पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

७७ वर्षांत प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांचा बीनागुंडा-लाहेरी या दुर्गम भागातील नागरिकांशी मुक्त संवाद

इमेज
नक्षलमुक्तीच्या दिशेने विश्वासाचा पूल; फार्मर आयडी, पायाभूत सुविधा व आरोग्य सेवांवर भर गडचिरोली, (जिमाका) दि.२९: गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर, छत्तीसगड सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षांत प्रथमच जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देत नागरिकांशी खुलेपणाने संवाद साधला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या संवेदनशील भागात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यांच्या अडचणींची थेट पाहणी केली आणि शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना वैयक्तिक व सामूहिक वनपट्ट्यांबाबत माहिती घेतली. “वनपट्टेधारकांनी तातडीने फार्मर आयडी तयार करून घ्यावा, कारण याच ओळखपत्राच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी पक्का रस्ता, मोबाईल टॉवर, नियमित वीजपुरवठा, नवीन वनपट्टे अशा मूलभूत मागण्या मांडल्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे...

गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना सुमारे ३१.३५ लाखांची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती गडचिरोली, (जिमाका) दि.२९: शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३१ रुग्णांना सुमारे ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींचे सहकार्य मिळत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे. २० गंभीर आजारासाठी मदत कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यार...

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तीन दिवसीय गडचिरोली दौऱ्यावर

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२९: राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल दिनांक २९ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात विविध विकासकामांचा आढावा तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. २९ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजता देसाईगंज (वडसा) येथे आगमन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पदस्पर्शभूमी (दीक्षाभूमी) येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. रात्री ९.३० वाजता गडचिरोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृहात मुक्काम. गुरुवार (दि. ३० एप्रिल) रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे विविध विषयांवरील आढावा बैठकीस ते उपस्थित राहतील. सायं. ६.३० वाजता विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. शुक्रवार (दि. १ मे) रोजी सकाळी ८ वाजता महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त पोलीस क्रीडांगण, गडचिरोली येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्...

नागरिकांना पारदर्शक व वेळेत सेवा द्या - जिल्हाधिकारीसेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. २८ : सेवा हक्क दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना पारदर्शक, वेळेत व सुलभ सेवा देण्याची शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपस्थितांना शपथ देत सेवा वितरण प्रक्रियेत पारदर्शकता, वेळेचे काटेकोर पालन आणि नागरिकाभिमुख दृष्टीकोन ठेवण्याचे मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी यावेळी सांगितले की, शासनाच्या विविध सेवा निर्धारित कालमर्यादेत पात्र नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. सेवांमध्ये कोणताही विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करावे. प्रामाणिकपणा, निःस्वार्थी वृत्ती आणि संवेदनशीलता या मूल्यांच्या आधारे काम केल्यास नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सेवांमध्ये पारदर्शकता राखणे, वेळेवर सेवा उपलब्ध करून देणे तसेच लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प व्यक्त केला...

परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

गडचिरोली, (जिमाका) दि.२८: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) नवी दिल्ली यांच्यामार्फत NEET (UG) -२०२६ ही परिक्षा दिनांक ०३ मे २०२६ रोजी दुपारी २.०० ते ५.०० वाजेपर्यत जिल्हा मुख्यालयातील विविध परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. या परिक्षा केंद्रावरील परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पडतील व तेथील परिक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परिक्षा देणे शक्य होईल अशी व्यवस्था करावी म्हणून सदर परिक्षा केंद्रांच्या परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम १६३ अन्वये मनाई हुकुम जारी करणे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता आवश्यक झाले आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, अविश्यांत पंडा यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये सदर परिक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सदर परिक्षा केंद्राच्या २०० मिटर अंतरापर्यंत पुढीलप्रमाणे बाबी/कृत्ये करण्यास मनाई आदेश जारी केले आहे. निषिद्ध क्षेत्रात झेरॉक्स मशीन, फॅक्स व एस टी डी बुथ परिक्षा कालावधीत सुरु राहणार नाही. परिक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर...

उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आरटीओ सेवा वेळेत बदलयोग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणी आता सकाळी ७ ते १२ आणि दुपारी ४ ते ६ या वेळेत.

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. २७: जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तसेच पक्की अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.  सदर सेवा सकाळी ७.०० ते १२.०० वाजेपर्यंत आणि दुपारी ४.०० ते ६.०० वाजेपर्यंतच उपलब्ध राहणार आहे. दुपारी १२.०० ते ४.०० या कालावधीत तीव्र उष्णतेमुळे सर्व प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून संरक्षण मिळावे, तसेच सेवा घेणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. किरण मोरे यांनी स्पष्ट केले असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नवीन वेळापत्रकाची नोंद घेऊन नियोजन करावे व संबंधित सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यावा – खासदार डॉ. नामदेव किरसान

इमेज
‘दिशा’ समितीची आढावा बैठक संपन्न; विकासकामांना गती देण्याचे निर्देश गडचिरोली, (जिमाका) दि. २७: जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत जनसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवणे आता अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणींचे कारण न देता शासकीय यंत्रणेने स्वतःहून पुढाकार घेऊन शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील नागरिकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आणि ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहुल काळभोर उपस्थित होते. विविध योजनांचा घेतला सविस्तर आढावा बैठकीत खासदार डॉ. किरसान यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आणि केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने: प्रधानमंत्री ग्राम सडक योजना :...

देशातील पहिली डिजिटल जनगणना-२०२७; स्व-गणना सुविधेचा लाभ घ्या — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. २४ : भारतातील पहिली डिजिटल जनगणना म्हणून ओळखली जाणारी जनगणना-२०२७ ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक प्रक्रिया असून, यात स्वगनेच्या माध्यमातून सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे जनगणना-२०२७ ही दोन टप्प्यांत पार पडणार असून, टप्पा १ – घरयादी व घरगणना दि. १६ मे २०१६ ते १४ जून ३०२६ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर टप्पा २ – लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत अचूक व विश्वसनीय माहिती संकलनावर भर दिला जाणार आहे. यंदाच्या जनगणनेत प्रथमच स्व-गणना (Self Enumeration) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना स्वतःच्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या कुटुंबाची माहिती भरता येणार आहे. ही सुविधा दि. १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. स्व-गणना पूर्ण केल्यानंतर मिळणारी Self Enumeration ID (SE ID) जतन करून ठेवणे आवश्यक असून, प्रगणक घरी आल्यावर ही ID त्यांना देणे बंधनकारक राहणार आहे. शहरी तसेच ग्रामीण भागाती...

उद्योगात प्रत्यक्ष कामाची तरुणांना संधी, पंतप्रधान इंटर्नशीन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात.

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. २४ : भारताच्या माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास योजनेंतर्गत “ पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची “ घोषणा केलेली आहे.सन २०२६ -२७ मध्ये या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून, देशभरात ३१ हजार ४८० तरुणांना कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, रिटेल, वाहननिर्मिती, औषधनिर्माण, उत्पादन, माध्यम, शिक्षण, पर्यटन, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये कार्यप्रशिक्षण उपलब्ध आहे.या कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ६ ते ९ महिने असून, प्रशिक्षणार्थींना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच कार्यप्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदारांची शैक्षणिक पात्रता दहावीपासून बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर अशी असावी.  पू...

गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांची ‘खरीप हंगामपूर्व कार्यशाळा २०२६’ उत्साहात संपन्न

इमेज
रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीची चळवळ उभी करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन गडचिरोली, (जिमाका) दि. २४ : कृषी विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (FPC) एकदिवसीय खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत आगामी खरीप हंगामाचे नियोजन, हवामान बदल आणि शाश्वत शेती पद्धतींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शन आणि आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) श्रीमती प्रिती हिरळकर यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना सेंद्रिय शेतीची मोठी चळवळ उभी करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, युरीया आणि डीएपी (DAP) सारख्या रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी सेंद्रिय स्व निर्मित खतांवर भर द्यावा. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर वाढवावा. जैविक निवीष्ठा संसाधन केंद्र (BIRC) मार्फत निर्मित निविष्ठांचा वापर करण्यावर भर देत, 'एल निनो' (Al Nino) सारख्या हवामान बदल...

