जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी ग्रामोद्योग मंडळ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविणार.
गडचिरोली : - दि.14: शहरी व ग्रामीण भागात सुशिक्षित युवक युवतींना स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकरीता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) बँकद्वारा कर्जपुरवठयासह अनुदान सहाय्य मिळण्याची आखणी करण्यात आलेली असून या द्वारा उद्योग जगतेला चालना देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत उत्पादन स्वरुपाच्या उद्योगास प्रकल्प मर्यादा रुपये 50 लक्ष असून सेवा व्यवसायाकरीता प्रकल्प मर्यादा रुपये 10 लक्ष आहे. बँक द्वारा मंजूर शहरी भागातील राखीव प्रवर्गातील (अनुसूचित जाती/ जनजाती/महिला/अपंग/माजी सैनिक) प्रकल्पास 25 टक्के तर अराखीव प्रवर्गास 15 टक्के अनुदान देय राहणार आहे. ग्रामीण भागातील राखीव प्रवर्गास 35 टक्के तर अराखीव प्रवर्गास 25 टक्के अनुदान देय राहणार आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजना जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे राबविण्यात येणार असून इच्छुक युवक/ युवतीकडून कर्ज प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने स्विकारुन कर्जप्रकरणे सरकारी बँकसह खाजगी सहयोगी बँकाकडे जिल्हा कार्यबल समितीच्या शिफारसीसह सादर करण्यात येणार आहे. बँकाद्वारा कर्ज मंजूर उमेदवारांना प्रशिक्षणाची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे. तरी इच्छुक युवक/ युवतींनी जिल्हा उद्योग केंद्रास संपर्क साधावा. व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा