संचमान्‍यता व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजनाचा प्रश्‍न सोडवा

आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतली शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची भेट

गडचिरोली : अर्थसंकल्‍पीय अधिवेशनादरम्‍यान आमदार सुधाकर अडबाले यांनी विधान भवन येथे राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन शिक्षण विभागातील विविध मागण्यांबाबत चर्चा करून निवेदन दिले.

यावेळी संचमान्यता दुरुस्ती, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन स्थगित करण्यात यावे व बीएलओची कामे न स्वीकारणाऱ्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट २०२४ नुसार शिक्षकांना अक्षैक्षणिक कामे देऊ नये, चंद्रपूर येथे बीएलओ म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकाला मारहाण प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात यावी, याबाबत चर्चा करून निवेदन दिले.

तसेच दिनांक १८ मार्च २०२६ च्या इतिवृत्तानुसार पत्र निर्गमित करण्यात यावे व तोपर्यंत समायोजन प्रक्रिया स्थगित ठेवण्यात यावी, याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी मागणी केली. यावर मंत्री महोदयांनी सचिव साहेबांशी संपर्क साधून पत्र काढण्याबाबत सूचना केल्या.

यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू, राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल भारसाकळे यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोलीस–नक्षल चकमकीत तीन महिलांसह चार नक्षलवादी ठार – कोपर्शी जंगलातील मोठी कारवाई.

गडचिरोलीत हेलिकॉप्टर ‘देवदूत’चा गौरव, पण लोह खनिज वाहतुकीमुळे बळी गेलेले नागरिक, रस्ते व दुर्घटनांचे काय?

एटापल्ली ते वांगेतूरी बस फेरी मेढरी गावापर्यंत सोडण्यात यावे.भारतीय कम्युनिष्ट पक्ष (CPI) यांची मागणी.