आश्रमशाळा विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढविण्यासाठी कार्यशाळा

आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके राहणार उपस्थित गडचिरोली, (जिमाका) दि. २४ : आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने शासकीय आश्रम शाळांतील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनेबाबत नागपूर विभागीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन स्थानिक धानोरा मार्गावरील महाराजा सेलिब्रेशन हॉलमध्ये शनिवार २५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता केलेले आहे. या कार्यशाळेला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यशाळेत राज्याचे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड ,सह सचिव म.रं. शेळके ,उप सचिव र.तु.जाधव, कक्ष अधिकारी स.वि.कोवे ,नागपूर विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह ,नाशिक विभागाचे उप आयुक्त संतोष ठुबे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम.आदींसह नागपूर विभागातील सर्व प्रकल्प अधिकारी ,सहाय्यक प्रकल्प अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागपूर विभागातील गडचिरोली, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, देवरी, भंडारा, वर्धा व नागपूर या नऊ प्रकल्पातील एकूण ७६ शा...

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचा २५ एप्रिल रोजी गडचिरोली दौऱ्यावर

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. २३ : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचा दिनांक २५ एप्रिल रोजी गडचिरोली येथे दौऱ्यावर येत असून या दौऱ्यादरम्यान ते शासकीय आश्रमशाळांतील नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासंदर्भातील उपाययोजनांवरील कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात धान खरेदीच्या अनुषंगाने आढावा बैठकही घेण्यात येणार आहे.  दौरा कार्यक्रमानुसार, शनिवार दिनांक २५ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. त्यानंतर सकाळी ९ वाजता शासकीय आश्रमशाळांतील नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत आयोजित कार्यशाळेत महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड, गडचिरोली येथे उपस्थित. दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे धान खरेदीच्या अनुषंगाने आढावा बैठकीस उपस्थित. सायंकाळी सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २६ एप्रिल रोजी; पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२३ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-२०२६ अंतर्गत जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०८.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी गडचिरोली येथे मतदान केंद्र क्रमांक १/१ निश्चित करण्यात आले असून, ते जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जुने शल्य चिकित्सक कक्षाजवळ, तळमजला, कॉम्पलेक्स, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे असणार आहे. या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या पात्र मतदारांनी मतदानासाठी येताना ओळख पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. मतदारांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे ओळखपत्र, नोंदणी प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व पात्र मतदारांना आवाहन केले आहे की, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर उपस्थित राहावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा.

आता मत्स्यव्यवसायाला कृषीचे बळ, वीजदर, वीमा योजनेचाही लाभ.

इमेज
किसान क्रेडिट कार्ड कर्जावर मिळणार व्याज सवलत गडचिरोली, (जिमाका) दि. २३ : राज्य शासनाने मत्स्यव्यवसाय क्षेत्राला (प्रक्रिया उद्योग वगळता) अधिकृतपणे कृषी समकक्ष दर्जा दिला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्य कास्तकारांना किसान क्रेडिट कार्डवर २ लाखांपर्यंत कर्जावर ४ टक्यांपर्यंत व्याज सवलत मिळणार आहे. शासन निर्णयानुसार, मत्स्य शेतकऱ्यांना कृषी दराने वीजपुरवठा, किसान क्रेडिट कार्डची सुविधा, कृषी दराने बँकांकडून कर्ज, तसेच कृषी विम्याप्रमाणे कमी हप्त्यांतील विमा संरक्षण यांचा लाभ मिळणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना जसे सौरऊर्जा अनुदानाचे लाभ मिळतात, तसेच लाभ मत्स्यव्यवसायिकांसाठीही लागू करण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या धोरणानुसार मच्छिमार व मत्स्यसंवर्धकांना व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी राष्ट्रीयकृत व इतर बँकांकडून अल्पमुदतीचे खेळते भांडवली कर्ज ७ टक्के व्याजदराने उपलब्ध होते. मात्र कर्जाची परतफेड एका वर्षात पूर्ण केल्यास केंद्राकडून ३ टक्के व्याजदर परतावा मिळत असल्याने मच्छिमारांना प्रत्यक्षात ४ टक्के व्याज भरावा लागत होता. याच धर्तीवर राज्य सरक...

