जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन.

गडचिरोली : - दि.19: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली तथा जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोलीच्या वतीने जिल्हास्तरिय युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक 25 ते 26 डिसेंबर 2020 या कालावधीत ऑनलाइन/virtual पद्धतीने करण्यात येणार आहे. 

युवा महोत्सवातील वैयक्तिक स्पर्धा बाबी पुढील प्रमाणे आहे.
1.ऐकांकिका- हिंदी/इंग्रजी, 
2.शास्त्रीय वाद्य- बासरी, तबला, मृदंग, विणा, हार्मोनियम - लाईट, सितार, गिटार
3.शास्त्रीय नृत्य- भरत नाट्यम, मनिपुरी, ओडिसी, कथक, कुचिपुडी
4. शास्त्रीय गायन - हिंदुस्थानी, इत्यादी
 
सांघिक स्पर्धा बाबी पुढील प्रमाणे  
1.लोकनृत्य 
2.लोकगीत

तरी गडचिरोली जिल्यातील 15 ते 29 वर्ष वयोगटतील कलावंतांनी आपले अर्ज दिनांक 23 डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सहभागी स्पर्धकांचे नाव, जन्म तारीख व जन्म तारखेच्या पुराव्यानिशी सादर करावे. 

स्पर्धेच्या अधिक माहिती करिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासी संपर्क साधावे असे घनश्याम राठोड जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

टीप - covid १९ रोगाच्या संदर्भात शासनाच्या सूचनांचे पालन करावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.