सांगोला मध्ये दहावीच्या प्रश्नपत्रिका चोरीचा पर्दाफाश; अल्पवयीन आरोपी ताब्यात

सोलापूर: जिल्ह्यातील सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेत दहावी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १७ मार्च २०२६ रोजी शाळेच्या कस्टडी रूममध्ये सुरक्षित ठेवलेले पेपर अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना समोर आल्यानंतर सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान या प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी आरोपीचा शोध लावला असून हा गुन्हा एका अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकाने केल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित बालकाने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या कारवाईत गुन्हा करताना वापरलेले इलेक्ट्रिक कटर, इलेक्ट्रिक मोटार सायकल तसेच चोरीस गेलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि तीन कोऱ्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत.

या संपूर्ण घटनेची माहिती शालेय शिक्षण विभाग मार्फत देण्यात आली असून, या प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधितांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोलीस–नक्षल चकमकीत तीन महिलांसह चार नक्षलवादी ठार – कोपर्शी जंगलातील मोठी कारवाई.

गडचिरोलीत हेलिकॉप्टर ‘देवदूत’चा गौरव, पण लोह खनिज वाहतुकीमुळे बळी गेलेले नागरिक, रस्ते व दुर्घटनांचे काय?

एटापल्ली ते वांगेतूरी बस फेरी मेढरी गावापर्यंत सोडण्यात यावे.भारतीय कम्युनिष्ट पक्ष (CPI) यांची मागणी.