०४ मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि. २३ : सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, शासन परिपत्रकामधील सुचनानुसार लोकशाही दिन दिनांक ४ मे २०२६ रोजी (सोमवार) दुपारी ३.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात येत आहे. ज्या तक्रारदारांना जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तहसिलदारांच्या उत्तराची प्रत व तालुका लोकशाही दिन टोकन क्रमांक प्रत जोडून विहित नमुन्यातील (प्रपत्र १ (ब)) अर्ज व त्यासोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी पाठविणे आवश्यक राहिल. तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा : सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल

इमेज
विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर गडचिरोली, (जिमाका) दि. २३ : जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आतापर्यंत घडलेल्या अपघातांचे सखोल विश्लेषण करून कारणे, जबाबदारी निश्चिती आणि टाळता येण्याजोगे घटक ओळखून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी दिले. सहपालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा घेण्यात आला. यात रस्ते अपघात प्रतिबंध व रस्ते कामांचा आढावा, “माझे गाव, आरोग्य संपन्न गाव” अभियान, जिल्हा रुग्णालय सेवा व आरोग्य योजनांची अंमलबजावणी, वन विभागातील प्रकरणे, वनहक्क दावे व मानव-वन्यजीव संघर्ष, कृषी विषयक बाबी, पाणीटंचाई व महावितरण व वीज पुरवठा स्थिती, एक कोटी वृक्ष लागवड आदी विषयांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम...

मिशन लक्षवेध अंतर्गत टेबल टेनिस खेळाडूंची पुनश्च निवड चाचणी

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२२: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत “मिशन लक्षवेध योजना” ही धोरणात्मक योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत टेबल टेनिस या खेळाचे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग, नागपूर येथे स्थापन करण्यात येणार असुन टेबल टेनिस या खेळाची निवड चाचणी याआधी माहे मार्च २०२६ आयोजीत करण्यात आली होती. परंतु संचालनालयाकडून प्राप्त निकषानुसार सर्व खेळाडू पात्र न ठरल्यामुळे पुनश्च टेबल टैनिस या खेळाची निवड चाचणी दि. २७/०४/२०२६ रोजी सकाळी ०९.०० वाजता इनडोअर हॉल विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर येथे घेण्यात येणार आहे.  “मिशन लक्षवेध योजना” अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग, नागपूर येथे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र अंतर्गत स्थापित होणाऱ्या प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडू निवड निकष पुढीलप्रमाणे आहेत. टेबल टेनिस : १. वयोमर्यादा :-  २५ वर्षाआतील मुले/मुली (त्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी) २. आवश्यक कागदपत्रे :- जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधा...

प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी

इमेज
सन २०२६- २७ करिता शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत इयत्ता १ ली करिता प्रवेश सुचना गडचिरोली, (जिमाका) दि.२२: सन २०२६- २७ या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याकरीता शासनाची योजना असुन त्या करीता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी जि. गडचिरोली या कार्यालया अंतर्गत अनुसुचित जमातीचे (आदिवासी) प्रवेशपत्र विद्यार्थ्याकडुन इयत्ता १ ली मध्ये प्रवेश घेण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. प्रवेशाकरीता जाहिरात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासुन प्रवेश अर्ज नि:शुल्क वितरीत करण्यात येणार असुन संपुर्ण भरलेले अर्ज दिनांक १५ मे २०२६ पर्यत स्विकारले जातील. प्रवेशासंबंधीत खालील अटी व शर्तीनुसार अर्ज करावे . १. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छुक विद्यार्थी अनुसुचित जमातीचा असावा. विद्यार्थ्याचे नाव सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या अनुसुचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. २. जर विद्यार्थ्याचे पालक दारिद्ररेशे खालील असेल तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले...

