पंडित दिनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली, (जिमाका) दि.१६: नोकरी शोधणारे व नोकरी देणारे यांना एकाच व्यासपीठावर आणून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व नियोक्ता / उद्योजकांना कुशल मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली,महिला महाविद्यालय, गडचिरोली व फुले , आंबेडकर महाविद्यालय , गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ मार्च २०२६ रोजी वेळ स.१०.०० वा पासून महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे पंडित दिनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी नामांकित कंपनी / आस्थापनांमध्ये विविध रोजगार व नोकरीच्या संधीसाठी उद्योजक विविध पदांसोबत सहभाग होणार असून बेरोजगार युवक - युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी उद्योजकामार्फत विविध पदांकरीता उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करण्यांत येणार आहे. तरी, गडचिरोली जिल्हयातील जास्तीत-जास्त बेरोजगार युवक - युवतींनी या रोजगार मेळाव्यास दिनांक १८ मार्च २०२६ रोजी वेळ स.१०.वा पासून महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे उपस्थिती राहून या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्रमांक-२ युनिट क्रं-२, कॉम्प्लेक्स, गडचिरोली-४४२६०५ तसेच ई-मेल gadchirolirojgar@gmail.com, व संपर्क क्र. श्रीमती.सक्रापूरे – ८७८८२५७०१७ इथे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.