महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे टूर गाईड प्रशिक्षणाचे आयोजन

गडचिरोली, (जिमाका) दि.२५: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाअंतर्गत पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पर्यटकांसाठी दूर गाईडची व्यवस्था करणे व स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या हेतूने पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल्स गाईड) प्रशिक्षण (Soft Skill Training Programme) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

यामध्ये Basic Training. Advance Training आणि Soft Skill Training या प्रकारच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. Basic Training करीता २०० टूर गाईड्स, Advance Training करीता १०० टूर गाईड्स आणि Soft Skill Training करीता पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योगांमधील सहभागधारक टूर ऑपरेटर, हाऊसकिपीग अटेंडेंट, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस असिस्टंट, इ. संबंधित १५० व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट (Indian Institute of Tourism and Travel Management), ग्वालियर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ञ प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करतील. सात दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे (DoT) प्रमाणपत्र व टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल.

पात्रता निकष :

वय मर्यादा: किमान १८ वर्षे व कमाल ४५ वर्षे
त्यानुषंगाने नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी संबंधित पर्यटन व्यवसायिकांना सदर प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशांत सवाई, उपसंचालक, पर्यटन संचालनालय (DoT), नागपूर यांनी केले आहे.

इच्छूकांनी खालील गुगल लिंग वर ३१ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
https://docs.google.com/forms/d/e/RFAIpQLSf७D६३MQPFJRZROp८nGRfKFP५९-
ZcdUtdl3Xg3FJygnTXxQhQ/viewform?usp=dialog

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.