पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुणे विद्यापीठात एम.एससी. प्रवेशासाठी एसबीसी आरक्षण मिळणेबाबत नाम.वडेट्टीवार यांना निवेदन सादर

इमेज
एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र गडचिरोली  : - दि.२९- पुणे विद्यापीठात एम.एससी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी *एसबीसी* ला २% स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी एसबीसी अन्याय निवारण कृती समितीतर्फे   राज्याचे बहुजन कल्याण मंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली.                                गडचिरोली येथिल अंकुश किशोर लिंगलवार या एसबीसी (पद्मशाली ) विद्यार्थ्यांने मागील वर्षी बी.एससी.पदवी घेतली असून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता पुणे विद्यापीठात एम.एससी. भौतिकशास्त्र या विषयात प्रवेश घेण्यासाठी आॕनलाईन अर्ज सादर केला होता. आॕनलाईन अर्जामध्ये एसबीसी चे कॉलम होते परंतु निवड यादीत एसबीसी प्रवर्गातील  विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नाही.                                              याबाबत नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांचेसोबत चर्चा क...

महाडीबीटी पोर्टल योजना- अर्ज एक योजना अनेक.

इमेज
गडचिरोली : - दि.28:कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना”या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोईकरीता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र देण्यात आले असुन शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबी करीता अर्ज करावयाचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधारकार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टलचे http:/mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरीला “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल संगणक/ लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र(CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातुन उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. “वैयक्तीक लाभार्थी” म्हणुन नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणीत करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्ताकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नो...

पंचायत समिती गडचिरोली यांचे जनतेला सूचना.

इमेज
गडचिरोली : - दि.28: गडचिरोली जिल्हयातील सर्व जनतेला याद्वारे सुचित करण्यात येते की, पंचायत समिती, गडचिरोली अंतर्गत एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प गडचिरोली, जिल्हा परिषद (बांधकाम/सिंचाई/ग्रामिण पाणी पुरवठा) उपविभाग गडचिरोली, तालुका आरोग्य अधिकारी गडचिरोली, प्राथमिक आरोग्य केंद्र/पथक/उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने व 51 ग्रामपंचायत कार्यालयांचा समावेश आहे. शासन निर्देशानुसार सोमवार ते शुक्रवारपर्यंत वर्ग-3 चे कर्मचाऱ्यांकरीता कार्यालयीन वेळ सकाळी 09.45 ते 06.15 आणि वर्ग-4 चे कर्मचाऱ्यांकरीता सकाळी 9.30 ते सांयकाळी 6.30 पर्यंत निश्चित केली आहे. या संदर्भात सर्व कार्यालयांना सूचना देण्यात आलेली आहे.  तरी वरील कार्यालयीन वेळेमध्ये कोणतेही कार्यालय बंद असल्याचे नागरीकांचे निदर्शनास आल्यास त्यांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती, गडचिरोली यांचे कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 07132-295933 वर संपर्क साधावा. तसेच पंचायत समिती, गडचिरोली कार्यालयातील तक्रार नोंदवहीमध्ये तशी नोंद करावी, असे गट विकास अधिकारी पं.स. गडचिरोली  मुकेश एस. माहोर यांनी कळविलेले आहे.

रस्ता सुरक्षा जागरूकता आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर, तीन दिवसीय कार्यक्रम पूर्ण केला.

इमेज
गडचिरोली : -  दि.28. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, मानव विकास सामाजिक शैक्षणिक क्रीडा बहुउदेशीय संस्था गडचिरोली अंतर्गत गडचिरोली येथे 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2020 या कालावधीत रोजी आरटीओ कार्यालयाजवळील गोंडवाना विद्यापीठासमोर तीन दिवसाची रस्ता सुरक्षा जागरूकता शिबीर मोफत नेत्र तपासणी चा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात नेत्र रोगाचे प्रमुख पाहुणे डॉ किरण मडावी उपस्थित होते आणि मानव विकास सामाजिक शैक्षणिक क्रीडा बहुउद्देशीय सोसायटी गडचिरोलीचे सर्व सदस्य व कामगार उपस्थित होते.कार्यक्रमात देशात रस्ते सुरक्षा आणि अपघात होतात आणि डोळ्यांच्या अभावामुळे अपघात वाढतात. रस्त्यावर चालत असताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे ही माहिती उपस्थितांना सांगण्यात आली, कोविड 19 च्या पार्श्वीभूमीवर सर्व नियमाचे पालन करण्याचे काम यावेळी करण्यात आले. हा कार्यक्रम सर्व सामान्य लोकांद्वारे पूर्ण झाला आणि रुग्णालयाच्या  वाहन चालक, ट्रक चालक, बस चालक, ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटरकडून  पाठविलेल्या प्रशिक्षणार्थींना डोळे तपासून औषधे व चष्मा देऊन उपचार केले गेले.

बच्चे कंपनीपुढे झाले मोकळे आकाश, प्रा. सुरेश चोपणे यांनी उलगडली अंतरीक्षांची रहस्ये.

इमेज
गडचिरोली : - ता. २८ : मोबाईलच्या दोन बाय दोनच्या स्क्रीनवर जखडलेली बच्चे कंपनीची नजर निसर्गाने दिलेल्या आकाशाच्या अनंत व विस्मयकारी स्क्रिनवर नेण्याचा यशस्वी प्रयत्न क्रेन्स  संस्थेच्या किलबिल नेचर क्लबने केला असून या क्लबद्वारे रविवारी (ता. २७) आयोजित कार्यक्रमात आपली अगणित गुपिते सांगत जणू आकाशच मोकळे झाले होते. क्रेन्स संस्थेच्या किलबिल नेचर क्लबच्या वतीने स्थानिक पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेत आयोजित आकाश दर्शन या अनोख्या कार्यक्रमाचे उद्घाटन दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून खगोल, जीवाश्म आणि निसर्ग अभ्यासक तथा ग्रीन प्लॅनेट संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे उपस्थित होते. तसेच गडचिरोली वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे , क्रेन्स संस्थेच्या सचिव तथा योगशिक्षिका अंजली कुळमेथे, वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक शेमदेव चाफले, पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे, मानसशास्त्रज्ञ शशिकांत शंकरपुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलुके, प्राचार्य डॉ. संज...

मुलचेरा तालुक्यातील येल्ला गावातील भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आविस मध्ये जाहीर प्रवेश.

इमेज
माजी आमदार दीपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष  श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व  श्रीफळ देवून केली सत्कार. मुलचेरा : -  तालुक्यातील ग्राम पंचायत, येल्ला अंतर्गत असलेल्या गावातील भाजप व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी माजी आमदार व आविसचे नेते दीपक दादा आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्यावर विश्वास ठेवून सामूहिक रितीने भाजप व राष्ट्रवादी पक्षाला रामराम करून आदिवासी विध्यार्थी संघामध्ये जाहीर प्रवेश केले. ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात व क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे गाठी भेटीसाठी येल्ला क्षेत्रात माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दौरा केले.   या दौऱ्यात भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी पक्षावर नाराज असलेल्या श्री.लिंगा टेकुलवार, सौ.आशा गुलाब उराडे, रत्नमाला दशरथ सातपुते, गणपत टेकुलवार, सुखदेव अलोने, सागर पनेमवार, मधुकर पनेमवार, बंडू पनेमवार, सत्यवान टेकुलवार, संजय पनेमवार, भीमराव टेकुलवार, भीमा टेकुलवार, सोमा टेकुलवार, निरंजय टेकुलवार आदी कार्यकर्त्यांनी आदिवासी विध्यार...

आज जिल्ह्यात एका मृत्यूसह 6 नवीन कोरोना बाधित तर 54 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : - दि.26: आज जिल्हयात 6 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8913 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8605 वर पोहचली. तसेच सद्या 207 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 101 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नविन एका मृत्यूमध्ये आज रा.गडचिरोली येथील 54 वर्षीय पुरुष एचटीएच आणि पॅरालिसिसने ग्रस्त होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.54 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.32 टक्के तर मृत्यू दर 1.13 टक्के झाला. नवीन 6 बाधितांमध्ये गडचिरोली 5, अहेरी 0, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 1, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0  व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे.  आज कोरोनामुक्त झालेल्या 54 रूग्णांमध्ये गडचिरोली 15, अहेरी 8, आरमोरी 7, भामरागड 0, चामोर्शी 4, धानोरा 6, एटापल्ली 1, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0,  कुरखेडा 3 व वडसा मधील 10 जणाचा समावेश आहे. नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील व...

परराज्यातील धान आढळून आल्यास कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे व्हीसीद्वारे निर्देश

इमेज
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीत दिल्या सूचना. गडचिरोली : - दि.23: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परराज्यातील धान गैरमार्गाने जिल्ह्यात आणून शासकीय धान खरेदी केंद्रावर विकल्याचे आढळल्यास गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ते आज व्हीसी द्वारे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक व विभागीय आयुक्तांच्या आढावा घेत होते. राज्य शासनाने जाहीर केलेला बोनस तसेच दर मिळविण्यासाठी इतर राज्यातून गैर मार्गाने धान मोठया प्रमाणात खरेदी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. आपल्या राज्यातील वाढीव दर व बोनसचा फायदा हा स्थानिक शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे. गैरमार्गाने येणाऱ्या धानावर तातडीने निर्बंध घालण्यासाठी प्रक्रिया राबवा अशा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यात याबाबत दक्षता घेणेत येत असल्याचे सांगून यापुढे अशा गैरप्रकार करणाऱ्या व्यक्ती व वाहनांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच आंतरराज्य सीमांवर चेक पोस्ट लावणे, वाहनांची तपासणी करणे याकरीता लेखी आदेशही देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सा...

आज जिल्ह्यात 42 नवीन कोरोना बाधित तर 50 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : - दि.20: आज जिल्हयात 42 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 50 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8804 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8375 वर पोहचली. तसेच सद्या 333 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 96 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.13 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.78 टक्के तर मृत्यू दर 1.09 टक्के झाला. नवीन 42 बाधितांमध्ये गडचिरोली 28, अहेरी 8, आरमोरी 0, भामरागड 1, चामोर्शी 2, धानोरा 0, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 1, सिरोंचा 0  व वडसा येथील 1 जणांचा समावेश आहे.  आज कोरोनामुक्त झालेल्या 50 रूग्णांमध्ये गडचिरोली 21, अहेरी 8, आरमोरी 4, भामरागड 0, चामोर्शी 6, धानोरा 5, एटापल्ली 4, मुलचेरा 1, सिरोंचा 0, कोरची 0,  कुरखेडा 1 व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे. नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील गोकुलनगर 4, साईकृपा अपार्टमेंट 1, गोंडवाना युनिर्व्हसिटीजवळ 1, नवेगाव 3, मेडीकल कॉलनी 1, गॅस ग...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त एटापल्ली येथे रक्तदान शिबीर.

इमेज
दिक्षा झाडे - तालुका प्रतिनिधी, एटापल्ली एटापल्ली : - दिनांक 19/12/2020 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्ली तर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले, ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथील या शिबिरास रक्त दात्यानी उस्फूर्त प्रतिसाद दिले.  तब्बल 46 इच्छुकापैकी ईशांक दहागावकर, मनिष दुर्गे, शिवाजी मडावी, संदेश गुरनुले, सलीम शेख, रोशनी वैद्य, मनिषा, राजु नरोटे, लक्ष्मण नरोटे, देवाजी हिचामी, नागेश हिचामी, अंकित नरोटे, रामदास कुमोटी, ज्ञानेश्वर कुमोटी, दिलीप गावडे, सचिन गड्डमवार, अमित वासनिक, प्रशांत कोकुलवार, संदिप जंबोजवार, प्रथमेश ऊपगन्लावार, वीस रक्तदात्यानी रक्तदान केले. इतरांची तांत्रिक कारणामुळे निराशा झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्लीचे तालुकाध्यक्ष दौलतराव दहागावकर यांनी रक्तदान शिबीराकरिता आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्लीचे शहर अध्यक्ष विजय अतकमवार, तालुका संघटनसचिव विनोद पत्तीवार, तालुका सचिव लक्ष...

