दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ
गडचिरोली, (जिमाका) दि.18: दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात १०००/- रु. ची वाढ करून २५००/- इतके अनुदान D.B.T. प्रणाली व्दारे देण्यात येत आहे. करीता लाभार्थ्यांचे ऑनलाईन UDID कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र) पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या सामाजिक सुरक्षा योजनेतील दिव्यांग लाभाच्यांचे UDID आधार संलग्नीकरण करणबाबत ५ मार्च, २०२६ रोजी आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांना UDID व आधार संलग्न नसल्याबाबतची माहीती सभेमध्ये सादर केली असुन सदर लाभार्थ्यांची माहीती DBT प्रणालीवरील माहीती अपडेट करण्याचे निर्देश दिलेले आहे.
दिव्यांग लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये म्हणून लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड आधार क्रमांक व बँकेचे पासबुक झेरॉक्स गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किंवा तहसिल कार्यालय संजय गांधी योजना येथे दि. २०.०३.२०२६ पुर्वी जमा करावे तसेच दिव्यांग UDID Portal वरुन e-KYC करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहे.
योजनांच्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना दि. २०.०३.२०२६ पूर्वी UDID कार्डची झेरॉक्स प्रत ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) किंवा तहसिल कार्यालय संजय गांधी योजना येथे सादर करण्याबाबत UIDID Portal वरुन e-KYC करण्याबाबतचे आवाहन नायब तहसिलदार, (संगायो), मुलचेरा यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा