कर्तव्यपथावरील संचलनात अव्वल ठरलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचे गिरगावात प्रदर्शन

नवी दिल्लीतील कर्तव्यपथ येथे प्रजासत्ताक दिन निमित्त पार पडलेल्या भव्य संचलनात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे गिरगाव येथे नागरिकांसाठी विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरा, कला आणि सांस्कृतिक वैभवाचे आकर्षक दर्शन घडत असून, प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी, सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक तसेच पर्यटकांसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरत आहे.

या प्रदर्शनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृतीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

मुख्य अभियंता व कंत्राटदारावर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करा – सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची मागणी.