आज जिल्ह्यात 26 नवीन कोरोना बाधित तर 48 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : - दि.19: आज जिल्हयात 26 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 48 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8762 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8325 वर पोहचली. तसेच सद्या 341 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 96 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.01 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.89 टक्के तर मृत्यू दर 1.10 टक्के झाला. नवीन 26 बाधितांमध्ये गडचिरोली 11, अहेरी 2, आरमोरी 3, भामरागड 1, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 3, मुलचेरा 1, सिरोंचा 0  व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे.  आज कोरोनामुक्त झालेल्या 48 रूग्णांमध्ये गडचिरोली 15, अहेरी 4, आरमोरी 3, भामरागड 3, चामोर्शी 4, धानोरा 6, एटापल्ली 2, मुलचेरा 1, सिरोंचा 0, कोरची 1,  कुरखेडा 4 व वडसा मधील 5 जणाचा समावेश आहे. नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील फुले वार्ड 1, विवेकनंदनगर 1, पोलीस मदत केंद्र पोटेगाव 1, पीएसएसी पोर्ला जवळ 1, साईनगर 1, गोकुल...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन.

इमेज
गडचिरोली : - दि.19: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली तथा जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोलीच्या वतीने जिल्हास्तरिय युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक 25 ते 26 डिसेंबर 2020 या कालावधीत ऑनलाइन/virtual पद्धतीने करण्यात येणार आहे.  युवा महोत्सवातील वैयक्तिक स्पर्धा बाबी पुढील प्रमाणे आहे. 1.ऐकांकिका- हिंदी/इंग्रजी,  2.शास्त्रीय वाद्य- बासरी, तबला, मृदंग, विणा, हार्मोनियम - लाईट, सितार, गिटार 3.शास्त्रीय नृत्य- भरत नाट्यम, मनिपुरी, ओडिसी, कथक, कुचिपुडी 4. शास्त्रीय गायन - हिंदुस्थानी, इत्यादी   सांघिक स्पर्धा बाबी पुढील प्रमाणे    1.लोकनृत्य  2.लोकगीत तरी गडचिरोली जिल्यातील 15 ते 29 वर्ष वयोगटतील कलावंतांनी आपले अर्ज दिनांक 23 डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सहभागी स्पर्धकांचे नाव, जन्म तारीख व जन्म तारखेच्या पुराव्यानिशी सादर करावे.  स्पर्धेच्या अधिक माहिती करिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासी संपर्क साधावे असे घनश्याम राठोड जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोल...

ऊर्जा विभागाच्या वीज कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना त्वरीत सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी- ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत.

इमेज
मुंबई : - दि. 17 : राज्यातील औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत सामावुन घेण्यासंदर्भात महापारेषण, महावितरण आणि महाजनकोच्या संपूर्ण रिक्त जागांसाठी विशेष जाहिरात देण्यात यावी व नियमाप्रमाणे त्यांना सेवेत सामावुन घेण्यात यावे, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी दिले.              महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या फोर्ट येथील कार्यालयात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस आमदार प्रतिभा धानोरकर, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ‘महाजेनको’चे मुख्य व्यवस्थापकिय संचालक संजय खंदारे, महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती प्रगतकुशल कृती समितीचे सभासद उपस्थित होते.              ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्तांपैकी जे कुशल प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांना करार पद्धतीने प्राधान्याने सेवेत घेण्यात यावे व करार पद्धतीच्या अंतर्गत मिळत असलेले मानधन देण्यात...

उच्च शिक्षणासाठी व व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना जाहीर आवाहन.

गडचिरोली : - दि.18: उच्च शिक्षणासाठी व व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्राची पडताळणीकरीता ज्या विद्यार्थ्यांनी समितीकडे यापूर्वीच ऑनलाईन भरलेले अर्जाच्या स्थळप्रत सादर केलेली आहे व असे ऑनलाईन अर्जात ऑनलाईन तसेच ऑफलाईन त्रृटीची पुर्तता करण्यास कळविण्यात आलेले आहे. अशा विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जातील त्रृटींची पुर्तता ऑनलाईन तसेच ऑफलाईन करून शनिवार दिनांक 19.12.2020 रोजी दुपारी 12.15 वाजेपर्यंत समितीकडे संपर्क साधावा. जे अर्जदार विद्यार्थी त्रृटींची पुर्तता करणार नाहीत त्यांचे अर्ज हे नस्तीबध्द करण्यात येतील व यामुळे होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारीही विद्यार्थ्यांची स्वत:ची असेल याची नोंद घ्यावी, असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली यांनी कळविले आहे.

धनश्री ग्रुप आलापल्ली द्वारे जीवनावश्यक वस्तूंचे वितरण.

इमेज
सामाजिक कामात नेहमी अग्रेसर, ध.ग्रू. मुख्य संचालक राजअनिल पोचमपल्लीवार. श्रीनिवास बोमनवार -  तालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी  : - धनश्री ग्रुपचे मुख्य संचालक तथा न्यूज-24 मराठीचे  उपविदर्भ संपादक यांचे हस्ते आज 17/12/2020 रोजी नागेपल्ली येथील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. कोरोनामुळे बरेच कुटुंब आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडली आहे. दैनंदिन खर्च जीवनावश्यक गोष्टी परवडेनासा झाले आहेत. कित्येक लोकांचे रोजगार बंद झाले असून काही लोकांना पोटासाठी जगणे ही कठीण ठरले आहे.  अशावेळी धनश्री ग्रुपचे मुख्य संचालक राजअनिल पोचमपलीवार त्यांच्या बाधा आपल्या मनात व्यक्त करत, नागेपल्ली येथील अत्यंत गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी धनश्री ग्रुपचे संचालक गौरव भगत सदस्य वसंती मडावी, जीवनकला कुसणाके, प्रतिक्षा दुर्गे, शालू केशनवार आधी गावकरी उपस्थित होते.

