पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार आणि उद्योजक मेळावा यशस्वीरित्या संपन्न

गडचिरोली, (जिमाका) दि.२७: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली, दे-आसरा फाऊंडेशन, पुणे आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने STEP प्रशिक्षणार्थी, माझी सैनिक, एकल महिला व बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय ‍ रोजगार मेळावा, उद्योजक मेळावा ‍ आणि समुपदेशन मेळावा दिनांक 25 मार्च 2026 रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला.

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार आणि उद्योजक मेळाव्याचे सूत्रसंचालन भाग्यश्री वाघमारे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, अधिकारी यांनी केले. तसेच कार्यक्रमाची सूरूवात महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सर्व मान्यवरांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यांत आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेंद्र शेंडे, सहाय्यक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले.

तसेच उद्योजक मेळाव्याकरीता प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले योगेंद्र शेंडे, सहाय्यक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली , अनिरूध्द आठवले, ( मेंटर इनफेड) फाऊंडेशन फॉर एंटरप्रिनरशिप डेव्हलोपमेंट, IIM, नागपूर ,अमोघ ‍तिजारे, इनफेड, IIM, नागपूर Lead MSME., डॉ.रविंद्र अहेर, बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटरजिस्ट, दे-आसरा फाऊंडेशन, पुणे, अमर नायसे ,ब्रेन ऑप्टिमायझेन कोच ( लीडरशिप ॲण्ड स्ट्रॅटरजिस्ट ), दे-आसरा फाऊंडेशन, पुणे, योगिता कस्तुरे, बिझनेस कन्स्लटन्ट, (व्यवसाय सल्लागार ), दे-आसरा फाऊंडेशन, पुणे, श्रेयश तांबोळी, लॉयझनिंग ऑफिसर, नॅशनल अप्रेंटिशिप ट्रेनिंग स्किम, नागपूर. यांनी दे-आसरा फाऊंडेशन यांच्या वतीने घेण्यांत आलेल्या या मेळाव्याचे मुख्य उददेश नविन व्यवसाय सूरू करतांना येणा-या अडचणी यांचे निराकरण कसे करावे तसेच व्यवसायामध्ये वृध्दी आणि वेग कशा प्रकारे वाढ करून उत्तम उद्योजक कसे तयार होतील याबाबत नविन व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.

तसेच पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास एकुण 150 पेक्षा अधिक उमेदवारांनी आणि एकुण 4 उद्योजकांनी प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग नोंदविला. उद्योजकांनी त्यांच्याकडील विविध रिक्त पदांबददल उमेदवारांना माहिती दिली. त्यामध्ये सोलार इंडस्ट्रियल इंडिया लिमीटेड, नागपूर, SBI LIC, गडचिरोली, फ्यूजन फायनान्स, नागपूर आणि माप्रल ग्लोबल वर्कफोर्स एल एल पी,मुंबई या नामांकित उद्योजकांनी रोजगार मेळाकरीता सहभाग घेतलेला असून त्यांनी अनेक विविध क्षेत्रातील रिक्त पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी उद्योजकामार्फत उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यांत आल्या. त्यामध्ये एकुण 40 पेक्षा अधिक उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यांत आलेली आहे. व उर्वरित उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करत रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नंदकिशोर मेश्राम, प्राध्यापक , गोंडवाना विद्यापीठ , गडचिरोली यांनी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे, उद्योजकांचे, उपस्थित जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्रातील सर्व अधिकारी / कर्मचारी, दे-आसरा फाऊंडेशन, पुणेचे सर्व उद्योजक व उपस्थित सर्व नव व्यावसायिक व उमेदवारांचे आभार व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोलीस–नक्षल चकमकीत तीन महिलांसह चार नक्षलवादी ठार – कोपर्शी जंगलातील मोठी कारवाई.

गडचिरोलीत हेलिकॉप्टर ‘देवदूत’चा गौरव, पण लोह खनिज वाहतुकीमुळे बळी गेलेले नागरिक, रस्ते व दुर्घटनांचे काय?

एटापल्ली ते वांगेतूरी बस फेरी मेढरी गावापर्यंत सोडण्यात यावे.भारतीय कम्युनिष्ट पक्ष (CPI) यांची मागणी.