डिजिटल शेतीशाळा : हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT)शेतीशाळेतील तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

गडचिरोली, (जिमाका) दि.२५: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० प्रकल्प अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याची निवड झाली असून या प्रकल्पाचा प्रमुख उद्‌देश बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना तसेच भूमिहीन कुटुंबाना सक्षम करणे व कृषी आधारित उपजीविकेचे साधने उपलब्ध करून शेती किफायतशीर करणे हा आहे. बदलत्या हवमानाचा शेतीला कमीत कमी फटका बसेल यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात येत असून प्रकल्पाअंतर्गत डिजिटल शेतीशाळा अभियान स्वरूपात राबविण्यात येत असून हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT) विषयक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पानी फाउंडेशनद्वारे संचलित "डिजिटल शेतीशाळा हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे, जिथे तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीकनिहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम (Zoom) आणि यूट्यूब (YouTube) च्या माध्यमातून दिले जाणार आहे.

सदर शेती शाळा चार भागात घेतली जाणार असून त्याबद्दलचा तपशील नियोजित दिनांकासहित पुढील प्रमाणे आहे.

भाग -१ पेरणीपूर्व तंत्रज्ञानः बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, आंतरपीक पद्धत, बीज उगवण क्षमता चाचणी आणि बीजप्रक्रिया, नियोजित दिनांक: १ एप्रिल, २०२६

भाग-२ जैविक/नैसर्गिक निविष्ठा उत्पादनः बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क उत्पादन. नियोजित दिनांक : ८ एप्रिल, २०२६

भाग -३ एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र कीटक, लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर. नियोजित दिनांक १५ एप्रिल, २०२६

भाग -४ भात शेतीचे लागवड तंत्रः भाताची थेट पेरणी (DSR), श्री पद्धत आणि भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धत. नियोजित दिनांक : २२ एप्रिल, २०२६

उपरोक्त शेतीशाळा नियोजित दिनांक दिवशी सायंकाळी. ७.३० वाजता सुरू करण्यात येणार आहे. तरीही या डिजिटल शेतीशाळा आपल्या गावात कृषी विभागातील अधिकाऱ्या मार्फत राबविल्या जात आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी कुटुंब यांनी उपस्थित राहून शेतीशाळेतील तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.