केले. सदर आयोजित प्रदर्शनी करीता गडचिरोली जिल्हयातील नागरीकांचा उत्सफूर्त सहभाग होता. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.