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड

शासकीय आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रकीया सुरु गडचिरोली, (जिमाका) दि.२२: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड जि.गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, निवास आणि सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या शाळांमध्ये नवीन प्रवेश देण्यात येत आहेत. प्रवेशासाठी उपलब्ध शाळा: खालील शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे: १. जारावंडी (इंग्रजी माध्यम) २. ताडगाव (इंग्रजी माध्यम) ३. तोडसा (मुलींसाठी) ४. कसनसूर ५. हालेवारा, ६. जांबिया, ७. लाहेरी, ८. कोठी शाळेतील उपलब्ध प्रमुख सोयी-सुविधा: शासकीय आश्रमशाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनामार्फत खालील सुविधा पूर्णतः मोफत दिल्या जातात. • दर्जेदार शिक्षण:- मराठी, सेमी-इंग्रजी व इंग्रजी माध्यमाची सोय आणि अनुभवी शिक्षक. • मोफत निवास व भोजन: सुसज्ज वसतिगृह आणि सकस आहार (नाश्ता, दोन वेळचे जेवण). • शैक्षणिक साहित्य: गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या, दप्तर व इतर स्टेशनरी. • वैद्यकीय सुविधा: ...

राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा २३ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्हा दौरा

इमेज
विश्रामगृह भेट, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक; विविध कार्यक्रमांना उपस्थिती गडचिरोली, (जिमाका) दि. २२ : राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार तसेच गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री मा. ना. ॲड. आशिष जयस्वाल यांचा गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा निश्चित करण्यात आला आहे. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून आढावा बैठक घेणार आहेत. दौरा कार्यक्रमानुसार, सकाळी ०९.३० वाजता रामटेक येथून गडचिरोलीकडे प्रयाण करून नागपूर–भिवापूर–आसरी मार्गे ते दुपारी १२.३० वाजता गडचिरोली येथील विश्रामगृहात आगमन करतील. त्यानंतर दुपारी ०१.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आयोजित बैठकीस ते उपस्थित राहून जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत. सायंकाळी ०५.३० वाजता पुन्हा विश्रामगृहात आगमन व राखीव वेळ ठेवण्यात आला असून, रात्री ०८.०० वाजता गडचिरोली येथून रामटेककडे परतीचा प्रवास करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मा. राज्य मंत्र्यांना आवश्यक ती सुरक्षा व समन्वय व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्...

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी

इमेज
सत्र २०२६- २७ करिता शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत इयता १ ली करिता प्रवेश सुचना गडचिरोली, (जिमाका) दि.२१: “सन २०२६- २७ या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याकरीता शासनाची योजना असुन त्या करीता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी जि. गडचिरोली या कार्यालयाअंतर्गत अनुसुचित जमातीचे (आदिवासी) प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून इयत्ता १ ली मध्ये प्रवेश घेण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. प्रवेशाकरीता प्रसिध्द झालेल्या दिनांकापासुन प्रवेश अर्ज निःशुल्क वितरीत करण्यात येणार असून संपूर्ण भरलेले अर्ज दिनांक १५ मे २०२६ पर्यंत स्विकारले जातील. प्रवेशासंबंधीत पुढील अटी व शर्तीनुसार अर्ज करावे. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छुक विद्यार्थी अनुसुचित जमातीचा असावा, विद्यार्थ्यांचे नाव सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या अनुसुचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. जर विद्यार्थ्यांचे पालक दारिद्र रेषे खालील असेल तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले बी.पी. एल. प्रमाणपत्र जोडाव...

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता इयत्ता 1 ली मध्ये शहरातील

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात गडचिरोली, (जिमाका) दि.२१: “अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे” या योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र २०२६-२०२७ करीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.   इयत्ता १ ली मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जमातीचा असावा व दिनांक ०१ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत जन्मलेला असावा. विद्यार्थ्याचा पालक शासकीय/निमशासकीय नोकर नसावा व त्यांचे वार्षिक उत्पन्न रूपये दोन लक्ष पेक्षा कमी असावे. या योजनेअंतर्गत आदीम जमाती/ दारीद्रय रेषेखालील / विधवा / घटस्फोटित व निराधार यादीतील पाल्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. इयत्ता १ ली प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.  इयत्ता १ ली प्रवेशासाठीचे अर्ज प्रकल्प कार्यालय गडचिरोली तसेच प्रकल्पांतर्गत नजीकच्या शासकीय/ अनुदानित आश्रमशाळेत उपलब्ध होती...