दृष्टिहीन व्यक्तींच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करणार - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

इमेज
मुंबई : -  दि. 15 : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) संस्थेतर्फे दृष्टिहीन व्यक्तींच्या कल्याणासाठी राज्यात चालविण्यात येणाऱ्या अंध मुलींची निवासी शाळा, नेत्रचिकित्सा रुग्णालय तसेच इतर प्रकल्पांसाठी आपण सर्वतोपरी मदत करू, अशी  ग्वाही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले. ‘नॅब’च्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित अंध व्यक्तींच्या कल्याणासाठी उभारण्यात येणाऱ्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा आरंभ राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाला.     यावेळी नॅबचे उपाध्यक्ष सूर्यभान साळुंके यांनी राज्यपालांच्या जॅकेटला ध्वजाची छोटी प्रतिकृती लावली. राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.   राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, दृष्टीहीन व्यक्तींची ग्रहणशक्ती सामान्य माणसापेक्षाही अधिक असते. दृष्टिहीन व दिव्यांग व्यक्ती आयएएससारख्या परीक्षा पास होत आहेत तसेच उद्योग व्यवसायात चांगली कामगिरी करीत आहेत.  अंध, दिव्यांगांच्या शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व पुनर्वसनासाठी ‘नॅब’ ही संस्था अतिशय चांगले काम करीत आहे. संस्थेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठ...

पैठणमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करा - संजय राठोड

इमेज
मुंबई  : - दि. 15 : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मानवी वस्त्यांमध्ये व शेतात घुसून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडून तातडीने जेरबंद करण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासंदर्भात रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी वन मंत्री श्री.राठोड यांची प्रत्यक्ष भेट घेतली. याची तातडीने दखल घेत वनमंत्री संजय राठोड यांनी विधान भवनात बैठक घेतली व हे निर्देश दिले.               पैठण तालुक्यात काही दिवसांपासून एका बिबट्याने धुमाकूळ घातला असून त्याच्या हल्ल्यात आतापर्यंत एक वयोवृद्ध आणि त्यांच्या नातवाचा मृत्यू झाला. तसेच काही जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. या पार्श्‍वभूमीवर या भागात तातडीने पथके नेमावेत, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे, ट्रॅप कॅमेरे, थर्मल कॅमेरे लावण्यात यावे तसेच आजूबाजूच्या जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमधूनही अतिरिक्त पथके व रसद मागविण्यात यावी, असे निर्देशही वनमंत्री श्री. राठोड यांनी दिले .

हिंदी भाषा प्रचारात महाराष्ट्र, गुजरातचे योगदान मोठे

इमेज
हिंदी भाषिकांना मराठी भाषा शिकण्याची राज्यपालांची सूचना मुंबई : -  दि. 15 : खुद्द हिंदी भाषिकांपेक्षा महाराष्ट्र व गुजरात या राज्यांनी हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराचे फार मोठे कार्य केले असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. आज हिंदी भाषा सुरीनाम, मॉरीशस, फिजी यांसह अनेक देशात बोलली व समजली जाते. त्यामुळे हिंदी एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे असे त्यांनी सांगितले. हिंदी भाषेतील प्रसिध्द हास्य-व्यंग लेखकांच्या लेखांचे संकलन असलेल्या 'बता दूँ क्या' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते मंगळवारी राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल म्हणाले, हास्य व्यंग लिखाण हे एखाद्या टॉनिक प्रमाणे असून ते हलकेच आनंद देताना वाचकांना अंतर्मुख करते. देशातील सर्व भाषा एकमेकांच्या भगिनी असून हिंदी भाषिकांनी मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त करावे, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली. ज्येष्ठ पत्रकार डॉ. वागीश सारस्वत तसेच संपादक डॉ. प्रमोद पांडेय यांनी पुस्तकाची भूमिका स्पष्ट केली. कवयित्री आभा सूचक यांनी हिंदी अकादमी, मुंबईच्या कार्याची माहिती दिली. आर....

निधीवाटपात प्रादेशिक अन्याय नाही; ‘कोरोना’ विरुद्धच्या लढ्यासाठी निधीची कमतरता नाही.

इमेज
‘ओबीसी’ आरक्षणाला धक्का न लावता ‘मराठा’ आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : -  दि. 15 : ‘चांद्या’पासून ‘बांद्या’पर्यंत महाराष्ट्र एकच आहे, त्यामुळे निधीवाटपात कोणत्याही प्रदेशावर अन्याय होण्याचा प्रश्न येत नाही. राज्यातील जनतेला समान न्याय देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. राज्यातील ‘कोराना’ संकटाचा सामना करण्यात राज्यसरकार कमी पडलेले नाही. सरकारच्या सर्व यंत्रणा व जनता सर्वशक्तीनिशी कोरोनाशी एकजुटीने लढत आहे. हा लढा पुढेही सुरु राहील. ‘कोरोना’ लढ्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. राज्यातील ‘ओबीसी’ समाजाच्या आरक्षणाला जराही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यावर राज्य सरकार ठाम आहे. त्यासाठी सर्वशक्तिनिशी प्रयत्न सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केले.  विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात, विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यावर आलेले ‘कोरोना’चे...

