पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार / उद्योजक मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली, (जिमाका) दि.२३:गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली, दे-आसरा फाऊंडेशन, आणि इनक्यूबेशन कम बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठ, कोटगल रोड गडचिरोली येथे दिनांक २५ मार्च २०२६ रोजी ११.०० वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार / उद्योजक मेळावा, आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर रोजगार/उद्योजक मेळाव्यामध्ये डॉ. रविंद्र अहेर (बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटजिस्ट), अमर नायसे (ब्रेन ऑप्टीमायझेसन कोच) व अनिरूदध आठवले (मेंटर इनफेड-IIM नागपूर) उपस्थित राहणार असून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन करणार असून विविध नामांकित कंपन्या सुध्दा सहभागी होणार आहेत.

सदर रोजगार / उद्योजक मेळाव्याकरिता ईच्छूक असलेले उमेदवारांनी /उद्योजकांनी २५ मार्च २०२६ रोजी गोंडवाना विद्यापीठ, कोटगल रोड गडचिरोली येथे सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहून रोजगार/उद्योजक मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोलीस–नक्षल चकमकीत तीन महिलांसह चार नक्षलवादी ठार – कोपर्शी जंगलातील मोठी कारवाई.

गडचिरोलीत हेलिकॉप्टर ‘देवदूत’चा गौरव, पण लोह खनिज वाहतुकीमुळे बळी गेलेले नागरिक, रस्ते व दुर्घटनांचे काय?

एटापल्ली ते वांगेतूरी बस फेरी मेढरी गावापर्यंत सोडण्यात यावे.भारतीय कम्युनिष्ट पक्ष (CPI) यांची मागणी.