शिक्षकांवर अन्‍याय करणारे शासन निर्णय रद्द करा

इमेज
मार्च महिन्‍याचे वेतन तात्‍काळ करा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली धरणे / निदर्शने आंदोलन गडचिरोली : मार्च पेड इन एप्रिल चे वेतन तात्‍काळ अदा करण्यात यावे व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अन्‍यायकारक असे दि. १ एप्रिल २०२६, दि. २ एप्रिल २०२६ व, दि. २ एप्रिल २०२६ हे तीन शासन निर्णय रद्द करण्यात यावे, या प्रमुख दोन मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे / निदर्शने आंदोलन दि. २० एप्रिल २०२६ रोजी शिक्षण उपसंचालक नागपूर यांचे कार्यालयासमोर करण्यात आले. राज्‍यातील शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्च पेड इन एप्रिल चे वेतन अजून झालेले नाही. वेतन अदा करण्याबाबत अनेक अडचणी येत असल्‍याने शिक्षकांचे पगार थांबले आहेत. त्‍यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. माशाअ २०२५/प्र.क्र.५२/एसएम-४, दि. १ एप्रिल २०२६, माशाअ २०२४/प्र.क्र. ई-१३१२८८३/एसएम-४, दि. २ एप्रिल २०२६ व माशाअ २०२४/प्र.क्र. ई-१३१२९६३/एसएम-४, दि. २ एप्रिल २०२६ नुसार...

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज ; उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
• जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनावर भर द्यावा • पाणी बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करावे • वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा • खत पुरवठा व वितरणावर एआयच्या माध्यमातून लक्ष ठेवा मुंबई, दि. २० : संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषि, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्यासह कृषी, मदत व पुनर्वसन, वित्त, जलसंपदा, जलसंधारण, भारतीय हवामानशास्त्र विभाग, वित्त व नियोजन विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दि...

'पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड' अंतर्गत ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

गडचिरोली, (जिमाका) दि. २० : राज्यातील पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे 'पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड' (KCC) मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या देखभालीसाठी व दैनंदिन खर्चासाठी (खेळते भांडवल) आकर्षक व्याज सवलतीसह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना १.६० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध करून दिले जाईल. दूध संस्थेने हमी दिल्यास ही मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढवता येते. तसेच, ज्यांच्याकडे आधीच किसान क्रेडीट कार्ड आहे, त्यांनाही ३ लाखांपर्यंतची पतमर्यादा वाढवून घेता येईल. कर्जाचा मूळ व्याजदर ९% असला तरी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ३% आणि राज्य शासनाच्या ११ फेब्रुवारी २०२६ च्या निर्णयानुसार ४% अशी एकूण ७% पर्यंत व्याज सवलत मिळू शकते. बँकांनाही यात २% व्याज सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या पशुपालक / शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शून्य टक्के व्याजदराच...

कौशल्य चाचणी तथा सरळ प्रवेश प्रक्रीया द्वारे क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश

गडचिरोली, (जिमाका) दि.२०: आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे उद्देशाने महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत ०९ क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. या क्रीडा प्रबोधिनीमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे यासाठी शासनातर्फे कौशल्य खेळाडू शोध मोहीम राबविली जात आहे.  राज्यातील एकूण ९ क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी सरळ प्रवेश प्रक्रीया व कौशल्य चाचणी अंतर्गत निवासी व अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भरती प्रक्रीया सुरू करणार आहे. यासाठी दिनांक २७ ते ३० एप्रिल, २०२६ या कालावधीत विभागस्तरावर चाचण्यांचे आयोजन करुन खेळाडूंची निवड राज्यस्तर चाचणी करीता केली जाणार आहे. हँडबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नास्टिक ,बॅडमिंटन खेळामखेळा मधे सरळ प्रवेश व्दारे व हँडबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नास्टिक खेळामखेळा मधे कौशल्य चाचणी व्दारे प्रवेश देण्यात येणार आहे.हॉकी व मैदानी या खेळामघील खेळांडुना सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी व्दारे प्रवेश देण्यात येणार आहे.  ०७/०७/२००7 नंतर जन्मलेले व ज्या खेळाडू...

