महा-डिबीटी प्रणाली सुरु झाल्याने प्राचार्य तसेच लिपिक यांची सभा.

गडचिरोली : - दि.14: गडचिरोली जिल्हयातील सर्व कनिष्ठ /वरीष्ठ व व्यवसायीक , बिगरव्यावसायिक ,अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांना कळविण्यात येते कि, समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन शिष्यवृत्ती अर्ज तसेच सन 2019-20 शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता पुनश्च (रि-अप्लाय) अर्ज सादर करण्याचे अनुषंगाने दि.18 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे महाविद्यालयाचे प्राचार्य व शिष्यवृत्तीचे काम पाहणारे लिपीक यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व महाविद्यालयातील प्राचार्य व शिष्यवृत्तीचे काम पाहणारे लिपीक यांनी सभेस उपस्थित रहावे. असे कळविण्यात येत आहे. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.