प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

इमेज
मुंबई : -  दि. 15 : प्राचीन मंदिरे हा राज्याचा सांस्कृतिक वारसा असून हे वैभव जपण्याच्या दृष्टीने या मंदिरांच्या संवर्धनासाठी  राज्य शासनाकडून स्वतंत्र निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.              पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. श्री.ठाकरे म्हणाले, मंदिरांचे पावित्र्य, स्वच्छता यासोबतच येणाऱ्या भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल. टप्प्या-टप्प्याने प्राचीन मंदिरांचा विकास करण्यात येणार असून त्यात कोणत्या मंदिरांचा समावेश करायचा याबाबत सभागृहाच्या सदस्यांनी सूचना कराव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.              मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून सर्वोच्च्‍ा न्यायालयातील लढा सर्वांच्या सहकार्यातून निश्चितच जिंकू असा विश्वास व्यक्त करत श्री. ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य शासनाच्या भूमिकेत अजिबात बदल झालेला नसून पूर्वीचे वकीलही बदलण्यात आलेले नाहीत. मराठा सं...

आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ विधेयक मंजूर

इमेज
मुंबई : -  दि. 15 : आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र 2020 च्या विधेयकास विधीमंडळात एकमताने मंजूरी देण्यात आली. विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर करण्यात आले.  क्रीडामंत्री सुनिल केदार म्हणाले, राज्यात सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने होत असते. या पार्श्वभूमीवर हे विद्यापीठ सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे. नंतरच्या कालावधीत या विद्यापीठाकरीता स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येईल. यासाठी अनावर्ती खर्च रु. २००.०० कोटी व विद्यापीठ कॉर्पस फंडसाठी रु.२००.०० कोटी याप्रमाणे एकुण रु. ४००.०० कोटी खर्च अपेक्षित आहे. राज्याची क्रीडाविषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे (Sports Science, Sports Management इ.) विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी ...

कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात; आता 700 रुपयात होणार चाचणी - आरोग्यमंत्री राजेश टोपे.

इमेज
मुंबई : -  दि. 15 : कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्यशासनाने सहाव्यांदा कपात करत 980 रुपयांऐवजी 700 रु. हा दर निश्चित केल्याची आल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केली.              विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री.टोपे बोलत होते. श्री.टोपे म्हणाले, राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. राज्याचा रुग्णवाढीचा दर हा 0.21 इतका असून. केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.              राज्यात कोरोना चाचण्यांचे दर सातत्याने कमी केले जात असून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या 4500 रुपयांवरुन आता 700 रुपयांमध्ये खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या होणार आहेत. राज्य शासनाने कोरोना उपाययोजनांसदर्भात निर्णय घेताना सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन निर्णय घेतले. ...

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 9 विधेयके मंजूर.

मुंबई : -  दि. १५ : - विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २०२० आज संस्थगित झाले. हिवाळी अधिवेशन -२०२० या दोन दिवसांच्या अधिवेशनात मांडण्यात आलेली विधेयके आणि त्याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे.   दोन्ही सभागृहात संमत विधेयके १) सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. 54- महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2020 (पुन:स्थापनार्थ, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020). (२) सन २०२० चे विधानसभा विधेयक  क्र. 48 -  मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2020, (मुद्रांक शुल्कात केलेल्या कपाती प्रमाणे अधिभारामध्ये कपात करण्याची तरतूद करणे) (नगर विकास विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 16) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020). (३) सन २०२० चे विधानसभा विधेयक  क्र. 44 - महाराष्ट्र सहकारी संस्था (चौथी सुधारणा) विधेयक, २०२०, (कोविडमुळे, सहकारी संस्थांमधील महत्वाच्या विषयांना मंजुरी देण्यासाठी संचालक मंडळांना अधिकार देणेबाबतची तरतु...

पंचायत समिती कुरखेडा यांचे जनतेला सूचना.

गडचिरोली : - दि.16: कुरखेडा तालुक्यातील सर्व जनतेला याद्वारे सुचित करण्यात येते की, पंचायत समिती कुरखेडा अंतर्गत सर्व शासकीय कार्यालय (पंचायत समिती कार्यालय,जलसंधारण उपविभाग कार्यालय,ग्रापापु उपविभाग कार्यालय , एबविसेयो कार्यालय) यांची वेळ सकाळी 09.45 ते 06.15 निश्चीत आलेली आहे. नागरिकांना आवश्यक शासकीय सुविधा उपलब्ध करुन देतांना सदर कार्यालयीन वेळेत शासकीय कार्यालयात भेट द्यावी.दरम्यानच्या काळात कोणतेही कार्यालय कुलुपबंद/र्निमनुष्य असल्यास त्याची तक्रार दुरध्वनी क्रमांक 07139-245428 या क्रमांकावर करण्यात यावी.        तसेच प्राथमिक /माध्यमिक शाळा, अंगणवाडी केंद्रे, ग्रामपंचायती,प्राथमिक आरोग्य केंद्र,प्राथमिक आरोग्य पथक व पशुवैद्यकीय दवाखाना, यांच्या वेळा वेगवेगळया ठरवून दिलेल्या असल्याने सदर वेळेबाबतचे वेळापत्रक पंचायत समिती कुरखेडा कार्यालयाचे नोटीस बोर्डवर तसेच www.zpgadchiroli.org  या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या आहे.         सोबतच शक्य असल्यास सदर तक्रारीच्या अनुषंगाने घेतलेले छायाचित्रे व इतर पिडीएफ फाईल सह संबधित कार्याल...

आज जिल्ह्यात 40 नवीन कोरोना बाधित तर 39 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : - दि.15: आज जिल्हयात 40 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8598 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8138 वर पोहचली. तसेच सद्या 368 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 92 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.65 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.28 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला. नवीन 40 बाधितांमध्ये गडचिरोली 17, अहेरी 8, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 6, धानोरा 2, एटापल्ली 0, कोरची 1, कुरखेडा 3, मुलचेरा 0, सिरोंचा 1  व वडसा येथील 1 जणांचा समावेश आहे.  आज कोरोनामुक्त झालेल्या 39 रूग्णांमध्ये गडचिरोली 26, अहेरी 1, आरमोरी 1, भामरागड 1, चामोर्शी 1, धानोरा 5, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0,  कुरखेडा 3 व वडसा मधील 1 जणाचा समावेश आहे. नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील सीआरपीएफ 1, साईनगर 1, गोकुलनगर 3,  नवेगाव कॉम्पलेक्स 1, मथुरानगर 1, कोटगल 1, बीएसस्सी कॉल...

राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत पुण्यशोक अहिल्याबाई होळकर खाजगी रोपवाटीका योजनाचे प्रशिक्षण संपन्न.

गडचिरोली : - दि.15: राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत पुण्यशोक अहिल्याबाई होळकर खाजगी रोपवाटीका योजना अंतर्गत जिल्हयासाठी एकूण 22 रोपवाटीकाचे लक्षांक प्राप्त होते. तालुकास्तरावर अर्जाची सोडत पध्दतीने निवड होऊन मार्गदर्शक सुचनानुसार 22 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.        निवड करण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांचे प्रशिक्षण दिनांक 12 डिसेंबर 2020 रोजी सकाळी  11.00 वाजता Google Meet द्वारे  ऑनलाईन आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षणास एकुण 65 प्रशिक्षणार्थीनी भाग घेतला. यामध्ये निवड केलेले शेतकरी, संबधित कर्मचारी व अधिकारी यांनी भाग घेतला. या प्रशिक्षणास प्रशिक्षक म्हणुन हेमंत जगताप, तंत्र प्रशिक्षक, भारतीय कृषि कौशल्य परिषद, भारत सरकार हे लाभले . यावेळी त्यांनी योजनेमध्ये अर्ज करणे, योजनेचे निकष, लाभार्थी प्राधान्य व निवड, शेडनेट उभारणी, प्लास्टिक टनेल आराखडा, रोप निर्मिती व विक्री बाबत सखोल मार्गदर्शन केले.         या प्रशिक्षणास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषि उपसंचालक अरुण वसवाडे, तंत्र अधिकारी ( फलोत्पादन) गणेश बादाड...

ग्रामपंचायतीचा निवडणूकासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रणालीद्वारे.

इमेज
गडचिरोली : - दि.15: मा. राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 14,234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषित केला आहे. गडचिरोली जिल्हयातील काही ग्रामपंचायतींचा यात समावेश असून निवडणुक जानेवारी 2021 मध्ये होणार आहे.          ग्रामपंचायतीच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या सर्व मागासवर्गीय उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया ही पुर्णत:ऑनलाईन झालेली असून जात प्रमाणपत्रांची पडताळणी करून जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणेची प्रक्रिया दिनांक 1 डिसेंबर 2020 पासून पुर्णत: ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आलेली आहे.           या ऑनलाईन प्रक्रियेत अर्जदाराने ऑनलाईन अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरून तसेच आवश्यक सर्व दस्तावेज स्कॅनकरून अपलोड करणे व तदनंतर ऑनलाईन फी भरून ऑनलाईन भरलेला अर्ज, ऑनलाईन पैसे भरल्याची पावती व सोबत सर्व मुळ दस्तावेज व त्याच्या छायांकीत प्रतीसह समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत विहीत मुदतीत अर्ज दाखल करणे आवश्यक आ...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव.

इमेज
मुंबई : -  दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सायबर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची ‘सायबर सुरक्षा जबाबदारी सर्वांची’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार  दि.15, बुधवार दि. 16 आणि गुरुवार  दि.17 डिसेंबर रोजी  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे. कोरोना काळात वाढलेले सायबर गुन्हे, सोशल मीडियावर टाकल्या जाणा-या चुकीच्या पोस्ट, ऑनलाईन खरेदी करताना होणारी फसवणूक, ऑनलाईन पेमेंट ॲप व त्यासंदर्भात घ्यावयाची काळजी, फेसबुकवर येणा-या चुकीच्या पोस्ट, ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आदी विषयांची माहिती श्री. यादव यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे.

इमेज
शाश्वत विकासासाठी कृतीबरोबर आकलनावर भर देण्याची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सूचना मुंबई : -  दि. 14 : केंद्र शासनाने ठरविलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये राज्याचा क्रमांक वर यावा यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावेत. पर्यावरणासंदर्भात आजचा विद्यार्थी जागरूक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमार्फत या उद्दिष्टांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत केल्या. केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये केंद्र शासनाने केलेला कृती कार्यक्रम व राज्य शासनाचा कृती कार्यक्रमासंदर्भात श्रीमती गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय.एस. कुंदन उपस्थित होते. तर नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, पर्यावरण व वातावर...

कोरोना योद्ध्यांच्या लढ्यामुळे संकटावर मात- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

इमेज
महिमाच्या 19 कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार. मुंबई : -  दि. 14 : कोरोना महामारीत मागील आठ-नऊ महिन्यांपासून सातत्याने समर्पित भाव ठेवत कोरोना योद्ध्यांनी यशस्वी काम केले. त्यामुळेच आज कोरोना महामारीचे संकट आटोक्यात असून रुग्ण संख्याही कमी झाली आहे. हे सर्वांच्या एकत्रितपणे काम केल्याचे फलित आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. कोरोना काळात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वैद्यकीय आणि आरोग्य माहिती व्यवस्थापन संस्थेच्या (MaHIMA) वतीने राजभवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, सर्वांच्या दृढनिश्चय आणि प्रयत्नाने आपण आज कोरोना विषाणूला आटोक्यात आणले आहे. यापुढील काळातही अशाच रितीने कार्य सुरु ठेवून कोरोनावर निश्चितच मात करण्यात यश मिळवू, असा मला विश्वास आहे. अनेक कोरोना योद्ध्यांचा सत्कार, सन्मान करण्याचे सौभाग्य लाभले याचा मला अभिमान आहे. कोरोना योद्धे म्हणजे देवदूत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासह मदतीस असलेले इतर कर्मचारी, स...