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड सन २०२६-२७ या वर्षाकरिता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेशाबाबत सूचना

गडचिरोली, (जिमाका) दि.२०: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली या प्रकल्प कार्यालयांतर्गत सन २०२६-२७ या वर्षाकरिता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली करिता अनुसुचित जमातीचे नविन प्रवेशित करण्याच्या अनुषंगाने योजनेतील मान्यताप्राप्त शाळामध्ये इतर कोणत्याही विभागांच्या योजनामधून प्रवेशित झालेले विद्यार्थी वगळून सदर शाळेत निवासी असलेल्या उर्वरीत विद्यार्थी संख्येच्या २५ टक्के मर्यादेत अनुसुचित जमातीचे विद्यार्थी प्रवेशित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे अर्जासोबत विद्यार्थ्यांचे नजीकच्या काळातील दोन पासफोर्ट साईज फोटो,पालकाचे उत्पनाचे प्रमाणपत्र १ लक्षापेक्षा जास्त नसावे(तहसिलदार), पालकाचे/विद्यार्थ्यांचे रहिवासी प्रमाणपत्र, पालकाचे/विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, (तहसिलदार/उपविभागीय अधिकारी), जन्म प्रमाणपत्र (अंगणवाडी/ ग्रामसेवक), दारिद्रय रेषेखाली असल्यास ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, महिला पालक विधवा/घटस्फोटित/निराधार/परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे आधार कार्ड झेर...

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड येथीलशासकीय आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रकीया सुरु

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२०: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड जि.गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, निवास आणि सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या शाळांमध्ये नवीन प्रवेश देण्यात येत आहेत. प्रवेशासाठी उपलब्ध शाळा: खालील शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे: १. जारावंडी (इंग्रजी माध्यम) २. ताडगाव (इंग्रजी माध्यम) ३. तोडसा (मुलींसाठी) ४. कसनसूर ५. हालेवारा, ६. जांबिया, ७. लाहेरी, ८. कोठी शाळेतील उपलब्ध प्रमुख सोयी-सुविधा: शासकीय आश्रमशाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनामार्फत खालील सुविधा पूर्णतः मोफत दिल्या जातात.  दर्जेदार शिक्षण:- मराठी, सेमी-इंग्रजी व इंग्रजी माध्यमाची सोय आणि अनुभवी शिक्षक.  मोफत निवास व भोजन:  सुसज्ज वसतिगृह आणि सकस आहार (नाश्ता, दोन वेळचे जेवण).  शैक्षणिक साहित्य:  गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या, दप्तर व इतर स्टेशनरी.  वैद्य...

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता इयत्ता १ ली मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.२०: “अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे” या योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र २०२६-२७ करीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली मध्ये प्रवेश देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय, गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इयत्ता १ ली मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जमातीचा असावा व दिनांक ०१ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत जन्मलेला असावा. विद्यार्थ्याचा पालक शासकीय/निमशासकीय नोकर नसावा व त्यांचे वार्षिक उत्पन्न रूपये दोन लक्ष पेक्षा कमी असावे. या योजनेअंतर्गत आदीम जमाती/ दारीद्रय रेषेखालील / विधवा / घटस्फोटित व निराधार यादीतील पाल्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. इयत्ता १ ली प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.  इयत्ता १ ली प्रवेशासाठीचे अर्ज प्रकल्प कार्यालय, गडचिरोली तसेच प्रकल्पांतर्गत नजीकच्या शासकीय/ अनुदानित आश्रमशाळेत उपलब्ध होतील अथवा स्विकारले जातील. प्रवेशासाठीचे आवेदन पत्र आवश्यक कागदपत्रांसह दि....

