उच्च शिक्षणासाठी व व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना जाहीर आवाहन.

गडचिरोली : - दि.18: उच्च शिक्षणासाठी व व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्राची पडताळणीकरीता ज्या विद्यार्थ्यांनी समितीकडे यापूर्वीच ऑनलाईन भरलेले अर्जाच्या स्थळप्रत सादर केलेली आहे व असे ऑनलाईन अर्जात ऑनलाईन तसेच ऑफलाईन त्रृटीची पुर्तता करण्यास कळविण्यात आलेले आहे. अशा विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जातील त्रृटींची पुर्तता ऑनलाईन तसेच ऑफलाईन करून शनिवार दिनांक 19.12.2020 रोजी दुपारी 12.15 वाजेपर्यंत समितीकडे संपर्क साधावा.

जे अर्जदार विद्यार्थी त्रृटींची पुर्तता करणार नाहीत त्यांचे अर्ज हे नस्तीबध्द करण्यात येतील व यामुळे होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारीही विद्यार्थ्यांची स्वत:ची असेल याची नोंद घ्यावी, असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.