आज जिल्ह्यात 17 नवीन कोरोना बाधित तर 47 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : - दि.14: आज जिल्हयात 17 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 47 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8558 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8099 वर पोहचली. तसेच सद्या 367 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 92 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.64 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.29 टक्के तर मृत्यू दर 1.08 टक्के झाला. नवीन 17 बाधितांमध्ये गडचिरोली 11, अहेरी 0, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 0  व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे.  आज कोरोनामुक्त झालेल्या 47 रूग्णांमध्ये गडचिरोली 22, अहेरी 2, आरमोरी 9, भामरागड 1, चामोर्शी 1, धानोरा 3, एटापल्ली 1, मुलचेरा 2, सिरोंचा 0, कोरची 0,  कुरखेडा 2 व वडसा मधील 4 जणाचा समावेश आहे. नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील रामनगर 2, नवेगाव 1, मेडिकल कॉलनी 2, आयटीआय चौक 1, डोंगरे पेट्रोल पंप जवळ 1, वनश्री कॉलनी 1, पं...

महा-डिबीटी प्रणाली सुरु झाल्याने प्राचार्य तसेच लिपिक यांची सभा.

गडचिरोली : - दि.14: गडचिरोली जिल्हयातील सर्व कनिष्ठ /वरीष्ठ व व्यवसायीक , बिगरव्यावसायिक ,अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांना कळविण्यात येते कि, समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन शिष्यवृत्ती अर्ज तसेच सन 2019-20 शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता पुनश्च (रि-अप्लाय) अर्ज सादर करण्याचे अनुषंगाने दि.18 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे महाविद्यालयाचे प्राचार्य व शिष्यवृत्तीचे काम पाहणारे लिपीक यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व महाविद्यालयातील प्राचार्य व शिष्यवृत्तीचे काम पाहणारे लिपीक यांनी सभेस उपस्थित रहावे. असे कळविण्यात येत आहे. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.

जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी ग्रामोद्योग मंडळ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविणार.

गडचिरोली : - दि.14: शहरी व ग्रामीण भागात सुशिक्षित युवक युवतींना स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकरीता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) बँकद्वारा कर्जपुरवठयासह अनुदान सहाय्य मिळण्याची आखणी करण्यात आलेली असून या द्वारा उद्योग जगतेला चालना देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत उत्पादन स्वरुपाच्या उद्योगास प्रकल्प मर्यादा रुपये 50 लक्ष असून सेवा व्यवसायाकरीता प्रकल्प मर्यादा रुपये 10 लक्ष आहे. बँक द्वारा मंजूर शहरी भागातील राखीव प्रवर्गातील (अनुसूचित जाती/ जनजाती/महिला/अपंग/माजी सैनिक) प्रकल्पास 25 टक्के तर अराखीव प्रवर्गास 15 टक्के अनुदान देय राहणार आहे. ग्रामीण भागातील राखीव प्रवर्गास 35 टक्के तर अराखीव प्रवर्गास 25 टक्के अनुदान देय राहणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजना जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे राबविण्यात येणार असून इच्छुक युवक/ युवतीकडून कर्ज प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने स्विकारुन कर्जप्रकरणे सरकारी बँकसह खाजगी सहयोगी बँकाकडे जिल्हा कार्यबल समितीच्या शिफारसीसह सादर करण्यात ...

मुल मध्ये वाढत्या अवैध दारू विक्रीवर आळा घाला - उलगुलान संघटनेचे शाखाध्यक्ष निखिल वाढई यांची मागणी.

इमेज
पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन-मुल, जि.चंद्रपूर यांना निवेदन. चंद्रपूर/मुल : - चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंदी असून सुद्धा  मुल तालुक्यामध्ये अवैध दारू विक्रीचे मोठया प्रमाणात वाढ झाल्यामुळे अनेक गोरगरिब जनता  दारूच्या वेसनी होऊन आर्थिक बाजूने दुर्बळ होत आहे. शासनाने दारू बंधी करण्यामागचा हेतू येथील युवक तसेच दारूच्या वेसनी जाऊन दारिद्रयाकडे वळलेल्या जनतेला आपले जीवन पून्हा सन्मानाने जगता यावे हा होता.  परंतु दारूबंदी घोषित झाल्यानंतर प्रशासनाचा याकळे पाहिजे तितके लक्ष होत नसल्याने अवैध दारू विकणारे तसेच घेणारे यांची संख्या फोफावली आहे. दारूबंधी ही अवैध काम करणाऱ्यासाठी लागलेली लाट्रीच आहे. याचा पुरेपूर फायदा या अवैध विक्रेत्यांना होत असून आज यांच्याकडे लाखोची संपत्ती आहे. या संपत्तीची चौकशी व्हावी. आजपर्यंत ज्यांच्या वर दारू च्या कारवाही झाल्या आणि जे तळी पार आहेत त्यांची चौकशी व्हावी, हा पैसा गोरगरीबाचा पैसा आहे. अवैध दारू विक्रेते वाटेल ते किंमत आकारून वेसनाधीन झालेल्या व्यक्तीचा एक प्रकारे आर्थिक शोषण करीत आहे. म्हणून यांची दखल घेणे आता आवश्यक झाले आहे....

गडचिरोली शहरात आढळले दुर्मिळ खवल्या मांजर.

इमेज
गडचिरोली : - ता. १३ : जंगलातील अतिशय लाजाळू व अतिदुर्मिळ खवल्या मांजर (पँगोलिन) शनिवार (ता. १२) गडचिरोली शहरातील सर्वोदय वॉर्डात रात्री ८ वाजताच्या सुमारास आढळून आले. त्याला वनविभागाने ताब्यात घेऊन रविवारी निसर्गमुक्त केले. गडचिरोली शहरातील आरमोरी मार्गावरील एआरबी ट्रॅव्हल्सच्या मागील परिसरात खोब्रागडे नावाच्या वृद्ध महिलेच्या अंगणात खवल्या मांजर आढळले. त्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून या दुर्मिळ प्राण्याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी झाल्यानंतर रविवारी त्याला जंगलात सोडण्यात आले.  यावेळी गडचिरोलीचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलुके, क्षेत्र सहायक जेनेकर, सर्पमित्र अजय कुकडकर, क्रेन्स संस्थेच्या सचिव अंजली कुळमेथे आदींची उपस्थिती होती.  दुर्मिळ खवल्या मांजर अतिशय दुर्मिळ असून निशाचर प्राणी आहे. दिवसा ते आपल्या खोल बिळात आराम करते व रात्रीच्या सुमारास बाहेर निघते. मुंग्या व वारूळातील ...