मधुमित्र मधुसखी पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

गडचिरोली, (जिमाका) दि.२०: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने २०२६ साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. मंडळाच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून ही पुरस्कार योजना सुरु झाली आहे. मधमाशीपालन व्यवसायास गती मिळावी व मधपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने हा उपक्रम सुरु केला आहे. मधमाशीपालनात अनेक वर्ष काम करणाऱ्या यशस्वी मधपाळांना प्रथम, द्वितीय, व तृतीय पुरस्काराने या पुरस्कार योजनेत सन्मानित करण्यात येते. यातील एका पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव आहे. पुरस्काराची रक्कम प्रथम (रु. ११,०००/-), द्वितीय (रु.७,०००/-), तृतीय (रु.५,०००/-), अशी आहे. २० मे २०२६ रोजी जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून पुणे येथे जाहीर समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. या पुरस्काराची लिंक मंडळाच्या www.mskvib.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात खादी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात नामांकन अर्ज मिळू शकतील. इच्छुकांनी आपले नामांकन दि.०४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात पाठवावे. असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे. अधिक मा...

एलएलबीच्या परीक्षा पुढे ढकलली

इमेज
आमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणीनंतर गोंडवाना विद्यापीठाने जारी करणार नवीन वेळापत्रक गडचिरोली : एलएलबी तिसऱ्या वर्षाच्या चौथ्या सेमिस्टरच्या परीक्षा तिसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षेनंतर अत्यंत कमी कालावधीत घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी होती. अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार सुधाकर अडबाले यांनी कुलगुरू यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर एलएलबीच्या तिसऱ्या व पाचव्या वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत एलएलबी तिसऱ्या वर्षाच्या तिसऱ्या सेमिस्टरची परीक्षा जानेवारी २०२६ मध्ये पार पडली. त्यानंतर २ फेब्रुवारी पासून कॉलेज सुरू झाले. कॉलेज सुरू होताच मूट कोड प्रॅक्टिकल दोन महिने चालले. इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली. सोबतच मार्च पासून इंटरशिप सुरू झाली. वार्षिक संमेलन, घटक चाचणी, असायमेंट हे सर्व लागोपाठ सुरू असतानाच २२ एप्रिल २०२६ पासून चौथ्या सेमिस्टरच्या परीक्षा वेळापत्रक आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळच मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर आमद...

जिल्ह्यात कलम ३७ (१)(३) अन्वये मनाई आदेश जारी

इमेज
गडचिरोली, (जिमाका) दि.१७: जिल्ह्यात दिनांक ०१ मे २०२६ रोजी सर्वत्र बौध्द पोर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. तसेच सी.पी.आर. (माओवादी) या नक्षल संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा माओवाद्यांतर्फे माहे फेब्रुवारी ते जुन, २०२६ या कालावधी दरम्यान टि.सी.ओ.सी. राबविण्यात येणार आहे. या टि.सी.ओ.सी. दरम्यानच्या कालावधीत माओवाद्यांव्दारे हिंसक घटना शासकीय कार्यालय बांबू/बिट डेपो, दुरध्वनी टॉवर्स इत्यादीची जाळपोळ, आयइडी- क्लेमोर माईन्स प्लँट करणे, भूसुरंग स्फोट घडवून आणने, सुरक्षा दले, पोलीस पथक तसेच पोलीस स्टेशनवर हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न करणे, रसत्यांवर अडथळे निर्माण करुन रहदारी बंद करणे त्याचप्रमाणे ॲक्शन टिम व्दारे महत्वाचे राजकिय व्यक्ती, पोलीस अधिकारी/अंमलदार व इतर शासकिय अधिकारी तसेच पोलीसांना मदत देणारे बातमीदार यांना लक्ष करणे इत्यादी हिंसक कारवाया करण्याच्या प्रयत्न करु शकतात. त्याचप्रमाणे रेल्वे संपतीस सुद्धा धोका पोहोचविण्याची तसेच विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक, सार्वजनिक कार्यक्रम आयो...