आज जिल्ह्यात एका मृत्युसह 36 नवीन कोरोना बाधित तर 32 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : - दि.13: आज जिल्हयात 36 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 32 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8541 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8052 वर पोहचली. तसेच सद्या 397 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 92 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. मृत्युमध्ये मेढांटाला  धानोरा तालुक्यातील 59 वषीय एका पुरुषाचा समावेश आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.27 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.65 टक्के तर मृत्यू दर 1.08 टक्के झाला. नवीन 36 बाधितांमध्ये गडचिरोली 16, अहेरी 9, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 04, एटापल्ली 0, कोरची 1, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 1  व वडसा येथील 3 जणांचा समावेश आहे.  आज कोरोनामुक्त झालेल्या 32 रूग्णांमध्ये गडचिरोली 14, अहेरी 4, आरमोरी 1, भामरागड 2, चामोर्शी 5, धानोरा 0, एटापल्ली 0, मुलचेरा 3, सिरोंचा 0, कोरची 0,  कुरखेडा 3 व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे. नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील शुभाष नगर 01,...

केंद्रीय मंत्रालयाकडून आरोग्यवर्धिनी केंद्रातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील आशा रुखसार शेख यांचा गौरव.

इमेज
गडचिरोली : - दि.12): जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव आरोग्यवर्धिनी केंद्रातून उत्कृष्ट काम करणाऱ्या श्रीमती. रुखसार मुस्तफा शेख या आशा स्वयंसेविकेला राज्यातून सातव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही यादी जाहीर केलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाची मान उंचावली आहे. तसेच आशा स्वयंसेविकामध्ये उत्साहाने काम करण्याची जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे.     श्रीमती. रुखसार मुस्तफा शेख यांनी आपल्या कार्यक्षेत्रात आशा योजनेच्या कामासोबतच कोरोना सारख्या साथीच्या रोगामध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेमध्ये देखील ठरवून दिलेले उद्दिष्टे वेळेवर पूर्ण केले आहे.     श्रीमती. रुखसार मुस्तफा शेख आशा स्वयंसेविका यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुमार आशीर्वाद तसेच आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. समीर बनसोडे...

आज जिल्ह्यात 35 नवीन कोरोना बाधित तर 66 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : - दि.12: आज जिल्हयात 35 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 66 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8505 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8020 वर पोहचली. तसेच सद्या 394 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 91 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.30 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.63 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला. नवीन 35 बाधितांमध्ये गडचिरोली 10, अहेरी 2, आरमोरी 2, भामरागड 2, चामोर्शी 08, धानोरा 01, एटापल्ली 6, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 1  व वडसा येथील 2 जणांचा समावेश आहे.  आज कोरोनामुक्त झालेल्या 66 रूग्णांमध्ये गडचिरोली 30, अहेरी 2, आरमोरी 10, भामरागड 0, चामोर्शी 3, धानोरा 2, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0,  कुरखेडा 2 व वडसा मधील 17 जणाचा समावेश आहे. नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील आयटीआय चौक 01, नेगाव कॉम्पलेक्स 01, सर्वोदय वार्ड 01, काम्प ऐरिया 03, आयटीआ बाय पास 01, रा...

जिल्हयातील ३६२ ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर

इमेज
दोन टप्प्यात दि.१५ व १७ जानेवारी २०२१ ला मतदान,  संपूर्ण जिल्हयात आचारसंहिता लागू गडचिरोली : - दि.१2): जिल्हयातील एप्रिल ते जून आणि जुलै ते डिसेंबर २०२० मध्ये कालावधी संपलेल्या व नव्याने स्थापित सुमारे ३६२ ग्रामपंचायतीमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सदर निवडणूक जिल्हयात दोन टप्प्यात संगणीकृत पध्दतीने होणार असून पहिल्या टप्प्यात कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी व मुलचेरा या ८ तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात दि.१७ जानेवारी २०२१ रोजी अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा येथे होणार आहे. मतदानाची वेळ दोन्ही टप्प्यांसाठी सकाळी ७.३० वा. पासून दुपारी ३.०० वा. पर्यंत असणार आहे. जिल्हयातील ४५७ ग्रामपंचायतींपैकी ५० टक्केपेक्षा जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने संपुर्ण जिल्हयात आचारसंहिता दि. ११ डिसेंबर पासून निवडणूकांचा निकाल लागेपर्यंत लागू राहणार आहे. या निवडणूकिसाठी तहसिलदार १५ डिसेंबर रोजी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. तहसिल कार्यालयात नामनिर्देशन पत्र मागविण्याच...

ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळ वाटप.

इमेज
अहेरी  : - महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या आज वाढदिवसा निमित्ताने आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम,व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात रुग्णांंना फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आले.                     अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या शुभ हस्ते फळ  वाटप करण्यात आले. यावेळी महागाँव येतील उपसरपंच श्री.श्रीनिवास आलाम, खांदला ग्राम पंचायतचे सदस्या सौ.वंदना अलोने, राजाराम ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट, सिरोंचा प.स.चे माजी प.स.सदस्य श्री.चंद्रु तोड़ासाम, आदिवासी विध्यार्थी संघाचे अहेरी शहर अध्यक्ष श्री.प्रशांत गोडसेलवार, कवडु नवले, मिलिंद अलोने, गणेश चौधरी, सचिन मैदावार, प्रकाश दुर्गे, राकेश सड़मेक, विलास गलबले आदि उपस्थित होते.